Visual Order - Drhushakram - Marathi

Page 1

दृष्यक्रम एका खालोखाल एक असा क्रम व त्याची निर्मि ती - एक प्रयत्न

1


मूळ तत्वे दिलेल्या विहित जागेत एकत्र येतात. ती रचना निर्माण करण्यासाठी जागेशी परस्पर क्रिया करतात. सगळ्या रचनेतूनच आकार निर्माण होतो.


हे पु स्त क का? आरेखन संस्थांच्या पायाभूत अभ्यासक्रमामधील नेमून दिलेल्या कामांचा कलात्मकतेकडे जास्त कल असतो. पण त्यामध्ये पद्धतशीर व शास्त्रीय दृष्टीचा अभाव असतो अशी टीका केली जाते. या विषयावर सतत चर्चा केली जाते आणि त्याची परिणती कलात्मक किंवा शास्त्रीय अशा प्रकारे प्राबल्य वाढण्यात होते. बऱ्याच वेळा ही चर्चा नवनिर्मीती करण्याच्या राजमार्गी पद्धती सुचविण्यापेक्षा कोणती पद्धत आधुनिक रेखांकन रचनेसाठी अधिक परिणामकारक आहे यावरच होते. या दोनही पद्धतीच्या विचारां​ंत संतुलन साधण्याच्या प्रयत्नामध्ये हे पुस्तक रेखांकृत रचनेमधील कसोट्यांवर आधारित शिक्षण देण्याकरिता एक योजना विचारथ पुढे मांडते. याचा अर्थ शिक्षण पद्धती जी सरळ (मूळ) विचारांना चालना देणारी असूनसुद्धा खुल्या परिणामांची आणि इतर नवीन विचारांना प्रोत्साहन देणारी असावी. या पु स्त कामागील उद्दे श या पुस्तकाचे प्रयोजन दृष्यविषयक रचनेची तत्वे ही दृष्यविषयक जागेमधील सर्व मांडणींचा पाया आहे हे सिद्ध करणे नाही. दुसरी बरीच अतिशय चांगली अशी पुस्तके आहेत ज्यामध्ये ही तत्वे अगदी विस्तृतपणे प्रदर्शि त केलेली आहेत तसेच त्यांच्या व्याख्याही दिलेल्या आहेत. नवीन पद्धती निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे, जी दृष्य रचनेची मूळ तत्वे प्रयत्न करण्यास उत्तेजित करते आणि गुंतविते. एकट्याने करण्यापेक्षा अन्य विद्यार्थ्यांच्या सहकार्याने मांडणी शोधणे असे याचे स्वरूप आहे. या ठिकाणी एकाकीपणे याचा संदर्भ पडद्यासमोर संगणकावर बसून काम करणे याच्याशी आहे. बऱ्याच वेळा नेमून दिलेल्या कामावर लक्ष केंद्रीभूत असण्यापेक्षा साधानाशी झगडणे असा हा प्रकार आहे. मांडणी करताना रचनेसंबंधीचा निर्णय जाणीवपूर्वक घेण्यास विद्यार्थ्यांना उत्तेजन देणे. निर्मिती होत असताना उद्दिष्टे आणि अपेक्षा मनात पक्की ठरविलेली असणे. श्रोते व प्रेक्षक यांच्याशी

परीक्षण करून अपेक्षित असलेले प्रत्यक्षात आणणे. आरेखन रचनाकाराने द्विमिती जागेमध्ये घटकांची मांडणी करताना (या बाबतीत – टाईप / लेटर फॉर्मस्) दृष्यासंबंधी दिलेले सर्व निर्णय हे केवळ उत्स्फूर्त व काल्पनिक नाहीत या सत्याचे आकलन होणे आवश्यक आहे. खरे पहिले असता हे निर्णय वस्तुनिष्ठ, तर्क शुद्ध व जो संदेश पोहोचवायचा आहे त्याला धरून असतात. जर या रचनांसंबंधीचे निर्णय बरोबर समजले नाहीत तर त्यांना दृष्य रचनांची तत्वे पाहण्याचा प्रयत्न करणाऱ्या, बहुदा नवशिक्या रचनाकारांकडू न, लहरी आणि अतार्कि क असे म्हणले जाते. या पुस्तकाचा हेतू सहकार्याच्या वातावरणास उत्तेजन देण्यासाठी एक पद्धत सुरु करणे असा आहे, जेथे शिकण्यासाठी, विचारविनिमय आणि एका उद्देशाने स्वतःस गुंतवून घेणे अतिआवश्यक असते. हा प्रयोग म्हणजे मान्यतेच्या माध्यमातून आणि तार्कि क विचारसरणीशी सांगड घालून, परंपरागत आणि आधुनिक कल्पना, पूर्ण अभ्यास व सर्जनशीलतेने करून, रचना शिक्षणाच्या भविष्यात संतुलन आणण्यासाठीचा एक प्रयत्न आहे. या पु स्त काविषयी. हे पुस्तक मुख्यतः दृष्यक्रम (एका खालोखाल एक असा क्रम) निर्मिती विकसित कशी करावी यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करते. द्विमिती जागेत एकाच वेळी अस्तित्वात असणाऱ्या मूलतत्वांमधील परस्पर संबंधांच्या संदर्भात दृष्यक्रम असे संबोधले जाते. याचा उद्देश दृष्यक्रम निर्मितीद्वारा एक अनुभव अंतर्भूत करणे हा आहे; एक योजनापूर्वक मांडणी जी इच्छित अर्थाच्या पाहणीला अनुमती देते. जेव्हा एखादी व्यक्ती ध्यानधारणा करते तेव्हा ती ध्यानधारणा स्वतः अनुभवत असते. हा ध्यानधारणेचा अनुभव दुसऱ्या व्यक्तिस केवळ साधर्म्याच्या मदतीने सांगितला जावू शकतो. जर एखाद्यास अनुभवलेले अनुभवायचे असेल तर ते त्याच्या

अंतर्मनात ध्यान धरूनच आणावे लागेल. जर हे करण्यावर वेळे चे बंधन असेल तर त्या कृतीचे अनुकरण साधर्म्याच्या सहाय्याने केले जाते. साधर्म्य वस्तुस्थिती समजण्यास आपणास मदत करते. म्हणून अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी साधर्म्ये निर्मितीच्या माध्यमातून दृष्य रचना मूलतत्वे समजण्याकरिता एक प्रयोग केला गेला. या साधर्म्यांचा प्रत्यक्ष रचना कामासाठी, तुलनेच्या माध्यमांतून आणि शिक्षकाने सुरु केलेल्या चर्चांमधून पुढे आणखी वापर केला गेला. हा प्रयोग वेगवेगळया रचना संस्थांमध्ये चार ते पाच वर्षांच्या कालावधीमध्ये केला गेला आणि तो ‘व्हिजुअल ऑर्डर’ नामक पुस्तकात असलेल्या शिक्षण पद्धतीत व्यक्त केला आहे.


गणेश देवतेच्या मिरवणुकीच्या चित्रामध्ये एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाणाऱ्या रेषायुक्त मार्गाच्या मांडणीची तत्वे आहेत. चित्र पाहणाऱ्या व्यक्तिचे लक्ष्य फोटोग्राफरने पकडलेल्या अदृष्य मार्गदर्शक रेषेकडे ती वळवितात. एखादे मुल गणेश देवतेच्या मुर्तीकडे पहाते आणि दृष्य रेषा त्याला इमारतीच्या गच्चीवरून मिरवणूक पाहणाऱ्या लोकांकडे नेते. रचना / मांडणी पाहणे आणि एक संस्मरणीय चित्र (फोटोग्राफरच्या बुद्धिमान नेत्रांनी कॅमेरा लेन्सच्या माध्यमातून पकडलेली रचना) निर्माण करणारा तो क्षण पकडणे हे फोटोग्राफरचे सामर्थ्य आहे. दृष्यक्रम पाहता ये ण.े पहावयास शिकणे.

4


भाग १ प्रस्तावना साधन विरुद्ध नियु क्त काम १ दृष्यक्रम – अध्यापन पद्धत २ विषयां च ी निवड ५ नियु क्त कामाबद्दलचे पत्र ९

नियु क्त काम ०१ नियु क्त काम ०१ – उद्दिष्ट ११ एक विषयवस्तू – दृष्यक्रम – वाढत जाणारे महत्त्व १३ एक विषयवस्तू – सूक्ष्म अभ्यास २१ उदाहरण १ – चित्राला समान असणारे – टं क मु द्रि त भाषां त रे २३ उदाहरण १ – सूक्ष्म अभ्यास ३५ उदाहरण २ - चित्राला समान असणारे - टं क मु द्रि त भाषां त रे ३७ उदाहरण २ – सूक्ष्म अभ्यास ४९ निष्कर्ष ५१ कार्यशाळां म धील उदाहरणे ५६


साधन विरुद्ध नियु क्त काम पूर्वीच्या बहुतांश परंपरागत व्यवहारामध्ये ‘नकळत’ साधनांच्या क्षेत्रावर काहीच प्राबल्य नव्हते, पण त्यामध्ये ‘नियुक्त काम’ हे नेहमीच केंद्रस्थानी असे. कामाच्या अंमलबजावणीसाठी असलेल्या नवीन साधनांमुळे जास्तीत जास्त प्रयत्न, नियुक्त कामात स्वतःस पूर्णपणे गुंतवून घेण्यापेक्षा, साधन समजण्यात / त्याबरोबर धडपडण्यात खर्च होतात. परिणामी नियुक्त काम केवळ नवशिक्यांच्या साधनाविषयी असलेल्या ज्ञानापार्यांतच प्रवास करते. म्हणून नियुक्त कामाच्या उद्देशावर साधनाची हुकूमत चालते. ती शोधांवर मर्यादा आणतात आणि शिक्षण विपर्यस्व होते. या सर्व अंगांनी समजून घेताना कोणती अध्यापन पद्धती वापरावी, जी शोध करण्याचे निर्मिती स्वातंत्र्य देते व शिवाय या स्वातंत्र्यात वस्तुनिष्ठता आणि तर्क शुद्धतेद्वारे बळकटी देते, हे आव्हान होते.

6


आव्हान


या पद्धतीविषयी दृष्यक्रमाच्या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थी दिलेल्या नियुक्त कामांच्या प्रश्नपत्रिका संचाला (नियुक्त कामाबद्दलच्या पत्राला) दृष्य उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतात. विद्यार्थ्यांनी तयार केलेली दृष्य उत्तरे रचनेसंबंधीचे निर्णय स्पष्ट करण्यासाठी साधर्म्ये तयार करतात, ज्यांची त्या रचनेमध्ये मूळ तत्वांची मांडणी करण्यावर हुकूमत चालते. उजवीकडील पृष्ठ विद्यार्थ्यांनी पायरी पायरीने करण्याच्या प्रत्येक नियुक्त कामाचे वर्णन करीत नेमणुकीचे स्वरूप प्रदर्शि त करते. हे चित्र म्हणजे विद्यार्थ्यांनी केलेल्या एका नियुक्त कामाचे दृष्य उत्तर आहे. पुढे जाऊ तसे आपण नेमून दिलेल्या कामासंबंधी विस्तृतपणे चर्चा करुया.

