सुिवचार
माझ्यासाठी वर्तमानकाळच सर्वकाही आहे. भविष्याची चिंता आम्हाला भ्याड बनवते, तर भूतकाळाचा भार तोडतो. } प्रेमचंद
मधुिरमा उद्या
एकूण पाने १२+४ =१६। किंमत ~३.००
दैिनक ¼ समूहाचे मराठी वृत्तपत्र
*
अकोला
कपिल-बत्रांत कलगीतुरा! . ९
गुरुवार २१ ऑगस्ट २०१४
कच्च्या तेलाच्या स्वस्ताईने ‘अच्छे िदन’चे संकेत . ८
संघर्षाची ठिणगी | नागपूर मेट्रोच्या भूमिपूजन समारंभाला उपस्थित न राहण्याचा िनर्णय
अपेक्षा जनतेच्या
राजकीय पक्षांनी त्यांचे जाहीरनामे बनवण्यापूर्वी जनतेच्या त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा आिण गरजा त्यांना कळाव्यात म्हणून जनतेशीच क्षेत्रनिहाय साधलेला थेट संवाद.
मोदींच्या दौऱ्यावर सीएमचा बहिष्कार जोडधंद्याला सवलतीत संसदीय इतिहासात बहिष्काराची पहिलीच वेळ
विशेष प्रतिनिधी | नवी दिल्ली, मुंबई
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमांमध्ये मुख्यमंत्र्यांना अपमानित करण्यात येत असल्यामुळे मोदींच्या कार्यक्रमात हजर राहू नका असे काँग्रेसने आपल्या मुख्यमंत्र्यांना बजावताच उद्या गुरुवारी नागपुरातील मेट्रोच्या भूमिपूजन समारंभावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतला आहे. यामुळे भारताच्या संसदीय राजकारणाच्या इतिहासात नव्याच संघर्षाला तोंड फुटणार आहे. मुंबईत सह्याद्रीवर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. उरण तसेच सोलापूर येथे गेल्या आठवड्यात झालेल्या पंतप्रधानांबरोबरच्या कार्यक्रमात मी सहभागी झालो होतो. िवशेष म्हणजे या कार्यक्रमाला आलेले बहुतांश लोक हे काही विशिष्ट हेतूने प्रेरित होऊन आले होते. त्यांच्या घोषणाबाजीतून तसे िदसून आले. असे प्रकार पुढे होऊ नये म्हणून नागपूरला न जाण्याचा मी िनर्णय घेतला आहे, असे मुख्यमंत्री उर्वरित. पान १२
न्यूज इनबॉक्स
एसटी प्रवास आजपासून महाग
सोलापूर | आिर्थक कचाट्यात सापडलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने २१ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून एसटीच्या दरात भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एसटीचा प्रवास आता आणखी महागणार आहे. ही भाडेवाढ प्रतिटप्पा ५ पैसे असणार आहे. नवे दर हे साधी, रातराणी, व निमआराम एसटी बसच्या प्रवासासाठी लागू असतील.
योगाचार्य बीकेएस अय्यंगार यांचे पुण्यामध्ये निधन
पुणे | योगाचार्य बेल्लूर कृष्णचंदर सुंदरराजा अय्यंगार (९६) यांचे बुधवारी रात्री पुण्याच्या रुग्णालयात िनधन झाले. त्यांच्यावर १२ ऑगस्टपासून उपचार सुरू होते. संबंधित . पान १२
सव्वा किलो सोन्याचा मुकुट तुळजाभवानीला
सांघिक भावनेला तडा
पंतप्रधानांच्या दोन कार्यक्रमांना मी गेलो होतो. या कार्यक्रमांत सांघिक भावनेला तडा गेल्याचे मला जाणवले. यापुढे असे होऊ नये म्हणून मी नागपूरच्या कार्यक्रमाला
जाणार नाही. -पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री
राजकीय स्वार्थासाठी हुल्लडबाजी
यामुळे काँग्रेस नाराज
Áमंगळवारी हरियाणातील कैथलमध्ये मोदींच्या उपस्थितीत लोकांनी मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह हुड्डा यांचे भाषण हुल्लडबाजी करून बंद पाडले होते. Á १६ ऑगस्टला सोलापुरातही चव्हाण यांना मध्येच भाषण थांबवावे लागले होते. लोकांनी ‘माेदी..माेदी’ अशी घोषणाबाजी केली होती.
