Latest jalgaon city news in marathi

Page 1

िवधानसभा २०१४ राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराची सुरुवात शनिवारी मुंबईतून होणार आहे. यािनमित्त शिवाजी महाराज, महात्मा फुले, अहिल्याबाई होळकर, डॉ. आंबेडकर, महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून समतेची दिंडी काढली जाईल. - सुप्रिया सुळे, खासदार, राष्ट्रवादी काँग्रेस

िनवृत्त मुख्य सचिव आणि नवनियुक्त राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी शुक्रवारी कार्यभार स्वीकारला. नवीन प्रशासन भवनातील राज्य निवडणूक आयोगाचे सचिव मधुकर गायकवाड यांनी सहारिया यांचे स्वागत केले.

जळगाव }शनिवार. ६ सप्टेंबर २०१४ }४

थोडक्यात

भाजपमध्ये जाऊन भ्रष्ट नेते स्वच्छ कसे होतात : मधुकर िपचड

नाशिक | माजी मंत्री बबनराव पाचपुते यांना महत्त्व देण्याची आवश्यकता नाही. पण भाजपकडे असे कुठले तीर्थ आहे की ज्यामुळे भ्रष्टाचारी नेतेही तेथे जाऊन स्वच्छ होतात, असा उपरोधिक टोला लगावत आदिवासी विकासमंत्री मधुकर पिचड यांनी पुन्हा एकदा पाचपुतेंवर भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर तोफ डागली. नाशकात शुक्रवारी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलताना पिचड यांनी चांगलेच तोंडसुख घेतले. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर भ्रष्टाचाराच्या विरोधात ‘पाचपुतेंचा ओरड करणाऱ्या भाजपने पाचपुतेंना पक्षात प्रवेश दिलाच कसा? ज्यांच्या भ्रष्टाचार नावाने इतके दिवस खडे फोडले त्यांनाच माेदींपर्यंत पाेहाेचवणार’ पक्षात घेत भाजपनेच जणू भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचे काम सुरू केल्याचेही ते म्हणाले. भाजप नेत्यांनी यापूर्वी पाचपुतेंवर केलेल्या टीकेच्या भाषणांची माहिती आपल्याकडे असून, ही माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदींना देणार असल्याचा इशाराही पिचड यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेसने पाचपुतेंना १५ वर्षांपैकी १३ वर्षे मंत्रिपद दिले. शिवाय प्रदेशाध्यक्षपदासारखी मोठी जबाबदारीही दिली. असे असतानाही जे राष्ट्रवादीच्या विरोधात गेले, ते तुमचे कसे होणार, असेही पंतप्रधानांना सांगणार असल्याचे पिचड म्हणाले. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे कार्यकर्तेच पाचपुतेंना धडा शिकवतील, असा इशाराही िपचड यांनी िदला.

काहीही करा, मान्यता िमळण्यासाठी िरपाइंला िनवडून अाणा : अाठवले

नागपूर | आमच्या पक्षाला मान्यता िमळण्यासाठी िकमान बारा आमदार िनवडून येणे आवश्यक आहे. स्वबळावर आम्ही एकही उमेदवार िनवडून आणू शकत नाही. म्हणून भाजपिशवसेनेने हमखास िजंकून येणाऱ्या जागा द्याव्या आणि ते िनवडून आणण्यास मदतही करावी, अशी मागणी िरपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली. नागपुरात शुक्रवारी आयोिजत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. िवधानसभेसाठी काँग्रेसप्रमाणे आम्ही ५७ जागांची यादी िदली आहे. पण अामच्या तेवढ्या जागा िमळणे शक्य नसल्याने िकमान जागा पाडू २० तरी जागा िमळाव्या, अशी मागणी आहे. नका १९९० मध्ये काँग्रेसने १२ जागा िदल्या. पण सर्व जागी बंडखोर उभे करून आमचे उमेदवार पाडले. भाजपिशवसेनेने असे करू नये. मान्यता िमळण्यासाठी आवश्यक बारा जागा िनवडून येण्यासाठी मदत करावी, असे ते म्हणाले. आम्ही महायुतीचे पहिले पार्टनर असल्यामुळे आम्हाला झुकते माप िमळावे, एवढीच आमची अपेक्षा आहे, असे आठवले म्हणाले. िदवाळीपूर्वी िनवडणुका घेण्याचा आयोगाचा विचार लक्षात घेता जागावाटप लवकर व्हावे, असे ते म्हणाले.

