Maruti - A book on Maruti temples in Pune

Page 1

कथा व चित्रे: पूजा वनारसे


Puja Vanarse Visual Communication Industrial Design Centre (IDC) Indian Institute of Technology, Bombay Project 2: An Illustrative Story Book on Maruti Temples in Pune Guide: Prof. Mandar Rane


मारुती मारुती कथा व चित्रे: पूजा वनारसे

कथा व चित्रे: पूजा वनारसे

मागर्दर्शक: �ाोफ. मंदार राणे



मनोगत कोणतेही पुस्तक बनवायचे म्हणले की अनेकांचा सहभाग त्यामध्ये असतो. त्याचसोबत काहींची प्रेरणा आणि आिशर्वादही असतात. हे पुस्तक बनवताना मला खूप जणांचा सहभाग मिळाला आणि त्यामुळेच मी हे पुस्तक पूर्ण करू शकले. या पुस्तकाच्या निर्मितीसाठी माझे मार्गदर्शक �ाोफ. श्री. मंदार राणे यांचा खूप मोठा सहभाग आहे. त्याचसोबत सर्व मंदिराचे पुजारी आणि तेथील आजूबाजूची लोकं यांचाही मोठा वाटा आहे. त्यांच्या अमूल्य माहितीशिवाय मी हे पुस्तक पूर्णच करू शकले नसते. याशिवाय सर्व लहान मुले, ज्यांनी या पुस्तकाच्या सुरवातीपासून मला सहकार्य केले त्यांचे खूप खूप आभार. माझे सर्व मित्र आणि मैत्रिणी यांचेही खूप आभार. माझे आई बाबा यांनी दिलेल्या आधारामुळे मी हे पुस्तक करू शकले, त्यांच्या चरणी हे पुस्तक अर्पण! पूजा वनारसे


टण...टण...टण...मधली सुट्टी झाली आणि नेहमीप्रमाणे प्रसाद, तारा, चिनू, सई आणि आदित्य गोल करून डबा खायला बसले.

एवढ्यात सई आणि चिनुची कुजबुज चालु झाली. त्यांचं लक्ष अजिबात जेवणाकडे नव्हते आणि एक आवाज आला.


“मी सुपरमॅन होणार”, चिनू डबा खात खात उठला. “मी बॅटमॅन होणार”, सई पण आनंदाने म्हंटली. डबा खाताना मुलांच्या चर्चा सुरु झाल्या आणि का नाही होणार? बाईंनी मधल्या सुट्टीच्या आधी फॅन्सी ड्रेस स्पर्ध्येची घोषणा जी केली होती.


“मी हनुमान होणार”, प्रसाद उठला. “हनुमान?”, अरे थीम तर सुपरहीरो आहे, देव नाही. तारा डोळे उं चावत म्हणाली. “का? हनुमान का सुपरहीरो नाही? तो किती बलवान आहे, सूर्याला गिळायचा प्रयत्न त्याने केला, समुद्र पार केला आणि एक आख्खा डोंगरही उचलला. मग झाला ना तो सुपरहीरो?”, प्रसाद जोर देत म्हणला.


“ए, हो हो अगदी बरोबर”, सई आणि आदित्य प्रसादला पाठींबा देत म्हणाले. “आणि एवढच नाही मी होणार आहे जिलब्यांचा मारुती!!! अगदी या जिलेबीसारखा!”. “जिलब्यांचा मारुती? आत्ता तर तू हनुमान म्हणालास. मग मारुती?”, ताराने प्रश्न विचारला. “अगं हनुमानाचचं दुसरं नाव आहे मारुती! मारुती म्हणजे जो वेगाने उडतो तो!” प्रसादने उत्तर दिले. “पण मग जिलब्या मारुती?”, सर्वजन आश्चर्याने म्हटले. “हो हो जिलब्या, आपल्या पुण्यात आहे ना जिलब्या मारुती”, प्रसाद आनंदाने म्हणाला.