जायला हवे. - विनोद तावडे, विरोधी पक्षनेते, विधान परिषद
राजकीय कट
काँग्रेसचे मुख्यमंत्री भाषणाला उभे राहताच त्यांचे भाषण बंद पाडले जाते व मोदी उभे राहिले की त्यांचा मुद्दाम जयजयकार केला जातो. हा कट आहे, अशी काँग्रेसची तक्रार आहे.
राज्य विरुद्ध केंद्र
देशाच्या संसदीय इतिहासात मुख्यमंत्र्यांनी असा बहिष्कार टाकण्याची पहिलीच वेळ आहे. शिष्टाचार म्हणून मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याची जुनी परंपरा आहे. या परंपरेला प्रथमच छेद दिला जात आहे. त्यामुळे राज्य विरूद्ध केंद्र संघर्ष तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
प्रतििनधी । नागपूर
नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पासह केंद्र सरकारच्या अनेक िवकास योजनांच्या शुभारंभाचे निमित्त साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी नागपुरातून िवधानसभा िनवडणुकीच्या िवदर्भातील प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत. त्यामुळे शासकीय स्वरूपाच्या या कार्यक्रमांवर निवडणूक प्रचाराचा राजकीय रंग चढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने मोदींच्या दौऱ्याला वादाची किनारही लाभली उर्वरित पान. १२
असा असेल मोदींचा दौरा
पंतप्रधान मोदी यांचे दुपारी ३ वाजता रांची येथून िवमानाने आगमन होणार आहे. िवमानतळावरून ते ३.४५ वाजता एनटीपीसीच्या कार्यक्रमासाठी मौद्याकडे हेिलकॉप्टरने प्रयाण करतील. मौदा येथील कार्यक्रम आटोपल्यावर ४.४५ वाजता ते हेिलकॉप्टरने पुन्हा नागपूर िवमानतळाकडे प्रयाण करतील. ५.१५ वाजता कस्तुरचंद पार्कच्या िदशेने प्रयाण करणार आहेत. ५.४५ वाजता पार्कवर मेट्रो रेल्वेच्या भूमिपूजन समारंभात ते उपस्थित राहतील. सायंकाळी ७.१० वाजता िवमानतळावरून िदल्लीकडे प्रयाण करणार आहेत.
नागपूर मेट्रोला कॅिबनेटची मंजुरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुरुवारी होणाऱ्या नागपूर दौऱ्याच्या पूर्वसंध्येला केंद्रीय मंित्रमंडळाने सुमारे १० हजार ५२६ कोटींच्या महत्त्वाकांक्षी नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पास मंजुरी िदली.