महायुतीच्या जागावाटपावर अमित शहा-उद्धव ठाकरेंचे मतैक्य, ितढा लवकरच सुटणार

घटक पक्षांची िकटकिट अाधी संपवणार विशेष प्रतिनिधी {मुंबई

महायुतीतील घटक पक्षांना अगोदर जागा देऊन नंतर शिवसेना-भाजपच्या जागांबाबत िनर्णय घेण्याबाबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आिण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाल्याचे समजते. गुरुवारी रात्री अमित शहा यांनी ‘माताेश्री’वर जाऊन उद्धव यांची भेट घेतली. सुमारे ५० मिनिटे झालेल्या या बैठकीत जागावाटपासह राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी िदली. सूत्रांनी िदलेल्या माहितीनुसार, अमित शहा आिण उद्धव ठाकरे यांना भाजप व शिवसेनेच्या नेत्यांनी महायुतीतील घटक पक्षांनी जास्त जागांची मागणी केल्याचे सांगितले. ही मागणी मान्य न झाल्यास महायुतीतून बाहेर पडण्याचे सूतोवाचही रामदास अाठवले आिण राजू शेट्टी यांनी केल्याबाबतही चर्चा झाली. घटक पक्षांनी मागितलेल्या जागा दिल्या तर शिवसेना-भाजपच्या वाट्याला काहीच राहणार नाही, त्यामुळे घटक पक्षांच्या जागांबाबत गंभीरपूर्वक विचार करावा असे भाजप नेत्यांच्या म्हणणे होते. तर घटक पक्षांच्या दबावाखाली न येण्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. मात्र सध्या आघाडी सरकारला सत्तेवरून खाली खेचायचे असल्याने सगळ्यांना एकत्र घेऊन चालले पाहिजे, असे अमित शहा म्हणाल्याचे समजते. त्यामुळे घटक पक्षांच्या जागांवर अगोदर चर्चा करून त्यांना योग्य त्या जागा दिल्या जाव्यात, असा सूर बैठकीत निघाला. िनवडून येणाऱ्याच जागा द्या : छाेट्या घटक पक्षांची ताकद पाहून अगोदर त्यांच्या जागांबाबत चर्चा करावी. जेथे त्यांचे उमेदवार िनवडून येऊ शकतात, त्याच जागा देण्याबाबत चर्चा झाली आिण त्या जागा सोडून उरलेल्या जागांबाबत शिवसेना-भाजप नेत्यांनी चर्चा करावी, असेही या बैठकीत ठरल्याचे सूत्रांनी सांिगतले. पुढील अाठवड्यात बैठक शिवसेना, भाजप आपल्या कोट्यातून किती जागा िमत्रांना देऊ शकतील, कोणत्या जागांची अदलाबदल करायची याचा िनर्णय घेतल्यानंतरच अंितम जागावाटप जाहीर केले जाणार आहे. त्यासाठी पुढील आठवड्यात बैठक हाेईल.

जागावाटपात भाजपचा नवा मोफत आरोग्य सेवा, फॉर्म्युला, १३५ वर तडजाेड िशक्षण,२४ तास वीज शेतकऱ्यांना पेन्शन नेत्यांवर आरोप सिद्ध झाले तर िशवसेनेनेही अाता तडजाेडीची भूिमका घ्यावी : एकनाथ खडसे विशेष प्रतिनिधी {मुंबई िवधानसभेच्या िनम्म्या म्हणजेच १४४ जागांवर दावेदारी करणाऱ्या भाजपने अाता थोडे नमते घेत १३५ जागांवर तडजाेड करण्याची तयारी दर्शवली अाहे. त्यामुळे येत्या दहा िदवसांत महायुतीतील जागावाटपाला अंितम स्वरूप देण्यात येईल, असा दावाही आता भाजपतर्फे केला जात आहे. दरम्यान, जागावाटपाच्या चर्चेदरम्यान आम्ही शिवसेनेसमोर नवा फॉर्म्युला ठेवणार असल्याची माहिती भाजप नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे. या नव्या फॉर्म्युल्यांतर्गत भाजप १३५ जागांवर दावा सांगणार असून त्याबाबत आपण स्वत: िशवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंशी चर्चा केल्याचा दावाही खडसेंनी एका पत्रकार परिषदेत केला. महायुतीच्या छाेट्या मित्रपक्षांचे जागावाटप झाल्यानंतरच शिवसेना आणि भाजपच्या जागांबाबतची चर्चा होणार आहे. मात्र येत्या दहा दिवसांत महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटेल, असा विश्वास खडसे यांनी व्यक्त केला आहे. युतीत आतापर्यंत भाजपनेच नेहमी पडती बाजू घेतली असून या वेळी शिवसेनेने तडजोड करावी, अशी भाजपची इच्छा असल्याचेही ते म्हणाले.

