Latest amrawati news in marathi

Page 1

िवधानसभा २०१४ िवधानसभेच्या िनम्म्या जागा भाजपला िमळाव्यात, अशी अामच्या पक्षाध्यक्षांची भूिमका अाहे. मात्र, महायुतीतील जागावाटप हे सामाेपचारानेच हाेईल. मला दिल्लीत बसून महाराष्ट्राची प्रगती पाहायची आहे. मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत नाही . - िनतीन गडकरी, केंद्रीय मंत्री तथा भाजप ने​ेते (एका मुलाखतीत)

भाजप अामदार पंकजा मुंडे यांच्या संघर्ष यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप मंगळवारी (ता. २ सप्टेंबर) औरंगाबादेत एका रॅलीद्वारे होणार आहे. या वेळी केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांची प्रमुख उपस्थिती राहील.

अमरावती }साेमवार, १ सप्टेंबर २०१४ }४

शेकापच्या मीनाक्षी पाटील रिंगणाबाहेर, भावाला उमेदवारी प्रतिनिधी {मुंबई

शेतकरी कामगार पक्षाच्या बालेिकल्ल्यातील हुकमी उमेदवार मीनाक्षी पाटील या वेळी िवधानसभेची िनवडणूक लढवणार नाहीत. त्यांच्या जागी मीनाक्षी पाटील व भाई जयंत पाटील यांचे बंधू सुभाष ऊर्फ पंिडतशेठ पाटील यांना उमेदवारी देण्याचा पक्षाने िनर्णय घेतला अाहे. रायगड िजल्हा म्हणजे शेकापचा बालेिकल्ला. या िजल्ह्यात प्रभाकर पाटील आिण दत्ता पाटील या बंधूंनी शेकापचा वेलू गगनावरी नेला. त्यामुळे पाटील शेकाप राज्यात बंधंूनंतर त्यांच्या ितसऱ्या ६० जागा लढवणार िपढीपर्यंत लाल बावटा शेकाप या वेळी िवधानसभेच्या अिस्तत्व िटकवून आहे. ६० जागा लढवणार आहे. या अिलबाग मतदारसंघातून सलग चार वेळा प्रभाकर पक्षाचे सध्या िवधानसभेत ४ पाटील यांची कन्या आिण परिषदेत एक सदस्य मीनाक्षी पाटील यांना आहे. शेकापचे गोठवलेले पारंपरिक खटारा िनवडणूक पक्षाने उमेदवारी िदली होती. १९९५, २००४ आिण चिन्ह त्यांना नुकतेच परत २००९ मध्ये त्या िवजयी िमळालेले आहे. शेकाप झाल्या. १९९९ मध्ये त्यांचा ितसऱ्या आघाडीचा या वेळी अवघ्या पंधराशे मतांनी कॅप्टनही आहे. त्यामुळे हा पराभव झाला. िवलासराव पक्ष सध्या फाॅर्मात आहे. देशमुख मंत्रिमंडळात त्यांनी मत्स्य व बंदरे मंत्री म्हणून कामही केले. या वेळी शेकापने मीनाक्षी पाटील यांच्याऐवजी त्यांचे धाकटे बंधू पंिडत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पंिडत पाटील जसे मीनाक्षी यांचे बंधू आहेत तसेच शेकापप्रमुख भाई जयंत पाटील यांचेही बंधू होत. पंिडत पाटील यांनी रायगड िजल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषवलेले आहे. या मतदारसंघातून शेकापचे सरचिटणीस भाई जयंत पाटील यांना स्वत:ची सून आिण पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रमुख िचत्रलेखा पाटील यांना ितकीट द्यायचे होते. परंतु पक्षाचे प्रमुख असूनही त्यांना ते शक्य झालेले िदसत नाही.

ितसरी अाघाडी देणार लढा

िवधानसभेसाठी शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली ितसऱ्या अाघाडीची स्थापना करण्यात अाली अाहे. त्यात शेकापसह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, जनता दल (सेक्युलर), सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (सेक्युलर), रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया (आर.के.) हे पक्ष सहभागी झाले अाहेत.

