okLrq Eg.krs rFkkLrq’ पार्ल्यात आणि दादरमध्ये शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेतलेल्या नं दा जोशी आज न्यू जर्सीमध्ये एक बांधकाम उद्योगाच्या क्षेत्रात यशस्वीपणे पाय रोवून उभ्या आहेत. त्यांच्या यशाची ही कहाणी आपल्या सगळ्या सख्यांना अतिशय प्रेरक ठरेल. “अगं , तू पार्ल्याची नं दा नं ? चार्टर्ड अकांउंटिगं करत होतीस ना? तुझा भाऊ माझ्या वर्गात होता व्ही. जे. टी. आय. मध्ये....!” “हाय, नं दा तू ओळखलं स का मला? सीप्झ नं तर आत्ता दिसत्येस.” “अगं वॉलस्ट्रीटवरची नोकरी सोडलीस तेव्हापासून आपल्या ट्रेनमधल्या गप्पा सं पल्या.” मला एकदम एकाच दिवशी कितीतरी जुनी मित्र-मं डळी, http://yasakhyannoya.blogspot.in/
2
ओळखीचे लोक भेटले होते. प्रसं ग होता “न्यू जर्सी”च्या “मराठी विश्व”चा गणेशोत्सव. २० वर्षे न्यू जर्सीत राहून सुद्धा मराठी ग्रुपमध्ये पहिल्यांदाच गेले होते, शाळा कॉलेजमध्ये के वळ मराठी मं डळीत मिसळणारी पार्ला आणि दादरची मी...! परंतु नवर्याला मराठी समजत नसल्यामुळे माझा वावर आता ‘मेन्सा’, ‘मेक अ विश फ़ाऊं डेशन’ अशा सं स्थांत नाहीतर सायलस्वारांच्या या गटात असे. त्या दिवशी आम्ही आमच्या कं पनीचा बूथ ठे वला होता. SIMPSON!! WAASTU!! BUILDERS LLC
‘आम्ही’ म्हणजे मी आणि रिचर्ड सिम्पसन. नुकतेच आमचे लग्न झाले होते आणि मी त्याच्या व्यवसायात तन-मन-धन अर्पून पडले होते. रिचचे सिम्प्सन कु टुंब गेली २०० वर्षे बांधकाम व्यवसाय करतेय. स्कॉटलं डमधून येथे स्थायिक होऊन ‘न्यूयॉर्क ’ व ’न्यू 3
http://yasakhyannoya.blogspot.in/
जर्सी’ यांना जोडणार्या सगळ्या बोगद्यांची वगैरे (मरिन कन्स्ट्रक्शनशी सं बं धित) कामे त्यांनी के ली आहेत. रिचने स्वत: अगदी सुरुवातीलाच घरे आणि वसाहतीच्या कामाची सुरुवात के ली. माझा स्वत:चा व्यवसाय करण्याचा अनुभव शून्य होता. प्रतिष्ठित कं पन्यांमध्ये नोकर् या करायचीच सवय. बांधकाम या प्रकाराबद्दल आदरयुक्त भीती होती. रिअल इस्टेटचा अनुभव म्हणजे मुं बईमध्ये आई-वडिलांनी घेतलेले फ़्लॅ ट्स आणि त्याचबरोबर भेटलेले तीन अत्यं त त्रासदायक बिल्डर्स आणि न्यू जर्सीत घेतलेले एक देखणे घर. (तो मात्र अनुभव चांगला होता.) या पार्श्वभूमीवर मी एका बिल्डरशी लग्न करणे याला एकमेव कारण म्हणजे रिचर्ड हा एक साक्षात् गुणी आणि गोड मनुष्य आहे. आमचे लग्न झाले तेव्हा मला बांधकामातील http://yasakhyannoya.blogspot.in/
4
काहीच कळत नव्हते. हळू हळू लक्ष घालायला लागले. त्यानेही अगदी साध्या-साध्या प्रश्नांची उत्तरे माझी चेष्टा न करता दिल्याने मीही आणखीन इंटरेस्ट दाखवायला सुरुवात के ली. आम्हा दोघांचेही हे दसु रे लग्नं . दोघेही दोन घरात व्यवस्थित रहात होतो. त्याने त्याच्या माणसांना बोलावून माझे घर काही बदल करुन परिपूर्ण आणि नव्यासारखे के ले. एका महिन्यात घराचा इंच नि इंच बदलून सुं दर करुन टाकला. तीच खरी माझ्या शिक्षणाची सुरुवात म्हणायला हवी. माझे सुरेख घर पाहून, माझ्या काही मैत्रिणी म्हणाल्या की आमच्यासाठी पण हे नूतनीकरणाचे काम कर नं ! मी एका वर्षात २० घरांवर काम के ले. खूप वेळ खर्च करुन, स्वत: शिकत, इतरांनाही शिकवत, मी खूप वेगवेगळ्या प्रकारची कामे करवून घेतली. कपाटे कशी निवडायची, स्वयं पाकघराची रचना कशी हवी, एक्झॉस्ट फ़ॅ न कु ठे हवा, घरगुती वापराची उपकरणे कशी 5