8



विषयवस्तूं च ी निवड प्रयोगासाठी आपण वर्गांमधून तीन विद्यार्थ्यांची निवड करतो. उजवीकडील पृष्ठ नेमून दिलेले काम (प्रश्नपत्रिका) अमलात आणण्याच्या प्रयोगातील विषयवस्तू असलेल्या विद्यार्थांचा गट प्रदर्शि त करते. चित्रात डावीकडे दाखविल्याप्रमाणे, या विद्यार्थ्यांचे स्वरूप उघड दिसणाऱ्या एका खालोखाल एक, अशा रचनेप्रमाणे असेल, जसे की, विषयवस्तूंची उं ची जेव्हा ते एकत्र केले असतील तेव्हा, हळू हळू वाढली किंवा कमी झाली पाहिजे. त्यांच्यापैकी एक उं च, दुसरा मध्यम आणि शेवटचा कमी उं चीचा असावा. विषयवस्तूंमधील शारीरिक फरक स्पष्ट असावा. पूर्ण फरक असलेल्या विषयवस्तूंची निवड टाळली गेली पाहिजे किंवा एक विशिष्ट विषयवस्तू वेगळी असली तरी चालेल. प्रयोग यशस्वी करण्यासाठी विषयवस्तूंची निवड करताना हे काटेकोरपणे पाळले गेले पाहिजे. आम्ही केलेल्या नियुक्त कामासाठी (उपक्रमासाठी) प्रत्येक समूहातील तीन विद्यार्थ्यांचा एक गट असे दोन संच आम्ही निवडले. उजव्या हाताकडील पृष्ठावर पहिला गट आहे आणि पुढील पृष्ठावर प्रयोगात ज्यांनी भाग घेतला आहे अशा विद्यार्थ्यांचा दुसरा गट आहे. निवडले ल् या गटाचे छायाचित्र. (डावीकडू न उजवीकडे) राहुल, क्षितीज आणि नवें द ू

10


पहिला गट – एका खालोखाल एक असा क्रम तयार करण्यासाठी विषयवस्तूंची निवड


या ठिकाणी स्पष्ट दिसणारा एका खालोखाल एक अशा क्रमाचा विद्यार्थ्यांचा दुसरा दृष्यगट सदर केला आहे. दुसरा गट: (डावीकडू न उजवीकडे) अभिषेक, मंशू, दिनेश या गटाचे चित्र.

12


दुस रा गट – एका खालोखाल एक असा क्रम तयार करण्यासाठी विषयवस्तूंची निवड.


नियु क्त कामाबद्दलचे पत्र – दृष्य प्रश्नपत्रिका एकदा आपली विषयवस्तू निश्चित केल्यानंतर, उरलेल्या वर्गाला उजव्या हाताकडील बाजूला असलेल्या पृष्ठावर दर्शविल्याप्रमाणे नियुक्त कामासंबंधीचे पत्र दिले जाते. कामासंबंधीच्या पत्रात स्पष्ट केल्याप्रमाणे वर्ग निवडलेल्या विषयवस्तूचे कृष्णधवल छायाचित्र घेतले जाईल. ही छायाचित्रे मोकळ्या पार्श्वभूमीवर घेणे आवश्यक आहे. छायाचित्र घेण्याकरिता डीजीटल कॅमेऱ्याचा वापर केला पाहिजे आणि पडद्यावरील प्रतिमा कृष्णधवल रंगात निश्चित केलेली असावी. प्रत्येक उपक्रम आपण जसे पुढे जाऊ तसा स्पष्ट केला जाईल.

14


एक विषयवस्तू : आवड निर्माण करणे नियुक्त काम ०१

दोन विषयवस्तू : पूर्व ठरले ल ा क्रम नियुक्त काम ०२

नियुक्त काम ०३

पूर्व ठरलेल्या क्रमानुसार दोन विषयवस्तूंचे फोटो काढणे

नियुक्त काम ०४

मागील चित्राच्या उलट क्रमानुसार दोन विषयवस्तूंचे फोटो काढणे

सारखेच महत्त्व देऊन दोन विषयवस्तूंचे फोटो काढणे

तीन विषयवस्तू : पूर्व ठरले ल् या क्रमानु स ार (नियुक्त काम ०६ आणि ०७ सारखीच अंमलबजावणी करणे)

नियुक्त काम ०५

नियुक्त काम ०६

नियुक्त काम ०७

दहा विषयवस्तू : पूर्व ठरले ल् या क्रमानु स ार एक विषयवस्तू ही स्त्री असली पाहिजे आणि ती पहिल्या क्रमांकावर असेल.


उजवीकडे असलेले पृष्ठ नियुक्त कामाच्या पत्रामध्ये उल्लेख केलेले काम ०१ दर्शविते. पहिल्या नियुक्त कामासाठी तुम्ही डाव्या बाजूकडील चित्रामध्ये दाखविलेल्या तीनपैकी कोणतीही एक विषयवस्तू निवडू शकता.

नियु क्त काम ०१: या कामामध्ये आपण एका विषयवस्तूचे पूर्वी स्पष्ट केलेल्या स्वरूपात (लॅन्डस्केप) मोकळ्या पार्श्वभूमीवर चार कृष्णधवल फोटो काढतो. हे चारही फोटो अशा प्रकारे काढा कि त्यातील रंजकता वाढत जाणारी असावी. याचा अर्थ जेव्हा सगळे चारही फोटो काढले जातात आणि एकत्रित प्रदर्शि त केले जातात, तेव्हा जर तुम्ही विषयवस्तूचे पहिले आणि दुसरे चित्र यांची तुलना केली तर: अ. विषयवस्तूचे दुसरे चित्र पहिल्या चित्रापेक्षा अधिक आवडणारे असावे, ब. तिसरे चित्र दुसऱ्या चित्रापेक्षा अधिक आवडणारे असावे क. आणि चौथे चित्र तिसऱ्या चित्रापेक्षा अधिक आवडणारे असावे, जेव्हा त्यांचे मूल्यमापन प्रेक्षक/ श्रोते यांच्या मताच्या आधारावर केलेले असते.

पहिला गट : राहुल, क्षितीज, नवें द ू (डावीकडू न उजवीकडे)

लक्षात ठे वण्याचे मु द्दे : • विषयवस्तूचे फोटो काढताना त्याची पार्श्वभूमी मोकळी किंवा पंाढरी असावी. • कपडे साधे असावेत आणि फॅशनेबल किंवा भडक नसावेत. • विषयवस्तूचे कपडे लक्ष विचलित करणारे नसावेत. • काळ्या किंवा राखाडी रंगाचे टी – शर्टस् चांगले. त्यावर काही मजकूर किंवा चित्र नसावे. • विषयवस्तू एक विद्यार्थी किंवा विद्यार्थि नी असू शकते मात्र दोघांचा एकत्र गट नको. • साधनास परवानगी नाही. यापुढील पृष्ठे वाढत जाणारे महत्त्व (एम्फसिस) असलेल्या प्रतिमांची मालिका प्रदर्शि त करतील.

16


1.

2.

3.

4.

एक विषयवस्तू, आवड (एम्फसिस) निर्माण करा.


हे पहिले चित्र आहे जेथे विषयवस्तू चित्रचौकटीत मध्यावर उभी आहे. नियुक्त काम पत्रामध्ये नमूद केलेल्या कसोटयांप्रमाणे चालू चित्रापेक्षा पुढील चित्र अधिक आवडणारे असावे. दुसऱ्या चित्राबद्दलचा निकाल समजण्याकरिता पुढील पृष्ठ पहा.

18



दुसरे चित्र विषयवस्तू काही एक काळजीपूर्वक ऐकत असतानाचे भाव प्रदर्शि त करते. शरीर स्थितीमध्ये बदल केल्याने आवडीत (इं टरेस्ट) थोडी वाढ होते. तिसऱ्या चित्राचा निकाल आपण पाहूया, पुढील पृष्ठ पहा.

20



तिसरे चित्र अधिक जिवंतपणाची भर घालते, कारण विषयवस्तू वाढत्या आवडीच्या कसोट्या पार करण्यासाठी नृत्याचा अविर्भाव करते.

22



चौथ्या आणि शेवटच्या चित्रामध्ये विषयवस्तू आश्चर्य आणि उत्तेजना प्रदर्शि त करण्यासाठी, कॅमेऱ्याच्या जवळ आणली जाते.

24



विषयवस्तूची लिखित शब्दांची तुलना करून सगळी नियुक्त कामे तर्क संगत केली गेली. आकलन सुलभ होण्यासाठी चित्रांचे रुपांतर टंकलिखित स्वरुपात कशी व्यक्त केली जातात हे स्पष्ट करण्यासाठी शिक्षकाने प्रत्येक चौकटीसाठी टंकलिखित उत्तरे तयार केली. १. पहिल्या चित्रामध्ये, विषयवस्तूला व्यक्तिमत्व, स्वभाव आणि ओळख असल्यामुळे, फाँटसुद्धा व्यक्तिमत्वानुसार सारख्याच पद्धतीने वागतो: स्वतःचा स्वभाव असलेला, स्वतःचा ठराविक चेहरा असलेला, स्वतःची एक विशिष्ट ओळख असल्यासारखा. २. भाव आणि जिवंतपणा आणण्यासाठी, दुसऱ्या चित्राची अक्षरांशी तुलना केली जाते. ही अक्षरे आयटॅलिक स्वरुपात मांडली आहेत. ३. तिसऱ्या चित्रात विषयवस्तूचा विनोदी भाव अक्षरांमध्ये (फाँट) मांडला आहे. ४. चौथ्या आणि शेवटच्या चित्रात विषयवस्तू कॅमेराजवळ आल्यामुळे त्याची अक्षरांशी तुलना करताना, ती अक्षरे मोठी केली गेलेली आहेत. ज्यामुळे लक्ष वेधले जाते.

26


1.

2.

3.

4.


दृष्याक्रम शिकण्याच्या या पद्धतीचा प्रयोग देशाच्या निरनिराळ्या रचनासंस्थांमध्ये (डिझाइन स्कूल) केला गेला. या संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या कामाच्या निकालाची उदाहरणे येथे सादर केली आहेत.