प्रथमच िवधानसभेच्या रिंगणात उतरणाऱ्या मुख्यमंत्र्यांची चाेहाेबाजूंनी काेंडी

िवधानसभा िजंकण्याबराेबरच राष्ट्रवादीला शह देण्याची तयारी मधुसूदन पत्की {सातारा

पारदर्शी कारभाराचा अाग्रह धरत गेली तीन वर्षे राज्याचा गाडा हाकणारे ‘िमस्टर क्लीन’ मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमाेर अागामी िवधानसभा िनवडणुकांचे माेठे अाव्हान असेल. राज्यात पुन्हा काँग्रेसचे सरकार अाणणे, अापला सातारा िजल्हा राष्ट्रवादीच्या ताब्यातून परत िमळवणे व प्रथमच िवधानसभेच्या िरंगणात उतरताना पक्षांतर्गत बंडाळी राेखून िवजय िमळवणे या तीन बाबींवर त्यांच्या नेतृत्वाची कसाेटी अाहे. लाेकसभेच्या पराभवाचे भांडवल करत पक्षांतर्गत िवराेधक व िमत्रपक्षांनीही नेतृत्व बदलाचे शर्थीचे प्रयत्न करूनही हायकमांडने पृथ्वीराज चव्हाणांच्याच नेतृत्वाखाली िवधानसभा लढवण्याचे फर्मान साेडल्याने चव्हाणांनी प्राथमिक लढाई तर िजंकली अाहे. अाता पक्षातील गट-तट व काँग्रेसला अडचणीत अाणण्याची एकही संधी न साेडणारा िमत्रपक्ष राष्ट्रवादीला साेबत घेऊन राज्यात िनर्माण झालेले महायुतीचे वादळ शमवण्यासाठी चव्हाणांना शर्थीचे प्रयत्न करावे लागतील.

हायकमांडच्या मर्जीचे पाठबळ

‘अाधी जनतेतून िनवडून येऊन दाखवा’ असे टाेमणे वारंवार खाल्ल्याने पृथ्वीराज चव्हाणांनी यंदा दक्षिण कराडमधून िवधानसभा िनवडणूक लढवण्याचे ठरवले अाहे. यापूर्वी तत्कालीन कराड लाेकसभा मतदारसंघातून ते तीन वेळा िवजयी झाले अाहेत. मात्र राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर या पक्षाचे नेते श्रीिनवास पाटील यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर चव्हाणांनी पुन्हा िनवडणूक लढवली नाही. मात्र काँग्रेस हायकमांडच्या मर्जीतील असल्याने ते कायमच िदल्लीच्या वर्तुळात चांगल्या पदावर रािहले. याच िनष्ठेतून अडचणीच्या काळात त्यांच्या गळ्यात मुख्यमंित्रपदाची माळ पडली.

राज्याबराेबरच अापल्या गावातही नेतृत्व िसद्ध करताना लागणार बाबांचा कस

कामांचा धडाका, पण लीडरशिपचा अभाव

तीन टर्म खासदारकी िकंवा मुख्यमंत्रिपद िमळाल्यानंतरही चव्हाणांना अजूनही अापल्या सातारा िजल्ह्यात त्यांना ‘मास लीडर’ बनता अालेले नाही. िवशेष म्हणजे ‘क्लास लीडर’ ही अापली प्रतिमा बदलण्याचा त्यांनी कधीही प्रयत्नही केला नाही. मात्र अाता दक्षिण कराडमधून िवधानसभा लढण्याचे ठरवल्याने तर शनिवार-रविवार कराडला येण्याचा िशरस्ता मात्र त्यांनी ठेवला अाहे. गेल्या दोन महिन्यांपासून उद्​्घाटने िकंवा जनता दरबाराच्या िनमित्ताने ते गावच्या लाेकांना अापलेसे करण्याचा बाबांना टेन्शन : खूर्ची िमळवण्यापेक्षा ती िटकविणे िकती अवघड बनले अाहे, याच िवचारांचे वादळ प्रयत्न करताना िदसतात. सध्या मुख्यमंत्र्यांच्या मनात घाेंगावत असेल.