“जिलब्या मारुती? अय्या मग तो िजलेबिसारखा गोल आहे का?”, सई आश्चर्याने म्हणाली. “नाही मला वाटतं, जेव्हा रावणाने मारुतीला त्याच्या दरबारात बंद केला होतं, तेव्हा त्याने स्वत:ची शेपटी जिलेबिसारखी गोल गोल करून आसन बनविलं होतं, म्हणून त्याच नाव जिलब्या मारुती असेल!”, आदित्य कुतूहलाने म्हणाला. प्रसादला या सगळ्यांची गम्मत वाटत होती आणि आपल्या आजीने सांगितलेल्या माहितीनुसार त्याने वर्णन केले.



“अरे वा! तू जिलब्या मारूतीच हो. कित्ती मज्जा येईल आणि बाकीच्या मुलांनाही कळे ल की आपल्या पुण्यात जिलब्या मारुती आहे ते”, आदित्य म्हणाला. “हो पण फक्त जिलब्या मारूतीच का? तुम्हीही सगळे मारुती होवू शकता, आपल्या पुण्यात अजून खूप मारुती आहेत”, प्रसाद म्हणला. “अजून मारुती? पण मारुती तर एकच आहे ना, जसा एकच स्पायडरमॅन, सुपरमॅन किंवा बॅटमॅन! मग मारुती कसे बरे अनेक?”, ताराने प्रश्न केला.


“अरे मित्रांनो हीच तर गंमत आहे या सुपरहिरोची, तो आहे एक, पण त्याची नावे आहेत अनेक! नावे आहेत जरा विचित्र, ऐकून सांगा बरं काय येतात तुमच्या डोळ्यासमोर चित्र?” “आदित्य तू उं टाडे मारुती हो. चिनू तू पत्र्या मारुती! सई तू सोन्या मारुती बन आणि तारा तू पासोड्या मारुती!”, प्रसादने बाकीच्या मारुतींची नावे सुचवली. मुलांना आजीमुळे प्रसादवर विश्वास बसलाआणि त्यांनी मारुतीबद्दल तर्कवितर्क सुरु केले. प्रत्येकाचे आता कुतूहल वाढत चालले होते आणि सर्वजन मारुतीबद्दल कल्पना करू लागले.


“उं टाडे मारुती? त्याचं तोंड आणि शेपटी उं टासारखी आहे का? किंवा नक्कीच तो उं टावर बसला असेल आणि त्याच्या आजूबाजूला रेती पसरली असेल, हो ना प्रसाद, संाग ना आम्हाला”, आदित्यला आता क्षणभरही चैन पडत नव्हतं. प्रसादनेही मग माहीती सांगायला सुरुवात केली.


“खूप वर्षापूर्वी या मंदीराच्या जागी होता एक तलाव, तलावात प्यायचे उं ट पाणी! तलाव गेला, उं टही गेले... नाव मात्र याला उं टाडे दिले हीच याची कहाणी!”


“आणि पत्र्या मारूतीचं काय? त्याच्या हातात पत्रा ”आणि आहे का? का त्याची मूर्तीच पत्राची प�याचीबनली बनलीआहे आहे??”” चीनु चीनुन नेह ेही​ी कल्पना कल्पना करायला करायला सु सुरु रुवात वात क के​े ली ली. मग प्रसाद बोलला, मग प्रसाद बोलला, “पत्र्याच याचं खूपखूवर्षापू र्वी, र्वी, “पत्र्याचंहोत होतमंदमंीरदीर याचं प वर्षापू आता बनलं आहे सिमेंट विटांपासून! आता बनलं आहे सिमेंट विटांपासून! म्हणूनच नाव पडलं पत्र्या मारुती, म्हणू च नाव पडलं मारुती, यालानबघण्यासाठी जापत्र्या नारायण पेठेतून!”

याला बघण्यासाठी जा नारायण पेठेतून!”



एवढ्यात सईने डोळे बंद केले आणि ती बडबडायला लागली. “सोन्या मारुती...अं...मारुतीने लंका जाळली म्हणूनच सोन्या मारुती नाव असणार आणि तो स्वत: सोन्याचाच असणार.” सईने डोळे उघडले आणि ती पुन्हा विचारू लागली. मग प्रसादही तेवढ्याच उस्तुकतेने म्हणाला,


“या मारुतीच्या चौकात आहेत, खूप खूप सोन्याची दुकाने, म्हणूनच तर ओळखला जातो हा सोन्या मारुती नावाने!”