नियु क्त काम ०१: एक विषयवस्तूचे वाढणाऱ्या आवडीनिशी फोटो काढण्याकरिता व त्यासाठीच्या टंकलिखित रुपांतरणाची रचना करण्यासाठी नियुक्त काम ०१ प्रमाणेच कृती होती. याबाबतीत फोटोंची संख्या चार ऐवजी तीनपर्यंत कमी केली. नियु क्त कामामध्ये टायपोग्राफीक रूपां त र म्हणजे काय? टायपोग्राफीक ट्रान्सलेशन म्हणजे दिलेल्या छायाचित्राचे अक्षरांत रुपांतर करणे. दिलेल्या जागेमध्ये टंकलेखनाच्या सहाय्याने केलेल्या व्यवस्थेची काढलेल्या फोटोशी तुलना करणे होय. कशाचे रुपां त र करणे गरजे चे आहे? आपणास रुपांतर करावयास लागणाऱ्या मुख्यतः तीन गोष्टी आहेत. १. समाविष्ट असलेल्या गोष्टी (विषय) = जे लिखित आहे ते (याबाबतीत विषयाचे नाव, फाँटची निवड). २. विहित जागा आणि घटक यांचा परस्परसंवाद = सापेक्ष प्रमाणात परिणती होणे [मोजमाप, महत्त्व (जोर)] ३. समाविष्ट गोष्टी (विषयवस्तू) व्यक्त करणे = टंकलेखनाच्या माध्यमातून भावना व्यक्त करणे बाजूच्या पृष्ठावर वाढत जाणारी आवड असलेल्या तीन चित्रांच्या मालिकेतील पहिले चित्र प्रदर्शि त केले आहे. अनुक्रमाने पुढे येणाऱ्या पृष्ठावर त्याचे टंकलिखित रुपांतरण आहे.

28



अगोदरच्या चित्राचे टायपोग्राफीक रुपांतरण - चित्रासारखेच दुसरे काहीतरी निर्माण करण्यासाठी निरनिराळ्या आकारांच्या अक्षरांचा प्रयोग केला आहे.

30


NISHANT NISHANT NIS NISHANT NISH NISHANT NISHA NISHANT NISH NISHANT NISH NISHANTNISH NIS NISH ANT NIS NISHANT NISHANT NI NISHANT NISHANT NISHA NISHANT NI NISHANT NISHA NISHA NISHANT N NISHAN NISHA NISHANT NI NISHANT NISHANT NISHANT NIS NISHANT NISHAN NIISHANT NIS NISHANT NISHANT NIS NISHANT NISHANT NISHANT NISHANT NISHANT NISHANT NIS NI SHANT NISHANT NISHAN NIS HANT NISHANT NISHANT N ISHANT NISHANT NISHANT NI NISHANT NISHANT NI SHANT NISHANT NISHANT NI SHAN


मालिकेतील दुसरे चित्र. वाढत जाणाऱ्या आवडीच्या कसोटीवर मुल्यांकित केलेली चित्राची योग्यता.

32



दुसऱ्या चित्रासाठी टायपोग्राफीक रुपांतर.

34


NISHANT NISHANT NI NISHANT NISH NISHANT NISH NISHANT NISH NIS NISHANTNIS NISHANT NIS NISHANT NISHANT NISHANT NIS NISHANT NISHANT NISHANT NISH NISHANT NI NISHANT NISHANT NI NISHANT NISHA NISH NISHANT NISHA NISH NISHANT NISHA NISHA NISHANT NISH NIISHA NISHANT NISH NISHA NISHANT NISHANT NISH NISHANT NISHANT NISHANT NISHANT NISHANT NISHANT NISHANT NISHANT NISHANT NISHANT NISHANT NISHANT


मालिकेतील तिसरे चित्र.

36



तिसऱ्या चित्राचे टायपोग्राफीक रुपांतर.

38


NISHANT NISHANT NISH NISHANT NISHA NISHANT NISHA NISHANT NISHA NISHANT NISHA NISHANT NIS NISHANT NISHANT NISHA NISHANT NISHANT NISHANT NIS NISHANT NISHANT NISHANT NISHANT NISHANT NISHANT NISHANT NISHANT NISHA NISHANT NISHANT NISHANT NISHANT NISHANT NISHAN NISHANT NISHANT N NISHANT NISHANT NISHANT NISH NISHANT NISH NISHANT NISHANT NISHANT NISH NISHANT NISHANT NISHANT NIS NISHANT NISHANT NIISHANT NIS NISHANT NISHANT NISHANT NISH NISHANT NISHANT NISHA NISHAN NISHANT NISHANT NISH NISHA NISHANT NISHANT NISH NISHA NISHANT NISHANT NISH NISH NISHANT NISHANT NIS NIS NISHANT NISHANT NIS NISH NISHANT NISHANT NISH


तीनही चित्रांचे अधिक निरीक्षण आणि त्यांचे एकत्रित टायपोग्रफिक रुपांतरण. चित्राशी सुसंगत असे टायपोग्राफीक प्रकटीकरण करण्याचा प्रयत्न केला जातो आणि ते यथायोग्य साध्यही केले जाते. विद्यार्थी दिलेल्या जागेमध्ये टायपोग्राफीचे वेगवेगळे प्रकार शोधतात. प्रमाण आणि व्हॅल्यू या दोन्ही गोष्टी हेतुपूर्वक मांडतात. टायपोग्राफीक रुपांतरण करण्यासाठी चित्राचा संदर्भ म्हणून उपयोग होतो. छायाचित्रासारखेच टायपोग्राफीक क रुपांतरण करण्याचे अनेक मार्ग आहेत. यापद्धतीत प्रत्येक मार्ग योग्य समजला जातो आणि त्याला प्रोत्साहनही दिले जाते. या कामामध्ये परिणाम हा कधीच एक नियुक्त उत्तर नसते. ही गोष्ट नियुक्त कामाला शोध घेण्यासारखे बनविते. हा शोध वस्तूनिष्ठ असतो कारण त्याचे मूल्यमापन कसोट्यांमध्ये उल्लेखिलेल्या तीन मुद्द्यांवर आधारलेले असते. १. घटक (कंटेन्ट) २. घटक (कंटेन्ट) + अवकाश यांचा संवाद (interaction) ३. घटक (कंटेन्ट) + प्रकटीकरण पुढील पृष्ठांमध्ये आपण आणखी उदाहरणे पाहू जेथे त्याच कामाची दुसऱ्या विषयवस्तूंशी अंमलबजावणी केली जाते.

40


NISHANT NISHANT NIS NISHANT NISH NISHANT NISHA NISHANT NISH NISHANT NISH NISHANTNISH NIS NISH ANT NIS NISHANT NISHANT NI NISHANT NISHANT NISHA NISHANT NI NISHANT NISHA NISHA NISHANT N NISHAN NISHA NISHANT NI NISHANT NISHANT NISHANT NIS NISHANT NISHAN NIISHANT NIS NISHANT NISHANT NIS NISHANT NISHANT NISHANT NISHANT NISHANT NISHANT NIS NI SHANT NISHANT NISHAN NIS HANT NISHANT NISHANT N ISHANT NISHANT NISHANT NI NISHANT NISHANT NI SHANT NISHANT NISHANT NI SHAN NISHANT NISHANT NIS HANT

NISHANT NISHANT NI NISHANT NISH NISHANT NISH NISHANT NISH NIS NISHANTNIS NISHANT NIS NISHANT NISHANT NISHANT NIS NISHANT NISHANT NISHANT NISH NISHANT NI NISHANT NISHANT NI NISHANT NISHA NISH NISHANT NISHA NISH NISHANT NISHA NISHA NISHANT NISH NIISHA NISHANT NISH NISHA NISHANT NISHANT NISH NISHANT NISHANT NISHANT NISHANT NISHANT NISHANT NISHANT NISHANT NISHANT NISHANT NISHANT NISHANT NISHANT NISHANT

NISHANT NISHANT NISH NISHANT NISHA NISHANT NISHA NISHANT NISHA NISHANT NISHA NISHANT NIS NISHANT NISHANT NISHA NISHANT NISHANT NISHANT NIS NISHANT NISHANT NISHANT NISHANT NISHANT NISHANT NISHANT NISHANT NISHA NISHANT NISHANT NISHANT NISHANT NISHANT NISHAN NISHANT NISHANT N NISHANT NISHANT NISHANT NISH NISHANT NISH NISHANT NISHANT NISHANT NISH NISHANT NISHANT NISHANT NIS NISHANT NISHANT NIISHANT NIS NISHANT NISHANT NISHANT NISH NISHANT NISHANT NISHA NISHAN NISHANT NISHANT NISH NISHA NISHANT NISHANT NISH NISHA NISHANT NISHANT NISH NISH NISHANT NISHANT NIS NIS NISHANT NISHANT NIS NISH NISHANT NISHANT NISH NISHANT NISHANT NISH


दुसऱ्या एका विद्यार्थ्याद्वारा त्याच प्रकारचे काम, चित्रासारखे दुसरे काही टायपोग्राफीक रुपांतरण देण्याकरिता चित्र – मालिकेचे फोटो काढणे. बाजूच्या पृष्ठावर विषयवस्तू मालिकेचे पुढील चित्र दिलेले आहे. अगोदारच्या कामासारखेच हे काम आहे: अनुक्रमाने वाढत जाणाऱ्या आवडीच्या पातळीनुसार तीन चित्रांचे फोटो काढणे. त्याचेच टायपोग्राफीक रुपांतरण पुढील पृष्ठावर असेल.

42



विषयवस्तू योग्य ते टायपोग्रफिक रुपांतरण निर्माण करण्यासाठी आपले पहिले नाव, 'सिद्धार्थ' याचे संक्षिप्त रूप 'सिद्' असे देते.

44



मालिकेतील दुसरे चित्र

46



दुसऱ्या चित्रासाठी टायपोग्राफीक रुपांतरण

48



मालिकेतील तिसरे चित्र

50



मालिकेतील तिसऱ्या चित्रासाठी टायपोग्राफीक रुपांतरण

52



विद्यार्थ्यांनी केलेले टायपोग्राफीक रुपांतरण हे अगोदरच्या पेक्षा अगदी वेगळे आहे. विद्यार्थी चित्राच्या गुणांची नक्कल करण्यासाठी, रचना वगैरे काही नसलेली वस्तू म्हणून अक्षरांच्या आकारांशी खेळतात. बाजूच्या पृष्ठावर तीनही चित्रे आणि त्यांची टायपोग्राफीक रुपांतरणे चित्रांच्या काढलेल्या फोटोसंदर्भात प्रदर्शि त केली आहेत. या कामाच्या शेवटी अक्षरांच्या आकारांचे प्रकार या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आवश्यक त्या भावना व्यक्त कसे करावे हे समजले. या ठिकाणी संदर्भ असलेला संदेश तीन भागांमध्ये रुपांतरीत करावयाचा आहे. पहिले म्हणजे समाविष्ट असलेल्या गोष्टी, दुसरे म्हणजे अवकाश आणि घटक यांचा परस्परसंवाद आणि तिसरे विषयवस्तूंचे भाव व्यक्त होणे. विद्यार्थ्यांना तीनही गोष्टींमधील परस्परसंबंधाचे आकलन झाले आणि टायपोग्राफीतील निर्णय तर्क संगत करण्यासाठी चित्रासमोर कायम करू शकले.