कराड मतदारसंघातून पक्षातून बंडाचे संकेत

मतदारांना हवाय जवळचा वाटणारा नेता

साताऱ्याच्या िवकासासाठी मुख्यमंत्र्यांनी गेल्या दाेन वर्षांत अनेक िनर्णय घेतले, परंतु अजूनही दक्षिण व उत्तर कराड मतदारसंघावर त्यांची छाप पडलेली नाही. याचे कारण म्हणजे त्यांच्याकडे असलेल्या तळातील कार्यकर्त्यांचा अभाव. अाता दर अाठवड्याला चव्हाण मतदारसंघात येत असले तरी मतदारांना ते अजूनही अापलेसे वाटत नाहीत. सामान्य माणसाला अापल्या घरात येऊन सुख-दु:खात िवचारपूस करणारा नेता हवा असताे. दक्षिण व उत्तर कराडचे अामदार अनुक्रमे विलासराव पाटील उंडाळकर व बाळासाहेब पाटील हे सामान्यांना थेट उपलब्ध हाेतात. त्यामुळे अाजही येथील मतदारांना चव्हाणांपेक्षा ही पाटील मंडळीच जवळची वाटते.

उंडाळकरांचे हात दगडाखाली राष्ट्रवादीला राेखण्यासाठी

चव्हाणांिवराेधात बंडाच्या तयारीत असलेले काँग्रेसेच अामदार उंडाळकर यांचा मुलगा सातारा जिल्ह्यातील अाठपैकी केवळ एकच उदयसिंह पाटील पै. संजय पाटील खून मतदारसंघ काँग्रेसकडे अाहे, ताेही दक्षिण प्रकरणात अडकलेला अाहे. त्यामुळे सध्या कराडचा. येथील अामदार िवलास पाटील तरी ते चव्हाणांना जाहीर िवराेध करण्यास उंडाळकरांच्या जागेवरच अाता मुख्यमंत्री दावा धजावत नाहीत. मात्र दक्षिण कराडमध्ये करत अाहेत. मात्र पक्षातही असूनही चव्हाणांना त्यांना नाराज करून चव्हाणांना िनवडणूक िवराेध करणारे उंडाळकर काेणत्याही लढवणे साेपे जाणार नाही. या मतदारसंघात परि​िस्थतीत िनवडणूक लढवण्याच्या तयारीत िशवसेना-भाजपचा फारसा जाेर नसला तरी अाहेत. प्रसंगी बंड करण्याचीही त्यांची तयारी स्वकीयांचेच अाव्हान पेलणे चव्हाणांना जड अाहे. या मतदारसंघात उंडाळकरांचा सहकारी जाऊ शकते. त्यामुळे उंडाळकरांची नाराजी साखर कारखाना अाहे. अनेक साेसायट्या, चव्हाण कसे दूर करतात, यावरच त्यांच्या पंचायत समित्याही त्यांच्या ताब्यात असून िवजयाचे भवितव्य अवलंबून अाहे. कार्यकर्त्यंाचेही माेठे जाळे अाहे.

अशी केली साखरपेरणी

सध्या राष्ट्रवादीच्या वर्चस्वाखाली असलेल्या सातारा िजल्ह्यात काँग्रेसचे बळ वाढवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी जय्यत तयारी सुरू केली अाहे. काही िदवसांपूर्वीच त्यांनी अापले समर्थक व िजल्हाध्यक्ष अानंदराव पाटील यांची िवधान परिषदेवर वर्णी लावली. त्यापाठाेपाठ फलटणचे रणजितसिंह निंबाळकर यांना कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष केले. त्यांनी लाेकसभेत राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे यांच्यािवराेधात भूिमका घेतली हाेती. त्याचीच ही बक्षिसी मानली जाते. तसेच राष्ट्रवादीचे पालकमंत्री शशिकांत शिंदे यांनाही शह देण्याची त्यामागे रणनीती अाहे.