http://yasakhyannoya.blogspot.in/
निवडायची, ग्रॅ नाइट स्लॅ ब्स कशा घ्यायच्या, फ़रशा, दर्शनी दरवाजा, भितं ी, रंग, छप्पर, एक ना दोन या सगळ्यांची माहिती व्हायला लागली. या पुढची पायरी म्हणजे सं पूर्ण नवे घर बांधणे! रिचने यापूर्वी उत्तर एडिसन या भागात घरे बांधली नव्हती. परंतु या भागात नवीन घरांना खूपच मागणी आहे. मी रिचला सुचविले की आपण इथे एक घर बांधनू पाहू. एखाद्या नवीन भागात घरे बांधायला सुरुवात करायची म्हणजे पूर्ण भागाचा अभ्यास करावा लागतो. रिच तर त्यात पटाईत! मीही माझ्या डाटा वेअरहाउसिगं च्या नैपुण्याचा उपयोग के ला. आम्ही दोघेही या निष्कर्षाप्रत आलो की इथे घर बांधनू पहायला हरकत नाही. ते सहज विकले जाईल. त्याचबरोबर आणखीही एक गोष्ट सहज सुचली. इथे भारतीय जास्त प्रमाणात आहेत तर आपण http://yasakhyannoya.blogspot.in/
6
वास्तुशास्त्रातील तत्त्वांना अनुसरुन एखादे घर बांधावे का? माझ्या या विचारास अनुमोदन द्यायचे तर रिचला वास्तुशास्त्र हा विषयच पूर्णत: नवीन होता. मात्र या सं कल्पना त्याने माझ्या सहाय्याने समजून घेतल्या. एका वास्तुशिल्पी (आर्किटेक्ट) सोबत बरोबर बसून प्लॅ न तयार के ला आणि एक छानसा प्लॉट शोधून काढला. माझे मामा स्वत: ज्योतिषी आहेत. त्यांच्याशी सल्लामसलत करुन भूमी पूजेसाठी मुहूर्त देखील शोधला. ८ डिसेंबरच्या भयानक थं डीत सूर्योदयाच्या वेळी रिचने भूमिपूजन के ले आणि पहिली कु दळ मारली. माझी थट्टा करीत; के वळ माझ्या आग्रहाखातर, माझे मन राखण्यासाठी त्याने हे सारे के ले. आम्ही ‘सिम्प्सन वास्तु बिल्डर्स एल. एल. सी’ ही कं पनी स्थापन के ली आणि पूर्वीच्याच व्यवसायाचे उपांग (एक्सटेंशन) म्हणून ही कं पनी चालवायला लागलो. 7
http://yasakhyannoya.blogspot.in/
बांधकामाच्या ठिकाणी आमच्या कं पनीचे बोर्ड पाहून लोक आम्हाला दूरध्वनीवरुन सं पर्क करायला लागले. या व्यवसायाला पूरक आणि आवश्यक म्हणून मी रिअल इस्टेटचे प्रमाणपत्र (लायसन्स) देखील घेतले. माझा हा व्यवसाय चांगला चालायला लागला. माझे रिअल इस्टेटचे बोर्ड पाहून लोक फ़ोनवर चौकशी करु लागले, “सिम्प्सन वास्तु बिल्डर्स” ची नं दा ती तूच का? तेव्हा मला अतिशय आनं द झाला. लोक आता मला ओळखू लागले होते. हळू हळू उत्साह देखील वाढायला लागला. मग मी “किती घरे विकायची” याचे उद्दिष्ट ठरवले, फ़क्त माझ्यापुरते! माझा मूळ व्यवसाय ‘नियोजन मार्गदर्शक’ म्हणजे “मॅ नेजमेंट कन्सल्टंटचा” तो मी अजून थांबवला नव्हता. पर्यायाने मला भरपूर प्रवास करावा लागे. माझा बराचसा वेळ माझ्या कन्सल्टंसीच्या कामातच जाई. शनिवार-रविवार, http://yasakhyannoya.blogspot.in/