54



म्हणजे या उपक्रमातू न आपण काय निष्कर्ष काढतो? एका विहित जागेमध्ये पाहण्यासाठी अन्य कोणतीही गोष्ट नसल्यामुळे पाहणाऱ्याला एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करणे सोपे होते. (उजवीकडे असलेली प्रतिमा पहा.) पण याचा अर्थ असा नव्हे की आपण एक निरर्थक उत्तर सुचवू. दिलेल्या जागेमधील एखादी गोष्ट मनोरंजक पद्धतीने हाताळली जाऊ शकते. हे पृष्ठ पलटू न त्याच चित्राची मनोरंजक पद्धतीने कशी मांडणी केली जाऊ शकते हे पहा.

56



दिलेल्या जागेमध्ये एका घटकानीशी मनोरंजक जुळणी.

58



डावी बाजू > विद्यार्थी - दिप्तो डे सं स्था – एम्. आय. टी., पु णे कार्यशाळा : दृष्यक्रम

60

उजवी बाजू > विद्यार्थी – अमृ त ा पोकर्णा सं स्था – आय. डी. सी. कार्यशाळा : दृष्यक्रम



डावी बाजू > विद्यार्थी – पं खु र ी जै न सं स्था – एम्. आय. टी., पु णे कार्यशाळा : दृष्यक्रम

62

उजवी बाजू > विद्यार्थी – अजिं क्य चिकटे सं स्था – एम्. आय. टी., पु णे कार्यशाळा : दृष्यक्रम



पु ढे आपण या पु स्त काचा दुस रा भाग पाहतो. विषयवस्तूं च ी सं ख् या वाढवल्यावर दृष्यक्रमाची निर्मि ती या दुस ऱ्या भागात आपण पाहू. दिले ल् या जागे म ध्ये दोन विषयवस्तूं न िशी कशी रचना के ली जाऊ शकते याचा शोध.

64


भाग ०२ नियु क्त काम ०२ दोन विषयवस्तू - रां गे प्र माणे, कमी होत जाणाऱ्या उं चीनु स ार क्रम (१-२)......५६ निष्कर्ष ७५ नियु क्त काम ०३ दोन विषयवस्तू – उलट दिशे ने कमी होत जाणाऱ्या उं चीनु स ार क्रम (२-१).....७८ निष्कर्ष ....९९ नियु क्त काम ०४ दोन विषयवस्तू – समान महत्त्व (१-१)......१०२ निष्कर्ष १२७


या भागापासून आपण दुसरे नियुक्त काम सुरु करीत आहोत. आता दिलेल्या जागेमधील घटकांची (विषयवस्तूंची) संख्या वाढविली जाते. विरुद्ध बाजूकडील पृष्ठावर ज्यांच्याखाली दृष्यक्रम पसंतीनुसार फोटो काढले जावेत तसेच फोटो काढल्यानंतर ते पाहणाऱ्याने कसे पहावेत हे सुचविणारा एक आणि दोन असा क्रम आहे.

66.  भाग २. दोन विषयवस्तूनिशी प्रयोग


दोन विषयवस्तू, दृष्यक्रम निर्माण करा.


या कामासाठी विद्यार्थ्यांच्या पहिल्या गटामधून आपण विषयवस्तू निवडाव्या. आपल्याजवळ दोन विषयवस्तू आहेत. राहुल आणि नवेंद.ू ज्यांचे दृष्याक्रम नंबर ०१ आणि ०२ नुसार फोटो काढले जावेत. याचा अर्थ असा की जेव्हा अंकांवर आधारलेल्या क्रमाने पांढऱ्या पार्श्वभूमीवर या दोन विषयवस्तूंचा फोटो काढला जाईल आणि तो दर्शकांस दाखविला जाईल, तेव्हा त्यात राहुल प्रथम दिसला पाहिजे आणि त्यानंतर नवेंद.ू

68.  भाग २. दोन विषयवस्तूनिशी प्रयोग



विद्यार्थ्यांनी दिलेल्या कसोट्या पूर्ण केल्या. या पर्यायामध्ये एक अडचण होती की हे अपेक्षित उत्तर होते. जर दुसऱ्याचा चेहरा तुम्ही लपविला तर स्वाभाविकपणे पहिल्या विषयवस्तूला जास्त महत्त्व प्राप्त होईल. याचा अर्थ असा नव्हे पहिला पर्याय चुकीचा आहे पण अधिक चांगल्या पर्यायाचा विचार केला जाऊ शकतो. दुसऱ्या विषयवस्तूचा चेहरा न लपविताही चित्र निर्माण करणे ही सृजनशीलता आहे. या चित्रामध्ये शरीराच्या इतर भागामध्ये चेहरा ही ओळख (लक्ष वेधून घेणारा भाग) आहे. ही ओळख आणि विषयवस्तूंची रचना दृष्यक्रमाचा अनुक्रम ठरवितात. येथे हा उल्लेख करणे आवश्यक आहे की चित्रामधील विषयवस्तू पाहणाऱ्याला, निर्मिती/ आवश्यक दृष्यक्रमाची योग्यता याबाबत त्याचा निर्णय देण्या आणि तो पक्का करण्याअगोदर ती व्यक्ती अनोळखी असावी.

70.  भाग २. दोन विषयवस्तूनिशी प्रयोग



फोटो अशा रीतीने काढा की जेव्हा तो फोटो पाहणा�ासमोर सादर केला जाईल तेव्हा उं च व्यक्ती ही ठें गण्या व्यक्तीच्या अगोदर नजरेत येईल. नियुक्त काम ०२ मध्ये दुसरा गट कशी प्रगती करतो हे आपण पाहू.

72.  भाग २. दोन विषयवस्तूनिशी प्रयोग



मनोरंजक पर्याय! विषयवस्तू जी दृष्यक्रमामध्ये क्रमांक एकची मानली गेली होती तिला पुढे आणले जाते आणि दुसऱ्या विषयवस्तूला मागे पाठविले जाते. पूर्वनियोजित उद्दिष्ट साध्य करण्याकरिता जाणीवपूर्वक केलेली ही कृती. या पर्यायमध्ये थोडी संदिग्धता दिसते आणि प्रथम नजरेत येणाऱ्यामध्ये पसंतीचा कल दुसऱ्या विषयवस्तूकडे जाऊ शकतो, कारण त्या व्यक्तिचे स्मितहास्य.

74.  भाग २. दोन विषयवस्तूनिशी प्रयोग



त्याच पर्यायांकरिता टायपोग्रफिक रुपांतरण. दृष्यक्रमामध्ये प्रथम नजरेत येणाऱ्या (अभिषेकची) आणि दुसऱ्या विषयवस्तूची प्रथम नजरेत येणाऱ्या (दिनेश) त्यानंतर या कसोटीची तो पूर्तता करतो.

76.  भाग २. दोन विषयवस्तूनिशी प्रयोग



अगोदरच्या चित्रामध्ये थोडीशी संदिग्धता असल्या कारणाने पर्याय पुन्हा केला गेला. तरीसुद्धा तो अयशस्वी झाला कारण दुसऱ्या विषयवस्तूचा चेहरा एका बाजूला झुकलेला आहे, जो लक्ष वेधून घेतो किंवा रस निर्माण करतो. पुढील पृष्ठावर यासाठीचे टायपोग्राफीक रुपांतरण आपण पाहूया.

78.  भाग २. दोन विषयवस्तूनिशी प्रयोग



टायपोग्राफीचा मनोरंजक वापर. दुसरी मनोरंजक वस्तू म्हणजे दिनेशच्या झुकलेल्या चेहऱ्याचे​े रुपांतरण अक्षरांच्या आकारांनी केले आहे. अभिषेक पहिला नजरेत यावा आणि दिनेश त्यानंतर या कसोटीची ते पूर्तता करतात. परिणाम अगदी चांगले दिसतात. आवश्यक त्या कसोटीची यात पूर्तता केली गेली.

80.  भाग २. दोन विषयवस्तूनिशी प्रयोग



मालिकेतील तिसरे चित्र हे दिलेल्या दृष्य आव्हानासाठी आपला परिपूर्ण पर्याय आहे. विषयवस्तू क्रमांक १ ही तिचे महत्त्व वाढविण्यासाठी कॅमेऱ्याजवळ आणली जाते. चेहऱ्यावर कोणतेही भाव व्यक्त न करणारी दुसरी विषयवस्तू दृष्यक्रमामध्ये दुसरी दिसावी म्हणून मागे ढकलली जाते.

82.  भाग २. दोन विषयवस्तूनिशी प्रयोग



एक बुद्धिमान टायपोग्राफीक रुपांतरण दोन विषयवस्तूंच्या नावातील अद्याक्षरे डोळ्यात भरणारी करून लक्ष आकर्षि त करणे. चित्राच्या संदर्भामध्ये संबंधित विषयवस्तूंच्या दृष्य महत्त्वांचा तोल सांभाळण्याकरिता वेगवेगळ्या मूल्यांच्या मोठया अक्षरांचा उपयोग करण्यात आलेला आहे.

84.  भाग २. दोन विषयवस्तूनिशी प्रयोग



तीनही चित्रे त्यांच्या टायपोग्राफीक रुपांतरणसहित जर आपण उजव्या बाजूकडील पृष्ठावर असलेल्या तीनही पर्यायांची तुलना केली तर आपण असा निष्कर्ष काढू शकतो की आपला हेतू निकषांची पुरश े ी पूर्तता करणारा पर्याय शोधणे हा नाही तर त्याच प्रश्नासाठी अधिक विकल्प निर्माण करण्याची सवय विकसित करणे हा आहे. साध्या शब्दांत असे म्हणू की हा शोध बरोबर उत्तराकरिता नाही तर तो चांगल्या (उत्तम) उत्तराकरिता आहे.

86.  भाग २. दोन विषयवस्तूनिशी प्रयोग



या विभागामध्ये आपण तिसऱ्या नियोजित कामाची सुरुवात करतो. या बाबतीत दृष्यक्रम अगोदरच्या कामामध्ये जसे करावयाचे होते त्याच्या अगदी विरुद्ध म्हणजे उलट केला आहे.