पक्षाने दिलेला उमेदवार कलमाडींच्या पुणे फेस्टिव्हलमध्ये असेल सर्वांना मान्य रंगणार सर्वपक्षीय पुढाऱ्यांचा मेळा बाळापूर विधानसभा मतदारसंघ

प्रतिनिधी | अकोला भारतीय जनता पक्षात पाचही विधानसभा मतदारसंघापैकी सर्वाधिक इच्छुकाच ं ी संख्या बाळापूर विधानसभा मतदारसंघात आहे. त्यामळ ु े हा मतदारसंघ पक्ष प्रमुखांसाठी डोकेदख ु ी ठरला आहे. परतं ु इच्छुकांमधील पाच ते सहा जण वगळता इतर सर्व इच्छुकांनी तसेच पक्षाचे चारही तालुका मंडळ अध्यक्ष, शहराध्यक्ष आणि विविध आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाकडे पक्ष जो उमेदवार ठरवेल, त्याच्यासाठी काम करण्याची लेखी हमी दिली आहे. त्यामळ ु े पक्ष श्रेष्ठींची डोकेदख ु ी काही प्रमाणात का होईना कमी झाली आहे. तसेच पक्षाच्या िनष्ठावान आणि सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी, अशी मागणीही केली आहे. त्यामळ ु े पुन्हा एकदा प्रस्थापितांविरुद्ध सामान्य कार्यकर्ता अशी रंगत निवडणुकीपूर्वीच होण्याची शक्यता आहे.बाळापूर मतदार संघात भाजपला यश मिळण्यापर्वी ू ही साथ देणारा ठरला होता. तर १९९० मध्ये भाजपला या मतदारसंघात

िवश्लेषण

पहिला विजय िमळाला. त्यानतं र १९९५ मध्हये ी पक्षाची सरशी झाली. परतं ु १९९९ मध्ये पराभवाचा सामना करावा लागला. पुन्हा २००४ मध्ये भाजपला ही जागा जिंकता आली. पण २००९ मध्ये आपसी मतभेदामुळे पराभवाचा सामना करावा लागला. त्यामळ ु े या मतदारसघं ाकडे १९९० पासून भाजपचा गढ म्हणुन पाहिले जाते. त्यामळ ु च े या मतदारसघं ातुन निवडणुक लढविण्यासाठी अनेक जण इच्छुक आहेत. इच्छुकाच ं ी रागं मोठी असली तरी तेजराव थोरात, विजय अग्रवाल, डॉ.रणजित पाटील, डॉ.जगन्नाथ ढोणे यांच्यात खऱ्या अर्थाने रस्सीखेच सुरु आहे. पक्षाने यावेळी पक्षाचे अनेक वर्षापासून निष्ठेने काम करणाऱ्या कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी, अशी मागणी कार्यकर्त्यांकडनु च होत आहे. यापूर्वी पक्ष फोफावला नसताना तसेच पक्षाचे जिवापाड काम करणाऱ्या (कै.) वसतं राव देशमुख यानं ा पक्षाने याच मतदारसघं ातून उमेदवारी दिली होती. त्याच धर्तीवर पक्षाने सामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी, असा सुरु कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रियेतनू व्यक्त होत आहे. यात तेजराव थोरात याच ं े नाव पुढे आहे. जनसघं ापासून ते पक्षाचे कार्यकर्ते आहेत.