वाढीव जागा मागण्यात गैर काय?

नव्वदच्या दशकात लोकसभेच्या ३२ जागा भाजप लढवत होता. मात्र आता ती संख्या २६ पर्यंत घटली असल्याचे सांगत खडसे म्हणाले की, निवडून येण्याची क्षमता असलेल्या लोकसभेच्या जागाही आम्ही गेल्या

पक्षातून काढू : खडसे

आजपर्यंत विधिमंडळात ज्या बबनराव पाचपुते अाणि िवजयकुमार गावितांवर तुम्ही भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांनाच आता पक्षात कसे घेतले? या प्रश्नाला उत्तर देताना खडसे म्हणाले की, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, मात्र हे आरोप अजून सिद्ध झालेले नाहीत. ते सिद्ध झाले तर त्यांना पक्षातून त्याच क्षणी काढून टाकू. युतीच्या सत्तेच्या काळातही आम्ही आमच्या मंत्र्यांवर आरोप होताच त्यांच्यावर कारवाई केल्याची आठवणही त्यांनी करून दिली.

राज्यसभेत वर्चस्वासाठी महाराष्ट्रात विजय हवा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकडे भाजपच्या केंद्रीय नेत्यांचे पूर्ण लक्ष असून प्रदेश भाजपला हवी ती मदत करण्याची तयारी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने दाखवली आहे. कारण महाराष्ट्र हे एक मोठे राज्य असून तिथे विजय आवश्यक आहेच, मात्र राज्यसभेतली सदस्य संख्या वाढवण्याच्या दृष्टीनेही महाराष्ट्रातल्या दणदणीत विजयाचा हातभार लागेल, असा भाजपच्या नेत्यांना विश्वास आहे. काही वर्षांत शिवसेनेला दिल्या आहेत. मग जर आता आम्ही काही वाढीव जागांची मागणी करत असू तर त्यात गैर काय? तसेच ही वस्तुिस्थती आपण दोनच दिवसांपूर्वी उद्धव ठाकरेंच्या कानावर घातल्याचे ते म्हणले. दरम्यान, मंगळवारी भाजपच्या प्रदेश कोअर कमिटीची बैठक मुंबईत होणार असून जागावाटपाच्या अंतिम चर्चेत कोणती भूमिका घ्यावी या अनुषंगाने या बैठकीत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री डाॅ. िवजयकुमार गावित हेही शनिवारी भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा अाहे. गावित यांच्या कन्या डाॅ. हिना यांनी लाेकसभेच्या ताेंडावर भाजपमध्ये प्रवेश करून नंदुरबारमधून खासदारकी िमळवली. त्यामुळे राष्ट्रवादीने गािवतांची तातडीने हकालपट्टी केली हाेती.

खडसेंचे पक्षांतर्गत विराेधक काेण?

मुंबईकरांना तलफ ‘नमाे चहा’ची

लाेकसभा िनवडणुकीच्या प्रचारादरम्यान ‘अब की बार माेदी सरकार’ ही भाजपची घाेषणा प्रचंड गाजली. याच प्रसिद्धीतून भारतीय मतदारांनी एका चहावाल्याला पंतप्रधानपदावर बसवले. माेदींच्या प्रसिद्धीचा हा फंडा अाता एका चहाच्या कंपनीने उचलला अाहे. िवशेष म्हणजे या कंपनीने अापल्या प्राॅडक्टचे नावही ‘नमाे चाय’ असेच ठेवले असून मुंबईत रस्ताेरस्ती अापल्या उत्पादनाची केलेली जाहिरात िनवडणुकीच्या ताेंडावरही चर्चेचा िवषय बनली अाहे.

कॉँग्रेसच्या उमेदवारांची नावे िनश्चित ?