88.  भाग २. दोन विषयवस्तूनिशी प्रयोग


दोन विषयवस्तू, दृष्यक्रम निर्माण करा.


उजवीकडे ज्यांच्या खाली दृष्यक्रम स्पष्ट करणाऱ्या संख्यावाचक आकडे आहेत अशी चित्रे आहेत. असा फोटो काढा की पाहणाऱ्याच्या दृष्य्क्रमामध्ये कमजोर विषयवस्तू (उं चीने कमी असलेली) क्रमांक 1 वर असेल आणि बलवान विषयवस्तू (उं चीने जास्त असलेली) क्रमांक 2 वर असेल.

90.  भाग २. दोन विषयवस्तूनिशी प्रयोग



विद्यार्थ्यांनी काढलेले फोटो आवश्यक निकषांची पूर्तता करतात. कमजोर विषयवस्तू (उजवी) त्याच्या प्रभावी हावभावामुळे दृष्यावर अधिकार प्रस्थापित करते आणि लक्ष आकर्षि त करून दृष्यक्रमामध्ये क्रमांक एक पदावर स्वतःस नेते. जेव्हा चित्राची पडताळणी दर्शकांना दाखवून केली गेली तेव्हा त्यांनी कमजोर विषयवस्तूला जास्त पसंती दिली आणि अगदी थोड्या दर्शकांनी ज्यांना दुसऱ्या विषयवस्तूसाठी वाईट वाटले त्यांनी निवडे केली. त्याची परिणती अशी परिस्थिती निर्माण करण्यात झाली की पर्यायात संदिग्धता निर्माण करण्यात झाली. जागरूकपणे रचना केलेल्या मांडणीला संदिग्धतेमध्ये सोडले जाऊ शकत नाही. आपण हा पर्याय अशा रीतीने बदलू शकू की नेमून दिलेल्या कामासाठी दिलेल्या निकषांनुसार सगळे च प्रेक्षक आपली पसंती कमजोर विषयवस्तूला देतील. कदाचित होय.

92.  भाग २. दोन विषयवस्तूनिशी प्रयोग



पार्श्वभूमीमधील बदल प्रथम काय पहिले जावे हे ठरवितो. रचनेमध्ये उत्सर्जन (रेडिएशन) या तत्त्वाचा उपयोग करून आपण दृष्यक्रम निश्चित करून संदिग्धता कमी करू शकतो. आता सर्व दर्शकांनी रागावलेले हावभाव असलेल्या विषयवस्तूला मत दिले आणि त्याची पसंती दुसऱ्या विषयवस्तूला दिली.

94.  भाग २. दोन विषयवस्तूनिशी प्रयोग



माहिती ज्ञान देणारी किंवा मन वळविणारी असू शकते. ज्या संदर्भातील संदेश पोहोचवावयाचा आहे त्यावर ते अवलंबून असते. उत्सर्जित होणाऱ्या रेषांमधील थोडासा बदल या मन वळविण्याकरिता (आकर्षण/रस) थोडी वाढ करू शकतो.

96.  भाग २. दोन विषयवस्तूनिशी प्रयोग



जेव्हा आपण रचना करतो तेव्हा आपले एवढे नियंत्रण असते की आपण दृष्यक्रमास उलटसुद्धा करू शकतो म्हणून रचना करण्याची कृती ही पूर्वनियोजित, जाणीवपूर्वक आणि वस्तूनिष्ठ असते.

98.  भाग २. दोन विषयवस्तूनिशी प्रयोग



दुसरा समूह तेच काम कसे करतो हे आपण पाहू.

100.  भाग २. दोन विषयवस्तूनिशी प्रयोग



चेहऱ्यावरील गुदमरण्याच्या बोलक्या हावभावामुळे दिनेशला अधिक पसंती मिळते. आवश्यक दृष्यक्रम निर्माण करण्याबारोबरच एक चित्रकथासुद्धा जोडली जाते. ती चित्रकथा दोन्ही विषयवस्तूंना एकत्र बांधते.

102.  भाग २. दोन विषयवस्तूनिशी प्रयोग



अक्षर भावना व्यक्त करते. महत्त्व, प्रमाण, दिशा आणि स्थान यामुळे दिनेशला दृष्यक्रमात अगोदरची जागा मिळाली बोलक्या टायपोग्राफीमुळे हे उदाहरण झाले: काढलेल्या फोटोच्या संदर्भात दिनेश या नावाची गुदमरण्याची अवस्था ते व्यक्त करते.

104.  भाग २. दोन विषयवस्तूनिशी प्रयोग



तेच नियोजित काम करणारे आणखी एक चित्र, दृष्यक्रमामध्ये कमजोर विषयवस्तू क्रमांक एकवर असणे.

106.  भाग २. दोन विषयवस्तूनिशी प्रयोग



एकाच चित्रासाठी तीन विद्यार्थी वेगवेगळी तीन टायपोग्राफीक रुपांतरणे देतात. जर आपण तीनही रुपांतरणाची तुलना केली तर पहिले रुपांतरण दिनेश हा शब्द पहिला दिसण्याचा निकष पूर्ण करते, परंतु चित्रात जसा दिसतो तसा अक्षर प्रकारातील आक्रमकतेचा अभाव जाणवतो. तिसऱ्या चित्राला लागून असलेले शेवटचे / तळाचे (टायपोग्राफीक रुपांतरण) अक्षरप्रकाराद्वारे विषयवस्तूची अभिव्यक्ती आणि आक्रमकता परावर्तीत करते.

108.  भाग २. दोन विषयवस्तूनिशी प्रयोग

चित्राच्या संदर्भाशिवाय अक्षरप्रकारामधील आक्रमकता स्पष्ट करण्यासाठी शिक्षकाला कोणत्या अडचणींना तोंड द्यावे लागेल याची कल्पना करा.



दोन विषयवस्तुनिशी दृष्यव्यवस्था व्यक्त करणारे चित्र ज्या वस्तूला महत्त्व द्यावयाचे आहे किंवा जिने लक्ष आकर्षि त करावयाचे आहे, त्यास प्राधान्य देऊन आपण दृष्यव्यवस्था ठरवू शकतो.

110.  भाग २. दोन विषयवस्तूनिशी प्रयोग



समान दृष्यपसंतीनिशी दोन विषयवस्तू. दृष्यव्यवस्था निर्माण करा.

112.  भाग २. दोन विषयवस्तूनिशी प्रयोग


दोन विषयवस्तू, समान महत्त्व निर्माण करा.


नियुक्त काम ०४ चा उद्देश समान महत्त्व निर्माण करणे​े हा होता. समान महत्त्व म्हणजे, बाजूस दर्शविलेल्या दोन विषयवस्तूंपैकी कोणालाही दुसऱ्यापेक्षा जास्त महत्त्व असू नये. दुसऱ्या शब्दांमध्ये, पाहणाऱ्याने दोन विषयवस्तू एक समूह म्हणून पहाव्यात. पाहणाऱ्याने एक तर आपल्या दृष्यपसंतीचे मत दोन्ही विषयवस्तूंसाठी द्यावे अथवा कोणालाही देऊ नये. जर पसंती त्यापैकी एका बाजूला झुकलेली असेल तर दोघांसाठी समान महत्त्व निर्माण करण्याचा आवश्यक तो निकष अयशस्वी होईल. हे काम आव्हानात्मक बनविण्यासाठी या कामात आपण एक कमजोर आणि दुसरी बलवान अशा विषयवस्तूंची हेतूपूर्वक निवड केली.

114.  भाग २. दोन विषयवस्तूनिशी प्रयोग



हा त्यांचा पर्याय होता, सारख्या हावभावांनी समानता संपादन करण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण दोन्ही विषयवस्तूंसाठी समान महत्त्व या निकषाची पूर्तता करण्यात अयशस्वी ठरले. प्रेक्षकांनी एक तर डावी किंवा उजवी विषयवस्तू पसंत केली. हे काम अयशस्वी झाले.

116.  भाग २. दोन विषयवस्तूनिशी प्रयोग



एकमेकांपासून वेगळ्या उभ्या असणाऱ्या दोन विषयवस्तूंनी जागेचे स्पष्ट फरक निर्माण केले आणि त्या रचनेने वेगळी व्यक्तिमत्त्वे निर्माण करण्यास प्रोत्साहन दिले. विद्यार्थ्यांना सांगितले गेले की जर त्यांनी विषयवस्तू जवळ आणल्या असत्या तर त्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वांचा वेगळे पणा संपुष्टात आला असता.

118.  भाग २. दोन विषयवस्तूनिशी प्रयोग


उं ची

अं त र


तेच काम पण दुसऱ्या विषयवस्तूनिशी

120.  भाग २. दोन विषयवस्तूनिशी प्रयोग



एक चांगला पर्याय! परंतु तरीसुद्धा विषयवस्तू संपूर्ण समूह निर्माण करीत नाहीत ती वेगळी व्यक्तिमत्त्वे दिसतात.

122.  भाग २. दोन विषयवस्तूनिशी प्रयोग



आपण विषयवस्तू एकमेकांच्या इतक्या जवळ आणूया की ते एकमेकांना झाकतील. अंतर (निकटता) हा समूह बनविण्यासाठी किंवा तो फोडण्यासाठी संवेदनक्षम किंवा निर्णायक बदल घडविणारा असा आहे. (गेस्टाल्टचे नियम पहा.)

124.  भाग २. दोन विषयवस्तूनिशी प्रयोग



सारखेपणा निर्माण करण्यासाठी आणि श्रेष्ठत्व घालवून समान महत्त्व निर्माण करण्यासाठी आपण विषयवस्तूंच्या उं चीमाधला फरक कमी करतो.

126.  भाग २. दोन विषयवस्तूनिशी प्रयोग



त्यापूर्वी दोन्ही विषयवस्तू वेगळ्या आणि दोन व्यक्तिमत्त्वे असलेल्या म्हणून ओळखल्या गेल्या होत्या. दोन विषयवस्तूंच्या एकमेकांना झाकण्याने समूह बजाविण्याकरिता त्यांच्यासाठी एकच रूपरेषा निर्माण केली.

128.  भाग २. दोन विषयवस्तूनिशी प्रयोग



विद्यार्थ्यांनी काढलेल्या फोटोंसाठी टायपोग्राफीक रुपांतरण. विषयवस्तूंऐवजी त्यांच्या नावांचा उपयोग केला गेला. निकष तोच होता. कोणत्याही नावाला दुसऱ्यापेक्षा जास्त पसंती असू नये. दोन्ही नवे पसंतीमध्ये तठस्थ असू शकतात. पसंतीमध्ये डावीकडचा अभिषेक हा शब्द प्रथम वाचला जातो. समान महत्त्व असलेल्या आपल्या निकषाची तो पूर्तता करू शकत नाही.