गणेशाच्या सार्वजनिक मंडपात इच्छुक उमेदवारांची वाढती गर्दी

पावती किमान २५ हजारांची

आमदारकीसाठी इच्छुक राजकीय नेते दर्शन किंवा आरतीच्या निमित्ताने गणपतीला जात आहेत. प्रत्येक मंडळपुढे किमान २५ हजार रुपयांची पावती फाडल्याशिवाय त्यांना मंडपातून बाहेर पडता येत नाही. मंडळ किती जुने, किती प्रसिद्ध तसेच त्यांच्याकडील कार्यकर्त्यांचा संच किती मोठा या निकषानुसार या वर्गणीचा आकडा वाढत जातो. आपापल्या मतदारसंघातील सर्व प्रमुख गणपती मंडळांची पावती सर्वच इच्छुकांना फाडावी लागते. ही सर्वच मंडळी पाठीशी उभी राहत नाहीत, हे माहिती असूनही केवळ नाराजी नको म्हणून पावतीचे सोपस्कार पार पाडावे लागते, असे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले. काही गणेश मंडळांची तर संपूर्ण अािर्थक जबाबदारीच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी उचली अाहे. िवधानसभा िनवडणुकीची अाचारसंिहता गणेशाेत्सव संपल्यानंतर लागणार असल्याचे स्पष्ट झाल्याने सर्वच पक्षांच्या इच्छुकांनी या दहा िदवसात हात माेकळा साेडल्याचे िचत्र राज्यभर िदसत अाहे.

िवशेष प्रतिनिधी {पुणे राजकीय दृष्टिकोनातून सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या लोकमान्य टिळकांचा पुण्यातला यंदाचा उत्सव अधिकच ‘राजकीय' झाला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मतदारांशी संपर्क साधण्याची संधी म्हणून राजकीय पुढारी गणेशोत्सवाकडे पाहत आहेत. प्रचारकाळात उपयोगी पडू शकणाऱ्या गणेश मंडळांच्या शेकडो तरुण कार्यकर्त्यांवरही या ‘माननीयां'ची नजर आहे. लाेकसभा निवडणूक काळात ‘राष्ट्रकुलदीपक' म्हणून देशभर ज्यांची हेटाळणी केली गेली त्या सुरेश कलमाडी यांच्या ‘ग्लॅमरस' पुणे फेस्टिव्हलला अाता भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांपासून ते राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांपर्यंत सर्वांची उपस्थिती असणार आहे. भाजपच्या खासदार हेमामालिनी यांच्या नृत्याने व केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते यंदाच्या २६ व्या पुणे फेस्टिव्हलचे उद‌्घाटन ५ सप्टेंबरला होणार आहे. राष्ट्रवादीचे नेते व बांधकाममंत्री छगन भुजबळ, काँग्रेसचे मंत्री हर्षवर्धन पाटील, पतंगराव कदम हेही येणार आहेत. काँग्रेसचे निलंबित नेते आणि फेस्टिव्हलचे सर्वेसर्वा कलमाडी यांनीच ही माहिती दिली.

गाेपीनाथ मुंडेंची अाठवण

गेल्या वर्षीच्या पुणे फेस्टिव्हलला गोपीनाथ मुंडे आणि रामदास आठवले उपस्थित राहिले होते. "पुढच्या वर्षीच्या फेस्टिव्हलला केंद्रीय मंत्री म्हणून उपस्थित राहणार,’ असे त्या वेळी बोलताना मुंडे यांनी आग्रहाने सांगितले होते, हे विशेष. राजकीय पटलावरून दूर फेकल्या गेलेल्या कलमाडींना फेस्टिव्हलच्या माध्यमातून सार्वजनिक जीवनात झळकण्याची संधी मिळाली आहे.