8
आणि दररोजच्या सं ध्याकाळच्या वेळा या मला रिच आणि माझ्या सं युक्त व्यवसायासाठी राखून ठे वाव्या लागत. पूर्वी रिचला हिशेबनीस (अकाउं टंट), सचिव (सेक्रेटरी) अशी कामे करण्यासाठी मदत उपलब्ध होती. पण हे सर्व शिकू न घेणे, समजावून घेणे आणि प्रगतीचा, नफ़्याचा अंदाज घेणे हे माझे उद्दिष्ट. त्यामुळे मी सगळ्या कामात उडी घेतली आणि रिचनेही माझ्यावर विश्वास ठे वला. मला सर्व कामे माझ्या पद्धतीने करायला वावही दिला. मग मी त्याच्या कं त्राटदारांशी बोलायला सुरुवात के ली. हे त्याच्याबरोबर वर्षानुवर्षे काम के लेले त्याचे मित्र! एका नवख्या भारतीय मुलीचे फ़ोन येतात हे पाहून ते जरा बुचकळ्यात पडले. काहीनं ी रिचला जाबही विचारले! पण रिचने त्यांना उत्तर दिले की, “हं गावात एक नवी साहेबीण आली आहे असं समजा!” या लोकांना माझ्याशी बोलणी करायला सुरुवातीला 9
http://yasakhyannoya.blogspot.in/
फ़ार प्रयास पडले. पण आता तेही माझ्याशी बोलणीच काय पण गप्पा मारायला देखील सरावले आहेत. रिच पूर्वी कधीच जाहिरात आणि विक्रीच्या क्षेत्रात पडत नसे. तो आपला घरे बांधायचा आणि मग रिअल इस्टेट एजं ट बाकीची जबाबदारी घेऊन घरे विकत असे. आता आम्ही ती प्रथा बदलण्याच्या मागे लागलो, कारण आम्ही मागणीनुसार (कस्टमाइज्ड) घरबांधणीच्या क्षेत्रात उतरलो होतो. या प्रकारच्या व्यवसायात घर बांधण्याचा विचार चालू असतानाच ग्राहकाबरोबर बोलणी करावी लागतात, चर्चा करावी लागते. मग मी जाहिरात, वितरण, ग्राहक सेवा आणि जनसं पर्क (पब्लिक रिलेशन्स) ही सगळी जबाबदारी स्वीकारली. सध्याच्या आर्थिक परिस्थितीत आमचे ग्राहक आहेत भारतीय आणि आशियाई ...! काम करणारी भारतीय स्त्री एका गोर्या अमेरिकन माणसाबरोबर काम करते हे त्यांना http://yasakhyannoya.blogspot.in/
10
बोलणी करण्यासाठी एकदम सोपे आणि सोयीचे वाटू लागले. त्यांचे फ़ें ग शुई, वास्तुशास्त्र यासं दर्भातले सगळे विचार माझ्याशी बोलताना त्यांना बिलकू ल सं कोच वाटत नाही. “आपण काय बोलतोय ते हिला समजतं य.” हा दिलासा त्यांना देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करते. ग्राहकांशी माझा सं वाद प्रथम फ़ोनने सुरु होतो. त्यांनी एकतर आमची जाहिरात पाहिलेली असते किंवा त्यांच्या कोणा मित्रासाठी आम्ही बांधलेले एखादे “खास घर” त्यांच्या पहाण्यात आलेले असते. मग तसा सं दर्भ देतच सं भाषण सुरु होते. मग मी त्या जोडप्याला प्रत्यक्ष भेटते आणि त्यांच्या घराबद्दलच्या सं कल्पना, घरबांधणीसाठी त्यांची असलेली आर्थिक तयारी याचा प्रथम अंदाज घेते. घर बांधण्यातला हा महत्त्वाचा टप्पा. हे जर दोन्ही बाजूं नी स्पष्ट झाले नाही तर मग नं तर खोट्या स्वप्नांच्या मागे धावाधाव करण्यात आमचा आणि ग्राहकांचा 11
http://yasakhyannoya.blogspot.in/