130.  भाग २. दोन विषयवस्तूनिशी प्रयोग



आणखी एक पर्याय, तथापि तोही अयशस्वी होतो. दिशावाचन आणि स्थान, लिखित शब्दासाठी नेहमीच दृष्यक्रम पसंतीवर परिणाम करतील. जर आपण शब्दांची त्याच स्थानावर सुरुवात करून डाव्या बाजूस सरळ रेषेत मांडणी केली तर कोणताही एक शब्द सर्वांत वर किंवा तळाशी ठेवला जाईल. सर्वांत वरच्या शब्दाला आपल्याला वरून खाली आणि डावीकडू न उजवीकडे वाचण्याच्या सवयीमुळे जास्त पसंती मिळे ल. विद्यार्थी गोंधळतात. एखादी व्यक्ती समान महत्त्व कसे निर्माण करील? प्रथम दृष्टीक्षेपात विशिष्ट रचनेचा पर्याय तो सोडविला जाईपर्यंत तो अशक्य वाटतो.

132.  भाग २. दोन विषयवस्तूनिशी प्रयोग



आणखी एक प्रयत्न अयशस्वी झाला, कारण सारखेपणा समूह निर्माण करतो. जेव्हा समूह निर्माण केले जातात तेव्हा तेथे स्पष्टपणे पसंती असते.

134.  भाग २. दोन विषयवस्तूनिशी प्रयोग



शेवटी पर्याय उपयोगी ठरतो कारण कोणत्या शब्दाला पसंती मिळावी यासंदर्भात तो पाहणाऱ्याच्या मनात संदिग्धता निर्माण करतो आणि त्याचा परिणाम एखादी संपूर्ण वस्तू पाहणे किंवा आकार नसलेला एखादा ढीग पाहणे असा होतो. विद्यार्थ्यांना सारखेपणाचा अभाव प्राप्त करण्याच्या जाणीवपूर्वक प्रयत्नाने व्यक्तिमत्त्वे संपुष्टात आणण्याच्या कल्पनेचे आकलन होते.

136.  भाग २. दोन विषयवस्तूनिशी प्रयोग



तिघेही एकत्रित काम करून योग्य तो पर्याय मिळविण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे कामाचे उद्दिष्ट निश्चित होते आणि शोध करावयास प्रोत्साहन मिळते.

.

138.  भाग २. दोन विषयवस्तूनिशी प्रयोग



बाजूच्या चित्राची पार्श्वभूमी अगोदरच्या टायपोग्राफीक पर्यायामधील अभिषेक आणि दिनेश या शब्दांसारखेच काम करते. त्यांच्यापैकी कोणीही लक्ष आकर्षि त करण्यासाठी ओरडू न सांगत नाही. बाजूच्या फोटोच्या माध्यमातून तीच कल्पना स्पष्ट केली आहे. विषयवस्तूला केंद्रस्थानी ठेवून पार्श्वभूमी जास्त प्रकाशात आणल्यामुळे लक्ष पार्श्वभूमीपेक्षा विषयवस्तूकडे वळविले जाते. पार्श्वभूमी जास्त उठू न दिसते, जास्त दृष्टीक्षेपात येते. असे शब्द दृष्य आरेखनाची तत्त्वे विद्यार्थ्यांना समजाविण्याचा प्रयत्न करताना अारेखनाचे शिक्षण देणाऱ्या शिक्षकांकडू न वापरले जातात. वरवर पाहता असे म्हणणे तर्काला सोडू न आहे असे दिसते. पण त्याखाली तर्क शुद्ध बळकट आधार आहे. जो दृष्यक्रम एक वेगळी शिक्षणपद्धती म्हणून फोटोच्या माध्यमातून स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो.

140.  भाग २. दोन विषयवस्तूनिशी प्रयोग



पु स्त काचा तिसरा भाग पहा आणि जशी विषयवस्तूं च ी संख्या वाढते तशी दृष्यक्रमाच्या निर्मि तीचे निरीक्षण करा.

142.  भाग २. दोन विषयवस्तूनिशी प्रयोग


भाग ३ नियु क्त काम ०५ तीन विषयवस्तू – रां गे प्र माणे, कमी होत जाणाऱ्या उं चीनु स ार क्रम (१-२-३) १३३ निष्कर्ष १६२ नियु क्त काम ०६ तीन विषयवस्तू – उलट दिशे ने कमी होत जाणाऱ्या उं चीनु स ार क्रम (३-२-१) १६५ निष्कर्ष १७५ नियु क्त काम ०७ - दहा विषयवस्तू – दृष्यक्रम १७९ निष्कर्ष १८५

भिन्न गोष्टीमधील समानते च ा नकाशा काढणे १८६ क्रमव्यवस्था २१० ऋणनिर्देश २१६


तीन विषयवस्तू, दृष्यक्रम निर्माण करणे

144.  भाग ३. तीन किं व ा जास्त विषयवस्तूनिशी प्रयो


तीन विषयवस्तू, दृष्यक्रम निर्माण करा.


विषयवस्तू : राहुल, क्षितीज आणि नवेंद ू (डावीकडू न उजवीकडे) या तीन विषयवस्तूंचे अशा रीतीने फोटो काढा की आवश्यक दृष्यक्रम निर्माण होईल.

146.  भाग ३. तीन किं व ा जास्त विषयवस्तूनिशी प्रयो



चांगला पर्याय! दुसऱ्या दोघांना धरून मध्यभागी असलेल्या विषयवस्तू दृष्यप्रवाह निर्माण करते. डावीकडील विषयवस्तू क्रमांक २ होण्यासाठी थोडीशी वर पाहते आणि क्रमांक ३ वर खाली येण्यासाठी तिसरी विषयवस्तू तिचा बराचसा चेहरा झाकते आहे.

148.  भाग ३. तीन किं व ा जास्त विषयवस्तूनिशी प्रयो



नियुक्त काम, रेषाकृती आराखड्याने उदाहरणे देऊन दृष्य्प्रवाह स्पष्ट करते. पाहणाऱ्याला पूर्वनिश्चित / पूर्वआरेखित केलेल्या दृष्यक्रमाच्या माध्यमातून कसे पुढे नेले जाऊ शकते हे आपल्याला ते सांगते. टायपोग्राफीतील बदलणारे प्रमाण आणि विषयवस्तूंनी एकमेकांना धरणे या गोष्टी दृष्यप्रवाह निर्माण करणारी रचना करण्यासाठी एकत्र येतात.

150.  भाग ३. तीन किं व ा जास्त विषयवस्तूनिशी प्रयो



अगोदरच्या नियुक्त कामासारखेच काम. तीन विषयवस्तू, दृष्यक्रम निर्माण करा.

152.  भाग ३. तीन किं व ा जास्त विषयवस्तूनिशी प्रयो



पर्याय उपयोगी ठरत नाहीत. पाहणाऱ्याचे लक्ष भिन्न दिशांना भरकटले गेले. पाहणाऱ्याला कोणतीही एक विषयवस्तू निवडण्याची आणि ती अधिकारवाणीने सांगण्याची मोकळीक होती. नियुक्त कामामधील दृष्यांची प्राधान्यता दुर्लक्षित केली गेली. पर्याय आवश्यक त्या निकषांची पूर्तता करीत नाही.

154.  भाग ३. तीन किं व ा जास्त विषयवस्तूनिशी प्रयो



योग्य अनुक्रमानिशी पर्याय. अतिशय उपयोगी आणि सुव्यवस्थित आहे. पर्याय दिलेल्या निकषांची पूर्तता करतो पण अधिक विकल्प शोधले जाऊ शकतात. उदाहरणार्थ, दूरध्वनीधारकांची मूळाक्षरानुसार नोंद केलेली नावे आणि पत्ते देणारी पुस्तिका.

156.  भाग ३. तीन किं व ा जास्त विषयवस्तूनिशी प्रयो



दृष्यक्रम ठरविण्यामध्ये रिकामी जागा महत्त्वाची भूमिका बजाविते. ही पांढऱ्या रंगाची किंवा रिकामी जागा आणि आत समाविष्ट असलेल्या गोष्टी परस्परांवर (संवाद) क्रिया करतात. रेषाकृती रचना करणाऱ्या या जागेविषयी अतिशय संवेदनक्षम असला पाहिजे. त्याने त्याच्या डोळ्यांना ही जागा पाहण्यासाठी (शून्यात पाहण्यासाठी) तयार केले पाहिजे. उजव्या बाजूस पांढऱ्या जागेच्या समावेशाचा अभ्यास करण्याकरिता एक उदाहरण आहे. डाव्या बाजूस असलेल्या आपल्या विषयवस्तूवर लक्ष आकर्षि त करण्यास त्याची मदत होते.

158.  भाग ३. तीन किं व ा जास्त विषयवस्तूनिशी प्रयो



उजव्या बाजूकडू न पांढऱ्या मोकळ्या जागेची भर दृष्यक्रम बदलते. उजवीकडील विषयवस्तू पांढऱ्या मोकळ्या जागेमुळे तसेच तो आकाराने लहान असूनसुद्धा त्याला मध्यभागी सरकविल्यामुळे दृष्यक्रमामध्ये क्रमांक १ चा होतो.

160.  भाग ३. तीन किं व ा जास्त विषयवस्तूनिशी प्रयो



अगोदरचे पर्याय सहज होते म्हणून विद्यार्थी नियुक्त काम पुन्हा करतात. तथापि अपेक्षित दृष्यक्रम प्राप्त करण्यास पर्याय अयशस्वी होतो. जर दुसरी विषयवस्तू (अगदी डावीकडे असलेली) कॅमेऱ्याकडे तोंड करून असती तर अपेक्षित दृष्यक्रम साध्य केला जाऊ शकला असता.

162.  भाग ३. तीन किं व ा जास्त विषयवस्तूनिशी प्रयो



आणखी एक पर्याय, परंतु पहिल्या दोन विषयवस्तूंचा (उजवीकडू न) एक समूह निर्माण करीत संपूर्ण हावभावामधील मधला भाग लक्ष खेचून घेतो. पर्याय अधिक चांगला करण्याकरिता विद्यार्थ्यांना तो बदलावा लागेल. विद्यार्थ्यांनी केलेला दुसरा प्रयत्न पाहण्यासाठी आपण पुढू े पाहूया.