दर्शनासाठीचा ‘मान’

फारसे धार्मिक नसलेले अजित पवारसुद्धा आवर्जून वेळ काढून दहा दिवसांत एकदा तरी पुण्यातील पाचही मानाच्या गणपतींचे दर्शन घेतात. सुप्रिया सुळे यादेखील आरत्यांसाठी वेळ काढतात. देश-विदेशात प्रसिद्ध झालेल्या दगडूशेठ हलवाई गणपती आणि पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपती यांच्या दर्शनाला बहुतेक सर्व राजकारणी, व्यापारी, उद्योजक आणि सेलिब्रिटी हमखास जातात. विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे, पुण्यातील सर्व आमदारांचा यात प्रमुख समावेश आहे.

हाेऊनच जाऊ द्या! प्रति​िनधी {मुंबई

राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी धर्माला ितलांजली देत विधानसभेच्या राज्यातील सर्व म्हणजे २८८ मतदारसंघांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या अाहेत. त्यामुळे संतापलेल्या काँग्रे​ेसनेही गेल्या वेळी राष्ट्रवादीसाठी साेडलेल्या ११४ मतदारसंघांत अापल्या पक्षातील इच्छुकांच्या मुलाखती घेऊन स्वबळावर लढण्याची तयारी दाखवली अाहे. दरम्यान, मुलाखतीसाठी अालेले इच्छुक व त्यांच्या काँग्रेस इच्छुकांची समर्थकांनी ‘राष्ट्रवादीची साथ पुन्हा स्वबळासाठी साेडा, स्वबळावरच लढा’ घाेषणाबाजी अशी घाेषणाबाजी करत नेत्यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीच्या ११४ केला. मतदारसंघांसाठी मुलाखती सुरू मुलाखती असतानाच कार्यकर्त्यांनी टिळक भवन या काँग्रेसच्या कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी केली. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. ग्रामीण भागात या पक्षाची प्रतिमा मलिन झाल्याचा फटका काँग्रेसलाही बसण्याचा धोका असून काँग्रेसने विधानसभा स्वबळावर लढवावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष मािणकराव ठाकरे व नारायण राणे यांनी त्यांच्या भावना जाणून घेतल्या. "औरंगाबाद मध्य'वर जाेर : राष्ट्रवादी काॅँग्रेसच्या ११४ िवधानसभा मतदारसंघासाठी आज तब्बल ५३५ काँग्रेसच्या इच्छुकांनी मुलाखती िदल्या. त्यामध्ये सर्वािधक म्हणजे १८ उमेदवार एकट्या औरंगाबाद मध्यसाठी होते. या मतदारसंघात सध्या प्रदीप जैस्वाल हे अपक्ष अामदार (सध्या िशवसेनेत) आहेत.

याद्या छाननी समितीकडे

काँग्रेसने यापूर्वी आपल्या कोट्यातील १७४ जागांसाठी मुलाखती घेतल्या आहेत. रविवारी उर्वरित ११४ जागांसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. दोन्ही याद्या छाननी समितीकडे पाठवण्यात आल्या आहेत. समितीने संभाव्य उमेदवारांची नावे पाठवल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व काँग्रेसचे राज्यातील प्रभारी मोहन प्रकाश त्यावर शिक्कामोर्तब करतील. त्यानंतर ही यादी काँग्रेसच्या मुख्य निवडणूक समितीकडे पाठवली जाणार अाहे.

राष्ट्रवादीने केली सुरुवात

सर्वच जागांसाठी मुलाखती घेतल्या ^राष्ट्रवादीने असल्यामुळे काँग्रेसचीही निवडणूक लढण्याची तयारी असली पाहिजे. त्यामुळे आज आम्ही ११४ जागांसाठी मुलाखती घेतल्या. याचा अर्थ आम्ही भविष्यात सर्वच जागा लढवू असा होत नाही. माणिकराव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष

‘महायुती अभेद्य राहील’