नवी दिल्ली | कॉँग्रेसच्या निवडणूक समितीची बैठक शुक्रवारी रात्री ‘दहा जनपथ’ येथे बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील िवधानसभा िनवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील उमेदवारांच्या नावांबाबत चर्चा करण्यात अाली. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग, अहमद

पटेल, मल्लिकार्जुन खर्गे, ए. के. अँटनी, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी राष्ट्रवादीशी आघाडी आणि उमेदवारांबाबत तब्बल तीन तास चर्चा केली. जागावाटपात राष्ट्रवादीला िकती जागा साेडायच्या याचा निर्णय दिल्लीतच होणार असल्याचे माणिकराव ठाकरे यांनी सांिगतले.

राष्ट्रवादीचे बिपिन काेल्हे शिवसेनेच्या वाटेवर प्रतिनिधी {िशर्डी

बबनराव पाचपुते, सूर्यकांता पाटील या राष्ट्रवादीच्या दिग्गजांपाठाेपाठ राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शंकरराव काेल्हे हे राष्ट्रवादीला रामराम ठाेकण्याच्या तयारीत अाहेत. त्यांचे िचरंजीव बिपिन काेल्हे यांनी शिवसेनेशी जवळीक साधण्याचा प्रयत्न चालवला अाहे. काेपरगावमधून विधानसभेची उमेदवारी दिली तर शिवसेनेत प्रवेश करायचा; अन्यथा अपक्ष लढूच, अशी भूमिका पिता-पुत्रांनी घेतलेली दिसते. काेपरगावच्या राजकारणात अाजपर्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या काेल्हे यांनी स्पष्ट भूमिका अजूनही जाहीर केलेली

नसली तरी याची चर्चा रंगली अाहे. नगर िजल्ह्यात बबनराव पाचपुते यांनी राष्ट्रवादी साेडून भाजपात प्रवेश करून शरद पवारांना धक्का दिला. पाचपुतेंपाठाेपाठ अामदार भानुदास मुरकुटे हेसुद्धा भाजपात जाण्याच्या तयारीत अाहेत. अाता शरद पवारांचे सर्वात जुने सहकारी शंकरराव काेल्हे यांचे िचरंजीव बिपिन काेल्हे यांनीही राष्ट्रवादी साेडण्याची तयारी चालविली अाहे. याबाबत त्यांनी शिवसेनेच्या िजल्हा संपर्कप्रमुखामार्फत माताेश्रीवर जाेरदार फील्डिंग लावली असल्याचे बाेलले जात अाहे. तथापि त्यांचे प्रतिस्पर्धी अामदार अशाेक काळे यांची उमेदवारी नक्की झाल्याने काेल्हे यांची पंचाईत झाली अाहे.

तसेच िवद्यमान अामदारांना पुन्हा संधी देण्याबाबत चर्चा करून काही नावे िनश्चित करण्यात अाल्याचे संकेतही त्यांनी िदले. काँग्रेसच्या बहुतांश उमेदवारांबाबत निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यात बहुतांश विद्यमान आमदार असल्याचे कळते. मात्र, मुंबईतील उमेदवारांबाबत अद्याप िनर्णय हाेऊ शकलेला नाही.

भाजपला प्रत्युत्तर

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त अायाेजित कार्यक्रमात गेल्या सव्वा वर्षातील कटू प्रसंग कथन केले. या वेळी अापल्या वाईटाची वाट पाहणाऱ्या पक्षांतर्गत हितशत्रूंनी अाजारपणाच्या खाेट्या बातम्या पसरवल्याची खंत त्यांनी व्यक्त केली हाेती. त्यांच्या या भावनिक संवादानंतर खडसेंचा पक्षातील िहतशत्रू काेण? असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला अाहे. स्थानिक पातळीवर खडसेंना मुख्यमंत्री करण्याची मागणी हाेत असताना त्यांचा विराेधक काेण? या प्रश्नाने केवळ भारतीय जनता पक्षच नव्हे तर संपूर्ण िजल्ह्यात राजकीय खळबळ उडाली अाहे. विशेष म्हणजे एकनाथ खडसे यांनी अापल्या हितशत्रूिवषयी भावना व्यक्त करताना त्याचे नाव घेणे टाळले. मात्र, मी त्यांना माेठे केल, पदे दिली, विश्वास टाकला अशी सांकेतिक भाषा त्यांनी मनाेगतात वापरली. त्यांच्या संपर्कातील अािण पक्षातील सक्रिय सदस्यांना त्या ‘यातनादायी’ व्यक्तिमत्त्वाची अाेळख पटली असली तरी एेन निवडणुकीच्या ताेंडावर पक्षात वादंग