164.  भाग ३. तीन किं व ा जास्त विषयवस्तूनिशी प्रयो



आता पर्याय उपयोगी ठरतो, तो दृष्यक्रमाच्या पूर्वनिश्चित निकषांची पूर्तता करतो आणि यात एक कथासुद्धा गुंफलेली आहे. विषयवस्तू (उजवीकडू न) आपल्याकडे (कॅमेऱ्यामध्ये) आपले लक्ष प्रथम आकर्षि त करण्यासाठी पाहते. डोके धरलेला हात आपल्या दृष्य मार्गाची पुढे दुसऱ्या विषयवस्तूकडे दिशा दाखवितो आणि शेवटी तिसऱ्या विषयवस्तूकडे खाली उतरतो.

166.  भाग ३. तीन किं व ा जास्त विषयवस्तूनिशी प्रयो



एक साधा कंटाळवाणा निरस टायपोग्राफीतील पर्याय आवश्यक त्या निकषांची पूर्तता करतो, परंतु आपणास जे सहज आहे त्यापेक्षा काहीतरी अधिक शोधण्याची गरज आहे.

168.  भाग ३. तीन किं व ा जास्त विषयवस्तूनिशी प्रयो



मनोरंजक, सृजनशील पण थोडीशी संदिग्धता. वाचनीयता ही एक कठीण गोष्ट दिसते.

170.  भाग ३. तीन किं व ा जास्त विषयवस्तूनिशी प्रयो



थोडेसे कान पिरगळण्याने प्रश्न सुटतात. आता हा पर्याय उपयोगी तसाच मनोरंजक आहे.

172.  भाग ३. तीन किं व ा जास्त विषयवस्तूनिशी प्रयो



तीनही पर्याय एकत्र. जेव्हा आपण तीनही टायपोग्राफीतील पर्यायांची तुलना करतो आपण असा निष्कर्ष काढू शकतो की पहिला पर्याय हा चुकीचा नाही, परंतु तिसरा बरोबर तसाच मनोरंजक आहे. रेषाकृती रचनेमध्ये एक पूर्ण निर्दोष उत्तरापेक्षा आपण अधिक पर्याय शोधण्याचे प्रयत्न करतो.

174.  भाग ३. तीन किं व ा जास्त विषयवस्तूनिशी प्रयो



तीन विषयवस्तू उलट क्रमाने.

176.  भाग ३. तीन किं व ा जास्त विषयवस्तूनिशी प्रयो


तीन विषयवस्तू, दृष्यक्रम निर्माण करा.


तीनही विषयवस्तूंची चित्रे. कमकुवत विषयवस्तू (उजवीकडू न डावीकडे) दृष्यक्रमामध्ये क्रमांक १ ची म्हणून पहिली जावी. एक कठीण नियुक्त काम.

178.  भाग ३. तीन किं व ा जास्त विषयवस्तूनिशी प्रयो



उत्कृष्ट हावभाव. परंतु विषयवस्तू (डावीकडू न उजवीकडे) जी क्रमांक ३ ची म्हणून पहिली जावी असे मानलेले होते ती क्रमांक 1 ची ठरली. दृष्यक्रमाच्या आवश्यक संकल्पनेची पूर्तता करण्यात पर्याय अयशस्वी होतो.

180.  भाग ३. तीन किं व ा जास्त विषयवस्तूनिशी प्रयो



विषयवस्तूंचे अधिक आकर्षक हावभाव टायपोग्राफीतील मांडणीमध्ये दिशाबद्दल किंवा शरीरस्थितीची नेहमी सारख्या नसलेल्या किंवा अधिक प्रभावशील घटकांशी तुलना केली जाऊ शकते. अक्षरांच्या ठशाचा ठळकदर्शनी भाग आणि अक्षरांच्या ठशाच्या आकारामध्ये वाढ दुसऱ्या घटकांच्या तुलनेमध्ये लक्ष अधिक आकर्षि त करते आणि वेधून घेते.

182.  भाग ३. तीन किं व ा जास्त विषयवस्तूनिशी प्रयो


god

death


दृष्यक्रम निर्माण करणे. अगोदरच्या नियुक्त कामाप्रमाणेच पण उलट क्रम केला आहे. कमकुवत विषयवस्तू (उजवीकडची) दृष्यक्रमामध्ये क्रमांक १ ची म्हणून पहिली जावी.

184.  भाग ३. तीन किं व ा जास्त विषयवस्तूनिशी प्रयो



एक यशस्वी प्रयत्न. तो निकषांची पूर्तता करतो आणि आवश्यक तो क्रम निर्माण करतो. याबरोबरच एक कथाही त्यात गुंफली आहे. जी रस निर्माण करण्याकरिता आणि परिणाम सादर करण्यासाठी मन वळविण्याचा परिणामकारक उपयोग स्पष्ट करते.

186.  भाग ३. तीन किं व ा जास्त विषयवस्तूनिशी प्रयो



फोटो घेण्याच्या पध्दतीतील योग्य ठिकाणी (टाईट क्रॉपिंग) पर्यायाची योग्यता वाढविते. आवश्यक गोष्टींना प्राधान्य देऊन अनावश्यक ते घालविते.

188.  भाग ३. तीन किं व ा जास्त विषयवस्तूनिशी प्रयो



दहा विषयवस्तुनिशी दृष्यक्रम.

190.  भाग ३. तीन किं व ा जास्त विषयवस्तूनिशी प्रयो


दहा विषयवस्तू, दृष्यक्रम निर्माण करा.


विषयवस्तूंची संख्या दहापर्यंत वाढविली जाते. दहामध्ये एक स्त्री विषयवस्तूचा अंतर्भाव केला जातो. नियुक्त काम ०७ ची अंबलबजावणी करण्याअगोदर पूर्वनिश्चित केलेला क्रम ज्या त्या विषयवस्तूचा फोटो काढला जावा तो ठरविला जातो. (उजवीकडील चित्र पहा) आवश्यक तो दृष्यक्रम प्राप्त केला जात आहे किंवा नाही यासाठी त्याचा पुरावा म्हणून उपयोग होईल.

192.  भाग ३. तीन किं व ा जास्त विषयवस्तूनिशी प्रयो



मर्यादित जागेमध्ये बऱ्याच घटकांशी दृष्यक्रम निश्चित करण्याच्या त्रासाची विद्यार्थ्यांना कल्पना येते. पर्याय अयशस्वी होतो.

194.  भाग ३. तीन किं व ा जास्त विषयवस्तूनिशी प्रयो



(उजवीकडील चित्र) भारतातील आसाम राज्यातील गुवाहाटी शहरामध्ये एका छापील जाहिरातीतील मर्यादित जागेत वाढत जाणाऱ्या भिन्न विषयवस्तूंमधील साम्याचा टायपोग्राफीशी सारखेपणा: हे उदाहरण दृष्यरचना पर्यायांमधील दृष्यक्रमाचा अभाव स्पष्ट करीत विद्यार्थ्यांना ही कल्पना आत्मसात करण्यास मदत करते. एका दिलेल्या जागेमध्ये खूपच घटकांची हाताळणी करण्याची धडपड आणि स्पष्ट दृष्यक्रम पाहण्यातील गोंधळ निर्माण करतात.

196.  भाग ३. तीन किं व ा जास्त विषयवस्तूनिशी प्रयो


एका मर्यादित जागे म ध्ये वेगवेगळी व्यक्तिमत्वे असले ल् या घटकां म धील साम्य दर्शविणारा बोर्ड.


दिलेल्या माहिती संचाच्या मर्यादेत कुठे प्रथम पहावे हे पाहणाऱ्याला आपण अधिक अधिकारवाणीने सांगू शकतो. उजवीकडील छायाचित्रात आपण असे सांगू शकतो कि प्रेक्षकाचे लक्ष हे एका ठिकाणी केंद्रीत होते. समान पद्धतीने प्रेक्षकाचे लक्ष वेधून आपण चित्र किंवा लिखित स्वरूपात संदेश मांडू शकतो.

198.  आपल्या सभोवती असणारे दृ



म्हणून एखाद्या माहितीची रचना, मांडणी, पुस्तिका किंवा एखादी जाहिरात म्हणजे कथा सांगण्याचीच कसरत होय. ती मनोरंजक आणि कुतूहल निर्माण करणाऱ्या पद्धतीने सांगितली गेली पाहिजे. वाचकाला तिने गुंतवून ठेवले पाहिजे. क्रमाक्रमाने पुढे नेले पाहिजे आणि मनात असलेल्या घटकांमधून त्याचा प्रवास घडावयास हवा. माहितीने पाहणाऱ्याला मनामध्ये नाहीसे होण्याची भीती निर्माण करून त्याला व्यापून टाकता कामा नये.

200.  आपल्या सभोवती असणारे दृ



माहिती स्थिर असू शकते. त्याचप्रमाणे संवाद घडविणारी असू शकते. संवाद करणाऱ्या माहितीची तुलना मंचावरील प्रयोगाशी होऊ शकते. जेथे विषयवस्तूंचा दृष्यक्रम बदलत राहतो. जेव्हंा एक विषयवस्तू क्रमांक १ चे पात्र बनण्यास पुढे सरकते तेव्हा दुसरी पात्रे क्रमांक २, ३ किंवा ४ बनण्यासाठी त्यांच्यामध्ये पुन्हा नवीन रचना करतात. आपण त्यास अस्थिर असलेली दृष्यव्यवस्था असे संबोधू शकतो: नृत्यक्रमाच्या जाणीवपूर्वक योजनेद्वारा नियंत्रित आणि कुशल दिग्दर्शकांच्या दिग्दर्शनाखाली नर्तकांनी चांगली कृतीत उतरविलेली अशी. एक रेषाकृती रचनाकार दिलेल्या जागे (पृष्ठा) मधील घटकांचा दिग्दर्शक असतो.

202.  आपल्या सभोवती असणारे दृ



आतापर्यंत आपला कृष्णधवल चित्रांशी संबंध होता. उजवीकडच्या चित्रामध्ये सफेद रंगाचा सदरा घातलेली व्यक्ती आपले लक्ष आकर्षि त करते. पुढील पृष्ठावर आपण पाहू की जर रंगाचा अंतर्भाव केला तर काय घडते. रंग दृष्यव्यवस्थेवर अधिराज्य गाजवू शकतो का?

204.  आपल्या सभोवती असणारे दृ



रंग हे रचनेमधील बदल घडवून आणणारे फारच प्रबळ माध्यम आहे. रंगाचा योग्य रीतीने उपयोग केला तर तो पाहणाऱ्याचे लक्ष आकर्षि त करू शकतो त्याचप्रमाणे विचलित करू शकतो. मूळ घटकांचा उपयोग जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने करावयाचा असतो.