सदाभाऊ खाेतांचा ताेरा अखेर उतरला प्रतिनिधी {सातारा

‘बारा जागा न िमळाल्यास महायुतीतून बाहेर पडू’ असा अल्टिमेटम देणारे स्वाभिमानी शेतकरी संघटने​ेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खाेत यांचा सूर अाता मवाळला अाहे. ‘जागावाटपाचा प्रश्न लवकरच सुटेल. मात्र राज्यातील अाघाडी सरकारला सत्तेतून हाकलणे हेच अामचे ध्येय असून त्यासाठी महायुती अभेद्य राहील,’ असे त्यांनी रविवारी साताऱ्यात सांगितले. ‘जागावाटपासाेबत अामची भाजपशिवसेनेच्या नेत्यांबरोबर चर्चा सुरू आहे. सप्टेंबर महिन्याच्या पाच तारखेपर्यंत जागावाटप िनश्चित हाेऊन उमेदवारही जाहीर हाेतील. महायुतीच्या उमेदवारांची एकत्रित यादी जाहीर करण्याचा अामचा िवचार अाहे. महायुतीच्या सरकारमध्ये घटकपक्षांचे पुरेसे संख्याबळ असले पाहिजे, अशी अामची अपेक्षा अाहे,’ असे खाेत यांनी स्पष्ट केले. महायुतीत सहा िमत्रपक्षांचा समावेश अाहे. त्यामुळे सर्वच पक्षांचा सन्मान राखला जाईल, असे जागावाटप व्हावे अशी सर्वांचीच मागणी अाहे. संख्याबळाचा विचार करून राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर व स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी अहवाल सादर केला आहे. जागावाटपाबद्दल काही दिवसांपूर्वी असणारी नाराजी अाज नाही. प्रस्थापितांिवराेधात अामचा एकजुटीने संघर्ष अाहे. सहकार चळवळ, साखर कारखाने माेडीत काढले अशा लाेकांना महायुतीत प्रवेश देणार नसल्याचेही खाेत यांनी सांिगतले. दरम्यान, िशवसेना -भाजपने अापल्या िचन्हावर िनवडणूक लढविण्याबाबत िदलेल्या प्रस्तावर मात्र खाेत यांनी काहीही प्रतिक्रिया िदली नाही.

नांदेड िजल्ह्यातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे िदग्गज नेते भाजपच्या वाटेवर, िवधानसभेत अाघाडीिवराेधात सामूिहक दंड थाेपटणार

अशाेक चव्हाणांचे वर्चस्व माेडून काढण्यासाठीच ‘पक्षांतर एकी’ िवनायक एकबाेटे {नांदेड

माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेस- राष्ट्रवादीच्या िदग्गज नेत्यांनी पक्षांतराचा िनर्णय घेतला अाहे. त्यामागे स्वपक्षीय नेतृत्वावरील नाराजीपेक्षा माजी मुख्यमंत्री अशाेक चव्हाण यांच्या वर्चस्वाला हादरा देण्यासाठीच अाखलेली राजकीय रणनीती मानली जाते. अशोक चव्हाण यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना ही शक्यता मान्य केली. काँग्रेसचे माजी खासदार व अशाेक चव्हाणांचे मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर हे ५ सप्टेंबर राेजी भाजपमध्ये प्रवेश करत अाहेत. त्यांच्या पक्षांतरामागे काँग्रेसवरील म्हणजेच अशाेक

चव्हाणांच्या नेतृत्वावरील नाराजी हे कारण सांगितले जाते. भास्करराव पाटील जिल्ह्याच्या राजकारणात आजपर्यंत चव्हाणांसोबतच वाटचाल करत आले अाहेत. शरद पवारांच्या समर्थक व माजी केंद्रीय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील या राष्ट्रवादीत असल्या, तरी नांदेड जिल्ह्याच्या राजकारणात त्या चव्हाणविरोधी गटाच्याच म्हणून ओळखल्या जातात. शंकरराव