चंद्रकांत िशंदे {मुंबई भाजपपेक्षा जास्त जागा जिंकण्याचे ‘मिशन १५०’ आखलेल्या शिवसेनेने आपला स्वतंत्र जाहीरनामाही तयार केला आहे. िव्हजन डॉक्युमेंट सादर करून भाजपवर कुरघोडी केल्यानंतर आता जाहीरनामाही तयार करून शिवसेनेने स्वतंत्र अस्तित्व दाखवून िदले अाहे. यात माेफत आरोग्य सेवा, शिक्षण, तास एक्सक्लुझिव्ह २४ वीज आिण शेतकऱ्यांच्या समस्यांवर भर दिला असल्याची मािहती शिवसेनेच्या आमदाराने ‘दिव्य मराठी’ला दिली. युती सरकारमधील अनेक योजनांचा जाहीरनाम्यात पुनरुच्चार केल्याचे समजते. तसेच या योजनांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन पूर्ण केले जाणार असल्याचे जाहीरनाम्यात स्पष्ट करण्यात आले आहे. आरोग्य सेवा महागडी झाल्याने सामान्य जनतेला आरोग्य सेवांचा फायदा घेत येत नाही. त्यामुळे राज्यातील प्रत्येकाला मोफत आरोग्य सेवा देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात देण्यात आलेले आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील प्रत्येक कामगाराच्या पगारातून वर्षाला फक्त २०० रुपये कापून घेतले जाणार असून त्याबदल्यात सरकारी इस्पितळांमध्ये त्या कर्मचाऱ्याच्या संपूर्ण कुटुंबाला सर्व प्रकारच्या आरोग्य सेवांचा लाभ घेता येणार आहे.

शेतकऱ्यांना पेन्शन, कर्जमाफी, खटले याबाबत ठोस उपाययोजना जाहीरनाम्यात आहेत. भारनियमनमुक्ती, २४ तास वीज, राज्य साक्षर करण्यासाठी ई-लर्निंगची सोय, सरकारी शाळा आिण आश्रमशाळा सुधार याेजना, पोिलसांच्या घरांची समस्या सोडवण्यावरही जाहीरनाम्यात भर िदल्याचे कळते.

िशवशाही पुनर्वसन

युतीच्या काळातील शिवशाही पुनर्वसन योजना पुन्हा राबवण्यात येणार असून धारावीचा विकास सर्वप्रथम हाती घेतला जाईल. मुंबईसह संपूर्ण राज्य झोपडपट्टीमुक्त करण्याचा निर्धार पक्षाने केला आहे. मुंबईच्या विकासासाठी पुनर्वसन झालेल्यांना जास्त एफएसआय देण्यासोबतच मुंबईची पाणी समस्या सोडवण्यासाठी आणखी धरणे बांधण्याचेही शिवसेनेने ठरवले आहे.

अंितम वचननामा नंतर

शिवसेनेने वेगळा जाहीरनामा का तयार केला, या प्रश्नावर पक्षाच्या अामदाराने सांिगतले, ‘िशवसेना काय करू शकते हे जनतेसमोर नेण्यासाठी आम्ही वेगळा जाहीरनामा तयार केला आहे. महायुतीचा अंितम वचननामा सर्व पक्षांचे नेते एकत्र बसून तयार करतील. प्रत्येक पक्षाच्या ज्या चांगल्या योजना असतील त्यांचा समावेश वचननाम्यात केला जाईल. मात्र आमचा जाहीरनामा जनतेपर्यंत आम्ही वेगळ्या मार्गाने पोहोचवू,’ असेही या आमदाराने म्हटले.

स्वतंत्र िवदर्भाच्या ठरावाला काँग्रेसने पािठंबा द्यावा

िनतीन राऊतांची मागणी

खडसेंच्या वक्तव्याने गटबाजी अधाेरेखित प्रतिनिधी । जळगाव

शिवसेनेने तयार केला स्वतंत्र जाहीरनामा

प्रतिनिधी {मुंबई

वाईटाची वाट पाहणारा काेण?