206.  आपल्या सभोवती असणारे दृ



विषयवस्तू घटक म्हणून असणाऱ्या या नियुक्त कामामध्ये त्या व्यक्तीचा चेहरा हा लक्ष आकर्षि त करण्यासाठी किंवा दृष्यव्यवस्थेवर आधिपत्य गाजविण्यासाठी त्याची ओळख बनतो. त्याचप्रमाणे एखाद्या जाहिरातीमध्ये किंवा लिखित मसुद्याच्या मांडणीमध्ये त्याचा अर्थ आणि फोटो या सादर केलेल्या माहितीच्या ओळखी असतात. पाहणारा याच्या संदेशाचे आकलन होण्यासाठी या घटकांमध्ये इकडू न तिकडे असा फिरत राहतो. या घटकांची योजनापूर्वक मांडणी हा इकडू न तिकडे फिरण्याचे स्वरूप ठरवितो. अशाप्रकारे के ली गे ले ल ी योजना म्हणजे च रचना!

208.  आपल्या सभोवती असणारे दृ



जर तुम्हाला चेहरा दिसत नसेल तर आपण म्हणू शकतो की ही माहिती स्पष्ट नाही. कोणत्याही घटकाला महत्त्व दिले नाही (प्रकाश टाकला नाही). उच्च-नीचतेच्या अभावामुळे सगळी माहिती ही एकाच पातळीवर आहे.

210.  आपल्या सभोवती असणारे दृ



वास्तविक जीवनामध्ये आपणास दृष्यव्यवस्थेची उदाहरणे आढळतात. चित्रातील मुलगा लोकांच्या गर्दीमध्ये लक्ष आकर्षि त करण्यास स्वतःस कृत्रिम रीतीने सजवितो. त्याचप्रमाणे एक रेषाकृती रचनाकार त्याच गर्दीमधील दुसया घटकांवर तुमचे लक्ष पडण्यापूर्वी (पहिले लक्ष वेधण्याकरिता) रचनेमध्ये एकच घटकावर प्रकाश टाकतो.

212.  आपल्या सभोवती असणारे दृ



बऱ्याचदा लोक स्वतःस इतके सजवितात की तुम्हाला त्यांच्याकडे लक्ष देणे भाग पडते. बाजूच्या चित्रामधील व्यक्तीने स्वतःस तशाच रीतीने सजविले नाही तर ते जगणे मुश्कील होईल. अशा प्रकारच्या उच्च दृष्यव्यवस्थेने (एकच घटकाला सजविणे) तो हे निश्चित करतो की त्याला त्याची भिक्षा मिळे ल तसेच तो गर्दीमध्ये उठू नही दिसेल. लोक त्याला चुकवण्याचा कमी संभव आहे. बेसावध असणाऱ्यांचे लक्ष पटकन वेधण्याची ही धडपड.

214.  आपल्या सभोवती असणारे दृ



जेव्हा घटकांची संख्या वाढते तेव्हा दृष्यव्यवस्था फारच दोषपूर्ण होते. दृष्यव्यवस्थेमध्ये जो घटक पहिला आहे त्याने आपल्या प्रभावाने स्वतःस वेगळे करून लक्ष दुसऱ्यापासून खेचून घेण्याबरोबरच दुसऱ्या घटकांशी संवाद पण मांडला पाहिजे.

216.  आपल्या सभोवती असणारे दृ



म्हणून दृष्यव्यवस्थेमध्ये जो घटक पहिला आहे त्याने दृष्यप्रवाह निर्माण करण्याकरिता आणि पाहणाऱ्यास माहिती माध्यमातून पुढे नेण्याकरिता दुसऱ्याशी मैत्री केली पाहिजे एका घटकाने इतर घटकांशी संबंध प्रस्थापित केले पाहिजेत.

218.  आपल्या सभोवती असणारे दृ



जेव्हा घटकांची संख्या वाढते तेव्हा दृष्यव्यवस्था फारच महत्वपूर्ण होते कारण प्रत्येकजण लक्ष्य वेधण्यासाठी मागणी करतो. गोंधळाचा जन्म हा रचनाकाराची मर्यादित जागेमध्ये वाढणाऱ्या घटक हाताळण्यातील असमर्थता याचा परिणाम आहे.

220.  आपल्या सभोवती असणारे दृ



आपण अशा पर्यायांची रचना करणे गरजेचे आहे जे परिपूर्ण आहेत, त्यांनी पाहणाऱ्याचे मन वळविले पाहिजे आणि रचनाकाराने आवश्यक ती दृष्यक्रम निर्माण केला पाहिजे. चां ग ली मां ड णी म्हणजे काय? • आत समाविष्ट असलेल्या गोष्टी समजून घेणे आणि काळजीपूर्वक योजना आखणे. • जाणीवपूर्वक मांडणीच्या माध्यमातून ज्यांना हे दाखवावयाचे आहे त्यांच्यासाठी आवश्यक असलेल्या दृष्यव्यवस्थेचा आराखडा तयार करणे.

दृष्यसंवाद म्हणजे काय? कोणत्याही प्रकारचे दृष्यरूपातील परस्पर दळणवळण, मग ते मन वळविणारे किंवा माहिती देणारे असो, छापिल जाहिरात होर्डिं ग ते ग्रीटिंग कार्डपर्यंत आकार आणि कार्याचे मूर्त स्वरूप म्हणून पाहिले जावे : सौंदर्य आणि उपयोगिता यांची एकता. कला आणि टायपोग्राफी जिवंत वस्तू म्हणून पाहिल्या जाव्यात. प्रत्येक घटक पूर्णतः संबंधित, पूर्ण घटकाशी सुसंगत आणि कल्पना आमलात आणण्यास आवश्यक. टायपोग्राफी म्हणजे काय? टायपोग्राफी म्हणजे एका स्पष्ट हेतूस वाहून घेतलेले असते जो ‘अक्षरांच्या माध्यमातून अर्थ पोहोचविणे’ हा आहे. कोणत्याही प्रकारच्या वादविवादाने किंवा दुसरा कसलाही विचार करून तीला या कर्तव्यातून मुक्त केले जाऊ शकत नाही. मुद्रित केलेले काही जे वाचले जाऊ शकत नाही त्याला काहीही अर्थ नाही. एमिल रुडर (१९६७)

222.  आपल्या सभोवती असणारे दृ

एखाद्या जादूगाराप्रमाणे रचनाकार हा घटकांना दिलेल्या जागेत हाताळू न आपले कौशल्य प्रदर्शि त करतो. या जगाने जाहिराती, नियतकालिके, छापील फॉर्म, पुस्तके, पार्सले, औद्योगिक उत्पादने किंवा दूरदर्शन जाहिरातीचे बोर्ड असे कोणतेही रूप घेतलेले असले, निकष सारखेच आहेत. - पॅ ा ल रँ ड

त्या रचनेच्या कामाची अशा रीतीने अमंलबजावणी करणे की कथा पूर्ण करण्यासाठी सर्व घटकांनी एक दुसऱ्याशी संवाद करावा आणि सांगण्याची गरज न पडता संदेश पोहोचवावा. अशी रचना निर्माण करणे की जी स्वतःच उघड आणि स्पष्टीकरणात्मक आहे.



रचना करणे म्हणजे आखलेल्या माध्यमांमध्ये तळापासून माथ्यापर्यंत किंवा माथ्यापासून तळापर्यंत केलेली व्यवस्था.

224.  आपल्या सभोवती असणारे दृ



226.  आपल्या सभोवती असणारे दृ


ऋणनिर्देश: हा अभ्यासक्रम चालविण्यासाठी निरनिराळ्या संस्थांनी मला दिलेल्या संधीबद्दल आणि आधारबद्दल मी त्यांचे मन:पूर्वक आभार मानतो. १. डिपार्टमेंट ऑफ डिझाईन, आय. आय. टी. गुवाहाटी, आसाम, भारत. २. सिंबायोसिस इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, विमाननगर, पुण,े भारत. ३ माएर्स इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, पुण,े भारत. ४. इं डस्ट्रीयल डिझाईन सेंटर, आय. आय. टी. बॉम्बे, पवई, मुंबई, भारत. ५. सर जे. जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्टस्,‌ डी. एन्. रोड फोर्ट, मुंबई, भारत. माझ्या सर्व विद्यार्थ्यांचे आभार: आशिष सिंघल किर्ति मीरा गोयल सिद्धार्थ गुप्ता जैनी शिवा राम कृष्ण क्षितिज गुप्ता सत्येंद्र जैनवाल सत्यजित दास विनय मोहं ती तनुज शाह अभिषेक ढाल अमित भारती मंशू अनेजा दिनेश नागर दिव्या गुप्ता

कार्तिकेय शांडिल्य निशांत मुंगळी वेदांत मेहता लक्ष्यजित गोगोई मोनिल खरे प्रशांत दीक्षित विक्रम बात्रा शैझ कुन्हीमोहं मद सिद्धार्थ मोहन सुमित नायर सौरभ श्रीवास्तव सौमित्र भट्ट नवेंदू त्रिपाठी क्षितिज आनंद सौरभ मल्होत्रा शरद चौहान सैबल दत्त अमृता पोकर्ण अजिंक्य चिकटे पंखुरी जैन दिप्तो डे फोटोग्राफ्स विनय मोरे स्थळ: राजस्थान (पुष्कर मेळा) पुस्तके बेसिक टायपोग्राफी: डिझाईन विथ लेटर्स रुडी रॉग, व्हॅ न नोस्ट्रॅंड रेनॉल्ड, न्यूयॉर्क , १९८९ आय. एस्. बी. एन्. ०४४२-२३९१३-० वुल्फगँग वेइंगार्ट, टायपोग्राफी बॅसेल, लार्स मुलूर, १९८९ आय. एस्. बी. एन्. ३-९०७०४४-८६-x

मुद्रण: श्री. चिलप, छापखाना, आय. आय. टी. बॉम्बे श्री. सुंदर ए टू झेड प्रिंटर्स, अंधेरी, मुंबई व्यवस्था / क्रम यावरील चर्चा: प्राध्यापक कीर्ति त्रिवेदी प्राध्यापक उदय आठवणकर आय. डी. सी., आय. आय. टी. बॉम्बे स्पाँसरशिप: प्राध्यापक मोहरीर, कोऑर्डीनेटर, सी. डी. पी., आय. आय. टी. बॉम्बे , त्यांच्या अंस्थेसाठी हे पुस्तक शक्य होण्यासाठी सगळे अडथळे नाहीसे करून काम करण्यास मला स्वातंत्र्य दिल्याबद्दल. कर्मचारी सी. डी. पी. आय. आय. टी. बॉम्बे श्री. सुधीर यांचे आभार. कर्मचारी आय. डी. सी., आय. आय. टी. बॉम्बे श्री. प्रशांत श्री. देसाई मराठी अनुवाद श्री. अनंत सावंत.



Turn static files into dynamic content formats.

Create a flipbook
Issuu converts static files into: digital portfolios, online yearbooks, online catalogs, digital photo albums and more. Sign up and create your flipbook.