बुधवारी सायंकाळी झालेल्या मंित्रमंडळ बैठकीत या प्रकल्पास िहरवी झेंडी दाखवण्यात आली. गुरुवारी सायंकाळी नागपुरात पंतप्रधानांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे भूमिपूजन उर्वरित पान. १२
सरकारकडून दुष्काळग्रस्तांची फसवणूक केवळ तीन सवलतींवर बोळवण, राज्यभरातील १२३ टंचाईग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर प्रतिनिधी । मुंबई
टंचाईग्रस्त िकंवा दुष्काळग्रस्त भागास वििवध सात सवलती देण्याचा िनयम असताना नुकत्याच जाहीर केलेल्या राज्यातील १२३ टंचाईग्रस्त तालुक्यांची मात्र केवळ तीनच सुिवधांवर बोळवण करीत या तालुक्यातील शेतकरी व नागरिकांची राज्य सरकारने मोठी फसवणूक केली आहे. दुष्काळ जाहीर केला म्हणून जनतेची शाबासकी िमळवायची आिण या िनर्णयाचे खरे लाभ मात्र त्यांना िमळूद्यायचे नाहीत, असा प्रकार सरकारने केला आहे. गेल्याआठवड्यात १२३ तालुके टंचाईग्रस्त असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केले. मात्र तालुक्यांची यादी जाहीर करण्यास
शासनाने आठवड्याचा िवलंब केला. अखेर मंगळवारी महसूल व वन िवभागाने टंचाईग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर केली. मात्र टंचाई संदभार्त काढलेल्या शासन िनर्णयात केवळ तीनच सवलतींचा उल्लेख आहे. त्यामुळे दुष्काळाच्या अस्मानी झळा सहन करणाऱ्या १२३ तालुक्यांतील जनतेस चारा छावण्या िकंवा रोजगार पुरविणे यांच्यासह चार सवलतींना मुकावे लागणार आहे. टंचाईग्रस्त १२३ तालुक्यापैकी सवािधक तालुके औरंगाबाद िवभागातील आहेत. या िवभागातील तब्बल ६४ तालुके टंचाईग्रस्त आहेत. एकट्या नांदेड िजल्ह्यातील १६ तालुक्यांचा टंचाईगस्तांच्या यादीत समावेश आहे. जालना, परभणी आिण िहंगोली या िजल्ह्यातील सर्व तालुके टंचाईग्रस्तांच्या यादीत आहेत. मात्र उस्मानाबाद, बीड, लातूर आिण औरंगाबाद िजल्ह्यातील १३ तालुके वगळले आहेत. टंचाईग्रस्त भागासाठीच्या सवलती: शेतसारा माफी, शालेय िवद्यार्थ्यांना फीस उर्वरित पान. १२
टंचाईग्रस्त तालुके
िवधानसभेला फटका
अल्प पर्ज्यन्यमान झालेल्या अनेक तालुक्यांचा समावेश टंचाईग्रस्त गावांच्या यादीत नाही. त्यामुळे तेथील लोकप्रतिनधी व जनतेत असंतोष िनर्माण होणार असून त्याचा फटका िवद्यमान आमदारांना आगामी िवधानसभा िनवडणुकीत बसण्याची दाट शक्यता आहे.
अमरावती िवभाग : बुलढाणा (िचखली, देऊळगावराजा, मेहकर, िसंदखेड राजा, लोणार, खामगाव, शेगाव, मलकापूर, मोताळा, नांदुरा). वाशीम (िरसोड, मालेगाव, मानोरा). यवतमाळ (यवतमाळ, कळंब, िदग्रस, आणी, पुसद, उमरखेड, महागाव, वणी, मोरेगाव, झरी-जामणी, केळापूर,घाटंजी, राळेगाव). नागपूर िवभाग : चंद्रपूर (चंद्रपूर, मुल, गोंडििपंपरी, वरोरा, भद्रावती, नागभीड, राजुरा, कोरपना, बल्लारपूर, पोंभुर्णा, िजवती). गडचिरोली.(िसरोंचा).
घाटंजी तालुक्यात वीज पडून चार महिला ठार प्रतिनिधी । यवतमाळ
४२ लाख रुपये किंमत
मुख्यमंत्र्यांचा िनर्णय हा रडीचा डाव आहे. मोदींची वाढती लोकप्रियता पाहून त्यांच्या मनात ईर्षा निर्माण झाली असावी. त्यांनी रडीचा डाव न खेळता कार्यक्रमाला
पंतप्रधानांचे कार्यक्रम भाजप पक्षाचे कार्यक्रम समजत आहे. भाजप कार्यकर्त्यांकडून मुख्यमंत्र्यांना हेतुत: अपमानित केले जात आहे. या घटनांमागे राजकीय स्वार्थ आहे. जे हरियाणात घडले तेच महाराष्ट्रातही घडले .- शकील अहमद, काँग्रेस सरचिटणीस.