चव्हाणांच्या विरोधक अशीच त्यांची प्रतिमा आहे. कट्टर काँग्रेसवादी असूनही केवळ चव्हाणांशी असलेल्या राजकीय मतभेदामुळे त्या राष्ट्रवादीच्या तंबूत दाखल झाल्या. माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर हेही कट्टर काँग्रेसवादीच आहेत. मात्र, केवळ अशोक चव्हाणांशी मतभेद असल्याने ते अाधी राष्ट्रवादीत अािण अाता िशवसेनेत दाखल झाले अाहेत. राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री डाॅ. माधवराव किन्हाळकर हेही भाजपच्या मार्गावर अाहेत. त्यांनी गेल्या िवधानसभेच्या वेळी चव्हाणांिवराेधात भाेकर मतदारसंघातून अपक्ष िनवडणूक लढवली हाेती. तसेच पेड न्यूज प्रकरणात चव्हाणांिवराेधात सर्वाेच्च न्यायालयापर्यंत िदलेला लढाही देशभर गाजत अाहे.

इतर नेत्यांची वाढ खुंटली

नांदेड जिल्ह्यावर अशाेक चव्हाणांचे एकहाती वर्चस्व अाहे. गेल्या ५० वर्षांपासून या जिल्ह्याच्या राजकारणाची सूत्रे चव्हाण घराण्याच्या हाती आहेत. िदवंगत शंकरराव व त्यांचे पुत्र अशोक चव्हाण दोघेही प्रदीर्घ काळ सत्तेत राहिले. दोघांनीही मुख्यमंत्रिपदापर्यंत मजल मारली. त्यांच्या वर्चस्वामुळे िजल्ह्यातील इतर नेते मात्र झाकाळून गेले. प्रदीर्घ काळ काँग्रेसमध्ये राहूनही चव्हाणांच्या नेतृत्वाखाली काम करण्याशिवाय या नेत्यांना पर्याय उरला नाही. विशाल वटवृक्षाच्या सावलीत लहान रोपट्यांची वाढ खुंटते या नैसर्गिक न्यायाने इतरांची वाढ खुंटली. यातून चव्हाणविरोधाच्या विचाराला खतपाणी मिळाले.

एकच ध्येय, चव्हाणांना विरोध

भास्करराव पाटील, सूर्यकांता पाटील, माधवराव िकन्हाळकर हे नेते भाजपच्या मार्गावर आहेत. चिखलीकरांनी शिवसेनेत प्रवेश केला. अत्यंत खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या नेत्यांनी एकत्रित रणनीती अाखून काेणी काेणत्याही पक्षात जावे, असे स्वातंत्र्य देतानाच जिल्ह्याच्या राजकारणात चव्हाणांच्या विरोधात एकत्र येण्याचा निर्णय घेतला अाहे. याबाबत उघड बोलण्यास मात्र कोणी तयार नाही.

िवराेधाचा हा तर जुनाच फंडा : चव्हाण

नांदेड िजल्ह्यातील या पक्षांतराच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीने प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले, ‘यात नवीन काय आहे? शंकरराव चव्हाणांपासून हे चालत आले आहे. मात्र अामच्या पक्षावर त्यांचा काहीही परिणाम हाेणार नाही.’

िरपब्लिकन सेना ६० जागांवर लढणार

औरंगाबाद । आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन सेना विधानसभेच्या ६० जागा लढवणार आहे. त्यासाठी समविचारी पक्ष, संघटनेलाही सोबत घेण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष काशीनाथ निकाळजे यांनी दिली. रिपाइंच्या विविध नेत्यांचे पितळ या निवडणुकीत अाम्ही उघडे पडणार असून आंबेडकरी जनता फक्त आनंदराज यांच्या पाठीशी राहील, असा दावाही त्यांनी केला. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, महिला-दलितांवरील अत्याचार हे मुद्दे प्रचारात उपस्थित केले जातील. सर्व बहुजनांनी या िनवडणुकीत आनंदराज अांबेडकर यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहनही निकाळजे यांनी केले.


Turn static files into dynamic content formats.

Create a flipbook
Issuu converts static files into: digital portfolios, online yearbooks, online catalogs, digital photo albums and more. Sign up and create your flipbook.