आदित्य, चिनू आणि सईने आनंदाने टाळ्या वाजवायला सुरुवात केली. पण तारा जरा संशयाने प्रसादने बघत होती. तिच्या मनात काहीतरी विचित्रच चालू होत. सर्वांनी तिला विचारलं तेव्हा ती वैतागून म्हणाली, “किती थट्टा करतो तू प्रसाद. अशी कधी नावं असतात का देवांची? मला तर विश्वासच बसत नाहीये.” आता मात्र प्रसादही वैतागला आणि तो म्हणला, “मी खरचं सांगतोय, ही मंदीरे आहेत आपल्या पुण्यात. तुला खरं वाटत नाही ना तर विचार माझ्या आजीला. आज शाळा सुटल्यावर ती येणार आहे मला न्यायला. मग तर झालं?” “ठीक आहे मग शाळा सुटल्यावर आपण आजींशी गप्पा मारू. अशी मंदीरे आहेत तर मलाही त्यांच्याबद्दल उस्तुकता आहे.” तारा म्हणाली.


मधली सुट्टी संपली, पण मुलांचे लक्ष आता शाळा सुटण्याकडे लागले होते. सर्वजण घंटेचा आवाज ऐकण्यासाठी तरसले. ४ वाजले आणि टण..टण..टण पुन्हा घंटेचा टोल पडला, तशी मुले गेट कडे धावली. प्रसादची आजी गेटवरच उभी होती. मुलांनी आजीला घेरलं आणि सर्व हकीकत सांगितली. आजी मुलांना शाळाशेजारील बागेत घेवून बसली. ताराने प्रसादने सांगितल्या माहितीनुसार पासोड्या मारुतीबद्दल विचारले. “आजी पासोड्या म्हणजे काय गं? हा शब्दच मी कधी ऐकला नाही.” “अगं पासोड्या हा एक पगडीचा प्रकार आहे, जशी टिळकांची आणि तात्या टोपेंची!” आजी म्हणाली.


“ऐय्या खरचं! मग त्या मारुतीने पगडी घातली आहे का?” सईने कुतूहलाने विचारलं. आजी हसली आणि तिनेही माहिती सांगायला सुरुवात केली.


“पूर्वी इथे होते खूप सारी, पुणेरी पगड्यांची दुकाने, म्हणूनच हा मारुती ओळखला जातो, पासोड्या मारुती नावाने!”


मुलांनी आता बाकीच्या मारुतीबद्दल विचारलं. “भिकारदास, शनिपार आणि बंदिवान असे मारुती आहेत. मुलांनो सांगा बंर कसे असतील हे मारुती?” आजीने विचारले. मुलांची कुजबुज चालू झाली. “भिकारदास म्हणजे, मारुतीने रावणाची लंका जाळू न रावणाला भिकारी केला म्हणून त्याला भिकारदास म्हणतात का?” मुले विचारू लागली. मग आजीनेही सांगितलं,


“पूर्वी भिकारदास नावाचे होते श्रीमंत शेठ, जे करायचे गरिबांची सेवा! त्यांचाच नावं याला मिळालं, त्यांनी भिकारदास मारुतीचं मंदीर बांधलं जेव्हा!”


“शनिपार हा तर आपल्या पुण्यातला बस स्टाॅप आहे, मग शनिपारच्या बसने मारुती आला होता का?” चीनुने विचारले. “अरे नाही वेड्या, शनिवारी लंकेत जाण्यासाठी मारुतीने समुद्र पार केला असेल म्हणून त्याचं नाव शनिपार पडलं असेल.” “अरे मुलांनो शनिपार म्हणजे शनीची जागा.” आजी हसत हसत म्हणाली.


“हे मंदीर आहे मुळात मारुतीचं, तरीपण हा मारुती ओळखला जातो, शनिपार नावाने हेच आहे महत्व याचं!"