दोन घटनांमधील मृतांत दोन मुलीही
कुलस्वामिनी श्रीतुळजाभवानी मातेला बुधवारी एका भाविकाने सव्वा किलो वजनाचा सोन्याचा मुकुट अर्पण केला. आईच्या इच्छेनुसार : नगर जिल्ह्यातील शेवगाव येथील भाविक दिनेश लवाट यांनी दिवंगत आईच्या इच्छेनुसार हा मुकुट अर्पण केला.
हा रडीचा डाव!
योजनांच्या आड प्रचाराचा बिगुल
शेतात काम सुरू असताना अचानक वीज कोसळून चार महिला ठार झाल्या. मृतांमध्ये दोन मुलींचा समावेश आहे. घाटंजी तालुक्यात दोन िठकाणी बुधवारी दुपारी ३ ते ४ च्या सुमारास या घटना घडल्या. गेल्या काही महिन्यांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने मंगळवारी िजल्ह्यात काही िठकाणी हजेरी लावली. त्यात िवजांचा कडकडाट सुरू झाला होता. त्यातच घाटंजी तालुक्यात येणाऱ्या दत्तापूर झाटाळा िशवारात दुपारी ४ वाजताच्या सुमारास शेतातील कामे सुरू होती. त्याच वेळी विजांच्या कडकडाटासह
पाऊस कोसळला. पावसादरम्यान बापूराव मंगाम यांच्या शेतात काम करीत असलेल्या महिलांवर वीज कोसळली. त्यात वंदना िवजय मंगाम वय २५, ममता बाबाराव मंगाम वय १४ आणि परिंदा लक्ष्मण मंगाम वय १५ या तिघींचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या वेळी आजूबाजूच्या शेतात काम करणाऱ्या गावकऱ्यांनी त्या िठकाणी धाव घेतली, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. दुसरी घटना घाटंजी तालुक्यातील सदोबा मंगी िशवारात दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली. त्या िठकाणीही अचानक कोसळलेल्या विजेमुळे मीराबाई नारायण अजीरकर वय ५७ यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पारवा पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.
जपानची ‘बोधगया’ समजल्या जाणाऱ्या वाकायामा प्रांतातील कोयासानमध्ये भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य पुतळा उभारण्याची तयारी जपान सरकारने सुरू केली आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत सामंजस्य करार केला असून पुतळा उभारणीच्या कामास लवकरच प्रारंभ होत आहे. बाबासाहेबांचा हा पुतळा जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या
वर्ष २ } अंक ३६ } महानगर
जपानी भिक्खूंसाठी बुद्धविहार
जपानी बौद्ध भिक्खूंना जगप्रसिद्ध अजिंठा-वेरुळ लेणींचा अभ्यास करणे सोयीचे जावे म्हणून जपान औरंगाबादेत भिक्खूंसाठी बुद्धविहार (मॉनेस्ट्री) उभारणार आहे. विचारांनी प्रभावित होऊन जपान सरकारने हा निर्णय घेतला आहे. उभय देशांतील नागरिकांना सहजतेने ये-जा करता यावी आणि धार्मिक पर्यटनही करता यावे यासाठी जपान सरकारने पुढाकार घेतला आहे. जपान सरकारने बाबासाहेबांच्या पुतळ्यासाठी वाकायामा प्रांतातील कोयासानमध्ये दैिनक भास्कर समुह
१४ राज्ये } ५८ आवृत्त्या
मोठी जागा दिली असून भारतात तयार झालेला भव्य पुतळा तेथे उभारला जाणार आहे. त्यासाठी पन्नास लाख रुपयांची तरतूद केली आहे. राज्य सरकारने ही जबाबदारी महाराष्ट्र पर्यटन महामंडाळावर (एमटीडीसी) सोपवली असून एमटीडीसीच्या वरिष्ठ व्यवस्थापकांची एक
टीम िदव्य मराठी | औरंगाबाद िवधानसभा िनवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू आहे. लवकरच रणशिंग फुंकले जाईल. रणधुमाळी आटोपली की नवे सरकार सत्तेवर येईल. या नव्या राज्यकर्त्यांकडून जनतेच्या नेमक्या काय अपेक्षा आहेत ते जाणून घेण्यासाठी ‘िदव्य मराठी’ने सर्व आवृत्तीक्षेत्रांत ‘टाॅक शो’ आयोिजत केले आहेत. िवविध क्षेत्रांतील मान्यवरांची मते यात जाणून घेतली जात आहेत. याच मािलकेत सर्वप्रथम शेतीशी संबंिधत मुद्द्यांवर चर्चा घडवून आणण्यात आली. यात पुढे आलेले मुद्दे संिक्षप्त रूपात असे.