एकनाथ खडसेंनी कथन केलेल्या अनुभवानंतर त्यांचे चाहते पक्षातील त्यांचा हितशत्रू काेण? याचा शाेध घेत अाहेत तर खडसेंचे अनुयायी ‘त्या’ िहतशत्रूचा राजकीय बंदाेबस्त करण्यासाठी सरसावले अाहेत. अागामी विधानसभा निवडणुकीत या पक्षांतर्गत संघर्षाचे राजकीय पडसाद उमटण्याची िचन्हे अाहेत. उभे राहू नये, म्हणून भाजपने झाकली मुठ सव्वा लाखाची ठेवण्याचा प्रयत्न चालवला अाहे. काय अाहेत शक्यता? : वाढदिवसानिमित्त अायाेजित कार्यक्रमात खडसेंनी भावनिक हाेऊन कार्यकर्त्यांच्या कानावर काही गाेष्टी सांिगतल्या. अाजारपणात त्यांनी गाेपनीयता पाळून उपचार केले. यादरम्यान अालेले अनुभव त्यांनी उघड केले. मी मागे नव्हे तर थेट समाेर लढताे, असे म्हणत खडसेंनी त्या पदाधिकाऱ्याला अाव्हान दिले. याचा अर्थ त्या वेळी ताे पदाधिकारी कार्यक्रमास उपस्थित असावा, असे समजले जात अाहे.

काँग्रेसने जाहीरपणे स्वतंत्र विदर्भाची मागणी फेटाळली असली तरी वेगळ्या विदर्भासाठी आग्रही असलेले काँग्रेसचे मंत्री नितीन राऊत यांनी केंद्रातील एनडीए सरकारने स्वतंत्र विदर्भाचा ठराव पारित केल्यास त्याला काँग्रेस पक्षाने पािठंबा द्यायला हवा, अशी आग्रही मागणी केली आहे. राज्यघटनेच्या कलम ३७१ आिण नागपूर कराराच्या कलमांनुसार राज्यातील सर्व प्रकारच्या शासकीय -िनमशासकीय नोकऱ्यांमध्ये विदर्भातील तरुणांना विदर्भाच्या लोकसंख्येच्या तुलनेत आरक्षण िमळावे आिण यासाठी िवदर्भासाठी स्वतंत्र लोकसेवा आयोग स्थापन केले जावे, अशी मागणीही त्यांनी केली. महाराष्ट्रात पुन्हा सत्ता िमळाली तर विदर्भाचा िवकास कसा केला जाईल, हे जनतेला सांगण्यासाठी काँग्रेसने एक स्वतंत्र जाहीरनामा काढावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. एवढेच नव्हे तर या जाहीरनाम्यासाठी विदर्भाचा पाचकलमी विकास कार्यक्रम सुचवणारा एक मसुदाही त्यांनी शुक्रवारी पक्षाकडे सादर केला.

चांदवड येथील मेळाव्यात िवनाेद तावडेंचा सत्कार करताना पदािधकारी.

भ्रष्ट मंत्र्यांनीच राज्याला कर्जाच्या खाईत लोटले भाजप नेते िवनाेद तावडे यांचा अाघाडीवर अाराेप प्रतिनिधी {चांदवड (िज. नािशक)

‘आघाडी सरकारमधील मंत्र्यांनी हजारो कोटी रुपये हडप करून राज्याला कर्जाच्या खाईत लोटले आहे. भूलथापा देऊन जनतेची फसवणूक केली आहे. त्यामुळे यंदाच्या गणेश विसर्जनाबरोबर विधानसभा निवडणुकीत राज्यातील भ्रष्टाचारी आघाडी सरकारचेही विसर्जन केल्याशिवाय जनता राहणार नाही,’ असे टीकास्त्र विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी शुक्रवारी सोडले. चांदवड येथील शेतकरी मेळाव्यात ते बाेलत हाेते. या वेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, सुरेश

भामरे, आमदार डॉ. अपूर्व हिरे, माजी मंत्री डॉ. दौलतराव आहेर, अद्वय हिरे अादी उपस्थित होते. तावडे म्हणाले की, आघाडी सरकारकडून महाराष्ट्र पुढे असल्याच्या जाहिराती केल्या जात आहेत. मात्र, प्रत्यक्षात महाराष्ट्र शेतकऱ्यांच्या आत्महत्यांत पुढे आहे, बेरोजगारीमध्ये पुढे आहे. आघाडी सरकारमधील भ्रष्टाचारी मंत्र्यांना जेलची हवा दाखवणार असून, आघाडी सरकारच्या काळात बिल्डरने केलेली बेकायदेशीर कामे आम्ही रद्द केल्याशिवाय राहणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. या वेळी चांदवड-देवळा तालुक्याचे नेते डॉ. आत्माराम कुंभार्डे यांच्यासह अॅड. नितीन ठाकरे, संजय पाचोरकर आदींसह ३२ गावांतील सरपंच, २१ सोसायट्यांचे चेअरमन अादींनी भाजपात प्रवेश केला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांना सज्जड इशारा, देवेंद्र फडणवीसांचे अाराेपही फेटाळले