वेळ, पैसा वाया जातो असा आमचा अनुभव आहे. अर्थात हे म्हणणे जितके सोपे आहे तितके करणे सोपे नाही. कारण त्या जोडप्याला ‘आपल्याला नक्की काय हवे आहे’ तेच माहिती नसते. मग त्यांना वेगवेगळ्या नमुन्यांची घरे दाखवावी लागतात. त्या भागातल्या घरांची माहिती त्यासाठी असावी लागते. मग मी त्यांना गाडीत घालून सर्व भाग फ़िरवते. घरं, रस्ते आणि मुख्य म्हणजे ज्याला ‘लोके शन, लोके शन, लोके शन’ असं आमच्या व्यवसायात म्हणतात ते...घर कोणत्या स्थानावर बांधायचं , तो प्लॉट कु ठे , कसा हवा ते आम्ही एकत्रितपणे ठरवितो. कारण घराबाबतची कोणतीही गोष्ट ‘मागणी’नुसार देता येते. पण घराचे स्थान मात्र ‘स्वयं भू’ असते. त्यात कोणताही बदल नं तर करता येत नाही! मग घराचा आराखडा बनवण्याची पायरी! त्यात नुसता घराचा नकाशा नसतो तर बाहेरची अंगणे, दारे, खिडक्या, अशा पुष्कळ गोष्टींचे नियोजन आधी करावे http://yasakhyannoya.blogspot.in/
12
लागते. उदा. एखाद्या खोलीला उजेड किती, जिने कु ठे इ. अनेक गोष्टींवर खिडकी की दरवाजा...खिडकी के वढी मोठी, खिडकीमुळे आतबाहेर जाण्यार् या थं डीचा विचार करुन खिडकीसाठी लागणारी काच ठरते. तेव्हा ही आराखडा बनवण्याची पायरी म्हणजे एक वर्तुळाकार जिनाच म्हणावा लागेल. पुन: पुन्हा योजना पारखून पहाव्या लागतात, बदलाव्या लागतात. एखादी गोष्ट निवडण्याचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम ग्राहकाला नीट समजावून सांगावे लागतात. म्हणजे मागच्या खिडकीचे उदाहरण द्यायचे तर अमुक प्रकारच्या डिझाईनची खिडकी लावून खर्चात फ़रक पडत नसला तरी उन्हाच्या दिशेमळ ु े खिडकी खराब होऊन नं तर खर्च येईल किंवा विजेचे, हीटिगं चे बिल वाढेल इ. गोष्टी ग्राहकाच्या नजरेला आणून द्याव्या लागतात. यावेळी तज्ञ म्हणून रिचर्डही ग्राहकांशी बोलतो. बांधणीचे त्या शहराचे नियम किंवा काऊं टीचे 13
http://yasakhyannoya.blogspot.in/
नियम, घर तपासणीत काय पाहिले जाते, कोणकोणत्या मं जुरीची प्रमाणपत्रे घ्यावी लागतात, अशा अनेक किचकट बाबी तो नीट समजावून सांगतो. बिल्डर या नात्याने तो घर बांधण्याच्या सर्व पायर्या, कशाला किती वेळ लागेल, ह्प्ते कसे भरायचे, कर्जासाठी बॅं के कडे के व्हा जावे लागते हे सर्व समजावून सांगतो. हे सर्व झाले की मग कागदपत्रे वकिलाकडे जातात आणि बांधकामाच्या या प्रकल्पाला खरी सुरुवात होते. शहराकडू न परवानगी घेणे, टेंडरे किंवा कोटेशन घेणे यासाठी मी रिचर्डला मदत करते. एका घरासाठी शं भरच्या वर कोटेशन्स येतात. आम्हाला पुरवठा करणारे नेहमीचे असले तरीही मी टेंडरे मागवते आणि त्यातील सर्वात चांगली किंमत देणार्याला कं त्राट दिले जाते. नं तर या प्रकल्पाचे आमचे नियोजन सुरु होते. ही पायरी सर्वात महत्त्वाची कारण घर बांधताना कित्येक गोष्टी एकमेकावर अवलं बून असतात. जसजसे http://yasakhyannoya.blogspot.in/
14