{जोडधंद्यांसाठी पीक कर्जाप्रमाणे ६ टक्के व्याजाने कर्ज द्यावे. {शेती िवषयाचा पहिलीपासून िशक्षणात समावेश करावा. {त्रुटींचा आढावा घेऊन नव्या योजना अमलात आणाव्यात {चार-पाच गावांचे क्लस्टर करून गटशेतीला चालना द्या. {सहा तासच, पण दिवसा वीज द्यावी. नवे तंत्रज्ञान िशकवावे. {बीजोत्पादन गावातच व्हावे. िठबक िसंचन सक्तीचे करावे. {शेअर बाजाराप्रमाणे शेतीसाठी कृषी निर्देशांक असावा. {उत्पादन होणाऱ्या िपकावर गावातच प्रक्रिया उद्योग हवेत. {प्रयोगशाळा व मार्गदर्शन केंद्रे तालुका पातळीवर असावीत. {फसवणाऱ्या िबयाणे, खते कंपन्यांवर बंदी घालावी. {शासकीय योजनांसाठी पेपरलेस कार्यपद्धती सुरू करावी. {रोजगार हमी योजनेद्वारे शेती मशागतीची कामे करावीत. {शालेय पोषण आहारात जळगावची केळी असावी. {भौगोिलक िस्थतीनुसार िनयोजन, आराखडा सरकारने करावा. {यांित्रकीकरणास चालना, अवजारनििर्मतीस प्रोत्साहन.
{फळे, भाजी वाहतुकीसाठी रेल्वेला कोल्ड स्टोरेज डबा जोडा. {माती परीक्षणावर शेतकऱ्याला साॅइल हेल्थ कार्ड देण्यात यावे. {कृषी मूल्य आयोगावर थेट शेतकऱ्यांचे प्रतििनधी हवेत. {कालव्यांतून पाणीवाटप धोरण बदलून पाइपद्वारे पाणी द्यावे.
८४ मान्यवरांचा 0६ चर्चेत सहभाग िठकाणी
एकाच वेळी शेतकरी, शेतीतज्ज्ञ, बाजार झाली चर्चा जलतज्ज्ञ, समित्यांचे पदािधकारी, कृषी व िसंचन १०० खात्यातील अिधकारी, हून अिधक
आल्या सूचना
राजकीय पदािधकारी, उद्योजक, व्यापारी यांचा समावेश.
{कृषी िवद्यापीठांकडून िरव्हििजट संशोधन करण्यात यावे. {स्कूल आॅफ एनर्जीकडून वीज स्वयंपूर्णतेचे प्रशिक्षण द्यावे. {प्रत्येक िज.प. गटात स्वतंत्र शीतगृह उभारणी करा. {नदीजोड प्रकल्प मार्गी लावावा. {आयात निर्यातीचे िनश्चित धोरण. {शेतीत सरकारचा हस्तक्षेप नको. {भ्रष्टाचारमुक्त पाणलोट योजना. {पुरेशी वीज उपलब्ध करून द्या.