अर्थसंकल्पापेक्षाही माेठा घाेटाळा हाेईलच कसा? िवशेष प्रतिनिधी {पुणे

‘भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी जबाबदारीने आरोप करावेत. निवडणुका आल्या म्हणून वस्तुस्थिती सोडून बोलू नये,’ असा सज्जड इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी पुण्यात पत्रकारांशी बाेलताना दिला. अमित शहा यांनी गुरुवारी मुंबईतील मेळाव्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका केली होती. आघाडी सरकारने गेल्या पंधरा वर्षात राज्यात तब्बल ११ लाख ८८ हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा शहा यांचा आरोप होता. या वक्तव्याचा पवार यांनी खरपूस समाचार घेतला. "काँग्रेस आघाडी सरकार १९९९ मध्ये महाराष्ट्रात सत्तेत आले. तेव्हापासून २०१४ पर्यंतच्या सर्व अर्थसंकल्पांची बेरीज केली तरी तो आकडा पाच

लाख कोटींच्या आसपास येतो. शहा यांनी अकरा लाख कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप केल्यानंतर मी अर्थखात्याच्या अधिकाऱ्यांना माहिती घ्यायला लावली. त्यानंतर शहा यांनी सांगितलेल्या आकड्यातील फोलपणा पुढे आला,’ असे स्पष्टीकरण पवारांनी िदले. देवेंद्र फडणवीस यांचे आरोपसुद्धा बिनबुडाचे असल्याचे पवार म्हणाले. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील टोलवसुलीचे २०१९ चे टेंडर आताच काढल्याची माहिती पूर्णपणे चुकीची आहे. "इन्फ्रा' विभागाच्या परवानगीशिवाय रस्त्यांची कामे होत नाहीत. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील टोलचे कोणतेही टेंडर काढण्यात आले नसल्याची माझी माहिती आहे. सिंचनाच्या बाबतीत मराठवाड्यात "बीओटी' तत्त्वावरील तीन प्रकल्पांची कामे देण्यात आली आहेत. मात्र ही कामे पूर्वनियोजित होती. निवडणूक आली म्हणून नवा निर्णय सिंचन विभागाने घेतला नसल्याचे पवार यांनी सांगितले.

कोळसा टंचाई तर देशव्यापी

निर्णय लंडनहून परतल्यावर "काँग्रेस-राष्ट्रवादीतील जागावाटपाचा निर्णय दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते दिल्लीत घेतील. शरद पवार शनिवारी लंडनहून भारतात परतणार आहेत. त्यानंतरच तोडगा निघेल. विधानसभेच्या जागा वाढवून घेण्याची आमची मागणी कायम अाहे. -अजित पवार

सर्वोच्च न्यायालयाने कोळसा खाणवाटपाचे करार रद्द केल्यामुळे कोळसा उपलब्धतेवर परिणाम झाला आहे. यातूनच राज्यातील ऊर्जासंकट गडद झाले आहे. कोळशाच्या अनुपलब्धतेचा प्रश्न फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित नसून संपूर्ण देशापुढचा हा प्रश्न आहे. यातून मार्ग काढण्यासाठी देशपातळीवर बैठक घेण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदींना केली आहे, असेही ऊर्जामंत्री अिजत पवारांनी सांिगतले.

पाचपुतेंची पोकळ आरोपबाजी

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बबनराव पाचपुते, सूर्यकांता पाटील नुकतेच भाजपात दाखल झाले अाहेत. तत्पूर्वी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जाहीर टीका केली हाेती. याबद्दल विचारले असता पवार म्हणाले, ‘पक्ष सोडताना होणारी ही बडबड निरर्थक असते. दुसऱ्या पक्षात जाताना लोकांना काही तरी कारणे सांगावी लागतात म्हणून अशी पोकळ आरोपबाजी होते. शरद पवार प्रत्यक्षात सर्वांनाच वेळ देतात.'


Turn static files into dynamic content formats.

Create a flipbook
Issuu converts static files into: digital portfolios, online yearbooks, online catalogs, digital photo albums and more. Sign up and create your flipbook.