आता राहिला बंदिवान मारुती! बंदिवान हे नावच ऐकून मुलांना हसू येत होत. “बंदिवान म्हणजे तो जेलमध्ये असणार आणि त्याला साखळ्यांनी गच्च बांधलेलं असणार.” चिनू म्हणाला. “नाही! रावणाने मारुतीला बंदिवान केला ना, तेच कारण असणार”, आदित्य जोर देवून म्हणाला. मुलांची गडबड ऐकून आजी म्हणाली,


शिवाजीराजांच्या काळात होते इथे एक कारागृह, जिथे ठे वायचे ते गुन्हेगारांना! कारागृह गेलं मंदिर झालं, म्हणूनच बंदिवान मारुती नाव पडलं माहीत आहे का तुम्हा सर्वानां!”


मुलांना आज पुण्यातल्या आठ मारुतीबद्दल माहीती मिळाली होती. पूर्वीच्या काळी काही घडू न गेलेल्या गोष्टींमुळे कशी नाtवे पडतात हे आज त्यांना कळलं होत. सर्वजण अजूनही मारुतीच्या कल्पनेत होते. सर्वांनी ठरवलं होतं, की फॅन्सी ड्रेस स्पर्धेत मारुतीचं बनून जायचं. पण फक्त मारुतीबद्दल माहीती ऐकून त्याचं समाधान झालं नाही. आता त्यांना त्या मंदिरांबद्दलही उत्सुकता वाढायला लागली.

ती मंदिरे कशी आहेत नवीन- जुनी, लहान- मोठी, त्यामध्ये काय काय आहे, असे सर्व प्रश्न त्यांच्या मनामध्ये गर्दी करत होते. आजीला त्यांनी हे प्रश्न विचारायला सुरुवात केली. सर्वजण पुन्हा या आठ मारुतींबद्दल विचारू लागले. “आजी जिलब्या, उन्ताडे, पत्र्या यांची मंदिरे कशी आहेत? तिकडे काय काय आहे? अजूनही जिलब्या मारुतीला जिलब्यांचा हार मिळतो का? आणि उन्ताडे मारुतीची काय खासियत?”, मुलांनी प्रश्नांचा भडीमार केला. आजीनेही ओळीने मंदिरांची माहीती द्यायला सुरुवात केली.


"जिलब्या मारुतीचं मंदिर सदाशिव पेठेत आहे. मंदिर एकदम छोटासं आहे. मारुतीची मुर्तीही लहान पण सुबक आहे. त्याच्या नावावरून त्याच्याच शेजारी ‘जिलब्या गणपती’ हे सार्वजनिक गणेश मंडळ स्थापन झाले".

"उन्ताडे मारुती मंदिर रस्ता पेठेत रस्त्याच्या मधोमध वसलेला आहे. मंदिरात आत गेल्यावर नंदीबैलाचे दर्शन होते. मंदिरात खूप देवांचे फोटोही आहेत. इथल्या मारुतीच्या कपाळावर बालाजीसारखा नाम आहे. कारण पूर्वीपासून इथे साउथ इं डिअन लोक राहतात आणि त्याचं बालाजी हे आराध्य दैवत असल्याने त्याला नाम आहे. इकडे हनुमान जयंतीच्या आठ दिवस आधी मोठ्या प्रमाणात भजन, कीर्तन व हवन होते आणि डिसेंबर महीन्यात दिपोत्सव साजरा होतो. असे आहे हे मंदिर". आजी म्हणाली.


"आजी; सोन्या, पासोड्या, पत्र्या मारुतींच मंदिर कस आहे? सोन्या मारुतीचं मंदिर पूर्ण सोन्याचा आहे का? आणि पासोड्या मारुतीच्या मंदिराशेजारी अजूनही पासोडे विकतात का?

“पासोड्या मारुती रविवार पेठेत. आता तिथे पुष्कळ विविध वस्तूंची दुकाने आहेत. लांब शेपटी, हातात गदा आणि पायाखाली राक्षस अशी याची मूर्ती. पासोड्या मारुतीनुसार येथे पासोड्या विठोबाच मंदिर खूप प्रसिद्ध आहे. मंदिराच्या कळसावर सुबक आकारात अनेक संत कोरलेले आहे.”