वृत्तसंस्था । मुंबई
िववेकाचा बुलंद आवाज कायम ठेवू
महाराष्ट्रात तयार होणार पुतळा, एमटीडीसीकडे जबाबदारी
आशिष देशमुख | औरंगाबाद
औरंगाबाद, नािशक, नगर, जळगाव, सोलापूर, अकोल्यामध्ये चर्चासत्र
विवाहित मुलगी माहेरच्या कुटुंबाची सदस्य : हायकाेर्ट
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खूनाला वर्ष उलटले तरीही अद्यापही त्यांच्या मारेकऱ्यांचा शोध लागला नाही. त्याच्या निषेधार्थ पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या निषेध मोर्चात परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते सहभागी झाले होते. अभिनेता नसिरूद्दीन शहा, डॉ. श्रीराम लागू, अमोल पालेकर, सोनाली कुलकर्णी, दिग्दर्शक सुनील सुकथनकर, नागराज मंजुळे यांच्यासह राज्यातील मान्यवरांनी विवेकाचा आवाज बुलंद करण्याचा निश्चय केला.
िवमानतळाची जपानच्या बोधगयेत बाबासाहेबांचा पुतळा िशवणी सुनावणी पुढे ढकलली कर्तृत्वाचा गाैरव
कर्ज द्या, पहिलीपासून शेती िवषय िशकवा
टीम नुकतीच जपान दौरा करून आली आहे. टोकियोतील जपान पर्यटन मंडळाच्या कार्यालयात एमटीडीसीचे कार्यालय सुरू होऊन दोन महिने झाले आहेत. तेथे कामही सुरू झाले आहे. त्यामुळे भारतातील पर्यटकांना राहण्यासाठी हक्काची जागा मिळाली आहे, असे एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.जगदीश पाटील पाटील यांनी सांगितले. २०१५ पर्यंत भव्य पुतळा : जपान व महाराष्ट्र सरकारच्या सामंजस्य करारानुसार हा पुतळा महाराष्ट्र सरकार उर्वरित पान. १२
प्रतििनधी । नागपूर
अकोला िवमानतळप्रकरणी बुधवार, २० ऑगस्ट रोजी सुनावणी होणे अपेक्षित होते. प्रकरण न्या. वासंती नाईक आणि न्या. अतुल चांदरू कर यांच्यासमोर सुनावणीला आले. परंत,ु न्यायमूर्तींनी प्रकरण नॉट बिफोर मी केल.े त्यामळ ु े या प्रकरणावर आता एका आठवड्याने सुनावणी होण्याची शक्यता आहे. विमानतळ प्राधिकरणाने शिवणी िवमानतळाला नॉन ऑपरेशनल म्हणून घोषित केले आहे तसेच एआयआयच्या िनकषानुसार १५० किमी अंतराच्या आतमध्ये दुसरे विमानतळ बांधता येत नाही. महाराष्ट्र सरकारने अमरावती येथील बेलोरा विमानतळ बांधण्यासाठी ३०० एकर जमीन संपादित केली आहे. तेथनू अकोला विमानतळ ७० किलोमीटर अंतरावर आहे. विदर्भ असोसिएशन रिसर्च टेक्नॉलॉजी अँड डेव्हलपमेंट इन अॅग्रीकल्चर अँड रुरल सेक्टर या संघटनेने विमानतळाच्या िवस्तारीकरणासंदर्भात उच्च न्यायालयात यािचका दाखल केली आहे.