बांधकाम पुढे जाते, तसतसे हे परस्परावलं बन जास्त गुंतागुंतीचे आणि किचकट होते. अर्थातच रिचर्डचा अनुभव यावेळी फ़ार उपयुक्त ठरतो. घर बांधनू पूर्ण होत जाते तसा तो अनुभव फ़ार सुखद असतो. आनं दाचा असतो, घर पूर्ण होतानाची प्रत्येक पायरी पहाताना मला लहान मुलासारखा आनं द होतो. मग मी त्या घराचे रोज फ़ोटो घेते आणि त्याचा सं ग्रह आमच्यासाठीच नव्हे तर या वास्तूच्या मालकांसाठीही एक आनं दाचा आणि आठवणीचा ठे वा होतो. घराची ही प्रगती पहाताना, त्यावर विचार करताना माझ्या मनात एक शब्द पुन: पुन: रुं जी घालतो. तो म्हणजे ‘विश्वास’...! आमच्या व्यवसायाची भरभराट होते आहे ती आमच्यातील आणि आमच्या ग्राहकांतील परस्पर विश्वासामुळे! आमच्या ग्राहकांचा सं तोष हाच आमचा आनं द ...! हे सांगताना मला अभिमान वाटतो. आमचा व्यवसाय वाढविण्याच्या 15
http://yasakhyannoya.blogspot.in/
दृष्टीने आमच्या अनेक योजना आहेत. जास्त मागणी असलेल्या क्षेत्रात आम्हाला जायचे आहे. एका रिअल इस्टेट कं पनीला त्यांचा बांधकाम विभाग सुरु करायचा आहे. त्यांनी आम्हाला विचारणा के ली. याचा मला नुसता आनं द झाला नाही तर मला आपण के लेल्या कष्टांचे चीज झाले असे वाटले आणि गर्वाने ऊर भरुन आला. अशा या घटनांमळ ु े या व्यवसायात आणखी उत्साहाने झेप घ्यावी अशी प्रेरणा वाटते. लोक मला विचारतात, “नं दा तू मूळची चार्टर्ड अकाउं टंट. भारतातून अमेरिके त आलीस आणि अर्थकारण करणार्या क्षेत्रात सॉफ़्टवेअरवर काम करु लागलीस. मग तू वॉल स्ट्रीटवर काम करु लागलीस आणि आता बांधकाम व्यवसायात पडलीस. या सगळ्यांचा एकमेकांशी काय सं बं ध?” याचा मी विचार करते तेव्हा मला वाटतं की शिक्षण आणि पदवीचाच वापर आपल्या आयुष्यात http://yasakhyannoya.blogspot.in/
16
करायला पाहिजे असे नाही. शिक्षण हे जगण्यासाठी के लेले साधन आहे. ते मनुष्याला यशस्वी जगायला तयार करते. शिक्षणातल्या अवघड विषयांचा अभ्यास करताना माणसाला कष्ट करण्याची, समर्पित बुद्धीने काम करण्याची, तपशीलांचा बारकाईने विचार करण्याची सवय लागते. शिक्षणामुळे जगण्यातली आव्हाने पेलायला ताकद मिळते. एका क्षेत्रातील कौशल्ये दसु र् या क्षेत्रात सहजतेने वापरण्यासाठी लागणारी अनुभवाची शिदोरी शिक्षणामुळे सहज मिळते. दसु रा आणि थोड्या वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करायचा तर माझा पत्रिके वर आणि ग्रहांच्या परिणामावर विश्वास आहे. एका ज्योतिषाने मला सांगितले होते की मी बांधकामाच्या क्षेत्रात चमकणार आहे. त्यामुळे त्याला वाटले होते की मी बहुधा सिव्हिल इंजिनिअरिंगच्या किंवा आर्किटेक्चरच्या क्षेत्रातली 17
http://yasakhyannoya.blogspot.in/
पदवी घेईन. मी चार्टर्ड अकाउं टंटच्या कोर्सला गेले तेव्हा त्याला आश्चर्य वाटले. आता विचार करताना वाटते की रिअल इस्टेट आणि बांधकाम ही माझी ललाटरेषा असावी. नं तर रिचर्डशी भेट आणि त्याच्याशी विवाह यामुळे ती स्पष्ट झाली असावी. थोडक्यात माझं रिअल इस्टेट आणि बांधकाम क्षेत्र म्हणजे माझ्या दसु र्या लग्नाची कहाणी!...नं दा जोशी सिम्पसन, न्यू जर्सी.
http://www.waastu.com/ पूर्वप्रसिद्धी- इ-ग्रं थाली.अमेरिका दिवाळी विशेषांक २०१२ http://yasakhyannoya.blogspot.in/
18