"सोन्या मारुतीचं मंदिर सोन्या मारुती चौकात आहे. त्याच्या आजूबाजूला खूप सारी सोन्याची दुकाने आहेत. हे मंदिर खूप खूप लहान पण सुंदर अशा संगमरवरी दगडापासून बनविल आहे. मंदिराच्या दारात दोन सुंदर हत्ती स्वागत करतात. आतमध्ये लहान मारुतीची मूर्ती असून त्याच्या मागे सूर्य कोरलेला आहे. आजूबाजूच्या भिंतीवरही हत्ती आणि लक्ष्मी कोरलेली आहे".

"पत्र्या मारुतीचं मंदिर नारायण पेठेत आहे. मंदिर एकदम लहान आणि मुर्तीही लहान. मंदिराच्या मागच्या बाजूला रथात बसलेला सूर्याचे चित्र आहे. या मंदिराच्या आजूबाजूला आमच्यासारख्या वृध्ांची मंडळी संध्याकाळच्या वेळी गप्पा मारत बसलेली पाहायला भेटेल". आजी हसून बोलली.


"भिकारदास मारुती कसा आहे? त्याच मंदिर लहान आहे का? आणि भितींना तडा गेलेल्या आहेत का?" मुलांनी विचारलं. आजी हसली व म्हणाली, "अरे मंदिर बऱ्यापेकी मोठं असून घाभारा पूर्ण काचेचा आहे. समोर रामाच्या पादुका ठे वलेले दिसतात. मूर्तीवर चांदीचा मुकुट, गदा असे दागिनेही आहेत".

"अच्छा आणि शनिपार व बंदिवान मारुतींच काय? ती मंदिरे कुठे आहेत?" मुलांचा प्रश्न.

"शनिपार, हे शनिपार चौकात म्हणजेच सदाशिव पेठेत आहे. शेजारीच शनिपार बस स्टाॅप. हे मंदिर मुळात शनी देवतेच असल्यामुळे इथला मारुतीही त्याच्याच नावाने ओळखला जातो. मंदिर मधोमध वसलेला असून मंदिराच्या समोर भिकार्यांची शनिवारी खूप मोठी रांग असते. मंदिरात पिंपळाचं झाडही आहे आणि मुख्य गाभार्याच्या मागे शंकर, विठ्ठल- रुक्मिनिचीही मंदिरे आहेत."


"बंदिवान मारुतीचं मंदिर रविवार पेठेत आहे. मंदिर जूनचं आहे. इथे हनुमाची मोठी मूर्ती असून त्याने एक हात वर व एक हात मांडीवर ठे वलेला दिसतो. या मंदिराच्या गाभार्यात स्त्रियांना प्रवेश नाही". आजीने सांगितलं.

अशाप्रकारे प्रसादच्या आजीने मुलांना माहीती दिली. मुलांना अजूनही माहीती ऐकायची इच्छा होती, पण आता शाळा सुटून बराच वेळ झाला होता. आजींनी मुलांना नंतर भेटण्याचे आश्वासन दिले. मुले मारुतीच्याच कल्पनेत घरी गेली.


दुसऱ्या दिवशी मोठ्या आनंदाने मुलांनी ही कल्पना बाईना सांगितली. त्यांनी मुलांचे कौतुक केले आणि फॅन्सी ड्रेस मध्ये त्यांना मारुती होण्याची परवानगी दिली. वर्गातल्या अजून तीन मुलांनीही यामध्ये सहभाग घेतला आणि फॅन्सी ड्रेसच्या स्पर्धेत मुलांनी पुण्यातल्या मारुतींची ओळख करून दिली.