मध्य प्रदेश }छत्तीसगड }राजस्थान }नवी दिल्ली }पंजाब }चंदिगड }हरियाणा }हिमाचल प्रदेश }उत्तराखंड }झारखंड }जम्मू-काश्मीर }बिहार
}गुजरात }महाराष्ट्र
विवाहित मुलगीही माहेरच्या कुटुंबाची सदस्य असल्याचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारचा शासनादेश फेटाळताना बुधवारी दिला. रंजना अाणेराव यांच्या याचिकेत शासनादेशाला आव्हान देण्यात आले होते. अन्न आणि पुरवठा मंत्रालयाने २० फेब्रुवारी २०१४ रोजी हा आदेश जारी केला होता. त्यात विवाहित मुलगी तिच्या माहेरच्या कुटुंबाची सदस्य नसल्याचे ठरवण्यात आले होते. याआधारे रंजना यांना केरोसिन विक्रीचा परवाना मिळण्यासाठी अपात्र ठरवण्यात आले होते. रंजना यांच्या आईच्या नावावर केरोसीनचा परवाना आहे. तो आपल्याला मिळावा अशी मागणी त्यांनी केली होती. मात्र रंजना यांचे लग्न झालेले असल्यामुळे शासनादेशाचा बडगा दाखवत त्यांना तो नाकारण्यात आला. यामुळे त्या अपात्र असल्याचा त्यांच्या भावाचा दावा ग्राह्य धरण्यात आला. त्याविरोधात रंजना यांनी कोर्टात धाव घेतली. न्यायमूर्ती अभय ओका आणि ए.एस. चांदुरकर यांच्या खंडपीठाने सुनावणीत भावाचा दावा तसेच जीआर दोन्हीही फेटाळून लावले.
आता पोिलस भरतीत कर्मचाऱ्यांच्या वारसांना िमळणार ५ टक्के आरक्षण िवशेष प्रतिनिधी | मुंबई
नव्या महापािलकांना िमळणार अनुदान
िवधानसभा िनवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आघाडी सरकारने लोकप्रिय िनर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. बुधवारी झालेल्या मंित्रमंडळ बैठकीत राज्यातील पाेिलस कर्मचाऱ्यांच्या वारसांना पाेिलस शिपाई भरतीमध्ये ५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात अाला. अंशकालीन पदवीधरांसाठी राखीव समांतर आरक्षणापैकी ३ टक्के आरक्षण हे कर्मचाऱ्यांच्या पाल्यासाठी ठेवण्यात येईल. पोलिस अंशकालीन पदवीधरांसाठी राखीव समांतर आरक्षणापैकी २ टक्के आरक्षण हे सेवेत कार्यरत असताना निधन झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना अनुकंपा तत्त्वावर नियुक्तीसाठी राखीव ठेवण्यात येईल. अपंग िवद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ : अपंग
लातूर, परभणी व चंद्रपूर या नव्या महापािलकांना पुढील पाच वर्षे १०० टक्के सहायक अनुदान देण्यात येणार आहे. या शहरांमध्ये पूर्वी नगर परिषदा होत्या. त्यांचे महापािलकेत रूपांतर झाल्यानंतर िवविध जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी अनुदान िमळेल.
}महाराष्ट्र
िवद्यार्थ्यांच्या िशष्यवृत्तीत वाढ करण्याच्या िनर्णय झाला. पहिली ते चौथीसाठी १००, पाचवी ते सातवी १५०, आठवी ते दहावी २०० रुपये, तर अपंगांच्या कार्यशाळेसाठी ३०० रुपये िमळतील. पोिलसांना गणवेश भत्ता : पोिलस िशपाई ते सहायक पाेिलस उपनिरीक्षक या पदापर्यंतच्या कर्मचाऱ्यांना सािहत्य देण्याऐवजी यापुढे गणवेश भत्ता देण्याचा िनर्णयही मंित्रमंडळाने घेतला अाहे.
}मुंबई }बेंगळुरू }पुणे }अहमदाबाद (सुरत) }जयपूर
}७ राज्ये }१७ केंद्रे