मारुती एके दिवशी नेहमीप्रमाणे माता अंजना शंकर भगवानाची पूजा करत होती. बरोबर त्याच वेळी अयोध्याचा राजा दशरथ, पुत्रप्राप्तीसाठी हवन करत होते. त्याचा प्रसाद म्हणून राजा दशरथला गोड पायसम म्हणजेच खीर मिळाली, जी त्याच्या तीन पत्नींनी वाटू न खायची होती. जी खाल्याने त्यांना लवकरच पुत्र प्राप्ती होणार होती. परंतु अचानकपणे एका घारीने त्यातील काही खीर हिसकावून घेतली आणि त्याच्या कडून ती खाली पडली. माता अंजना जिथे पूजा करत होती तिथे ती खीर वाऱ्या मार्फ त जावून तिच्या पदरात पडली. माता अंजनाने ती खीर देवाचा प्रसाद म्हणून ग्रहण केला. त्यामुळे मारुती चा जन्म झाला आणि मारुती म्हणजेच मरुत्/ वारा असे हनुमानाचे नाव पडले.


गदा

मारुतीची गदा गोल असल्याने पृथ्वीप्रमाणे ती तेज, गोल फिरणारी, शक्तिशाली मानली जाते.जेव्हा गदा खाली जमिनीवर टेकलेली असते तेव्हा ती शांतीचे प्रतिक असते आणि जेव्हा ती आकाशात आणि मारुतीने पकङलेली असते, तेव्हा ती शक्तीचे प्रतिक असते.

शेंदरू

एके दिवशी सीता माता स्नान करून बाहेर आली. तिने तिच्या कपाळावर शेंदरू लावले. मारुतीने तिच्या कपाळावर शेंदरू बधीतले आणि कौतुकाने त्यामागचे कारण विचारले. तेव्हा सीता माताने सांगितले कि हे तिच्या पतीच्या म्हणजेच रामाच्या दीर्घ आयुष्यासाठी आहे. हे ऐकल्यावर मारुतीने त्या दिवशीपासून आपल्या स्वामीच्या म्हणजेच रामाच्या दीर्घ आयुष्यासाठी पूर्णच अंगावर शेदूर लावायला सुरुवात केली.

रुईच्या पानांचा हार

माता सीतेला रावणाच्या केदेतून सोडण्यासाठी मारुती लंकेला गेला. ितथे सीता माता अशोक वाटिकेत बसली होती. ती जेथे बसली होती तिथे एक रुईच्या पानांचं झाड होत. बाकीच्या राक्षसांपासून नजर चुकवण्यासाठी मारुतीने त्या पानांना स्वताच्या अंगावर धारण केले. त्यामुळे तो हळू च सीता मातेला भेटू शकला आणि रामाचा निरोप देवू शकला. त्यामुळेच मारुतीला रुईच्या पानांचा हार आवडतो.


मारुती मारुती हा मुळात संस्कृत शब्द मरुत् या नावावरून आला आहे. मरुत म्हणजे वारा! जो वार्याच्या वेगाप्रमाणे धावू शकतो, हा 'मारुती' या शब्दाचा अर्थ आहे.

शेपटी

१. जर मारुतीची शेपटी खाली जमिनीवर असेल तर ती मूर्ती दास मुर्ती म्हणून ओळखली जाते. २. जर मारुतीची शेपटी आकाशात असेल आणि ती ताठ असेल तर ती विराट मुर्ती म्हणून ओळखली जाते.

तेल

जेव्हा हनुमान द्रोणागिरी पर्वत आणायला चालला होता तेव्हा एका शत्रूने त्याला बाण मारला. त्यामुळे मारुती जखमी झाला. ती जखम भरण्यासाठी त्यावर त्याने शेंदरू आणि तेल याचं मिश्रण लावला.त्यामुळे ती जखम बरी झाली.त्यादिवसापासून मारुतीच्या मूर्तीवर शेंदरू आणि तेल लावलं जात.




“अरे मित्रांनो हीच तर गंमत आहे या सुपरहीरोची, तो आहे एक, पण त्याची नावे आहेत अनेक! नावे आहेत जरा विचित्र, ऐकून सांगा बरं, काय येतात तुमच्या डोळ्यासमोर चित्र?”

Puja Vanarse Visual Communication Industrial Design Centre(IDC) Indian Institute of Technology, Bombay, Mumbai- 4000 76

Contact: +91 89830 69679 Email: puja.vanarse@gmail.com


Turn static files into dynamic content formats.

Create a flipbook
Issuu converts static files into: digital portfolios, online yearbooks, online catalogs, digital photo albums and more. Sign up and create your flipbook.