ठं डा ठं डा कू ल कू ल आणि ऋतुराज आज वनि आला
;k l[;kauks ;k अंक ३८ वा
वसं त ऋतू विशेषांक सं पादिका: विशाखा समीर मशानकर.
सहसं पादिका: श्रेया महाजन, पल्लवी कु लकर्णी, वसुधा कु लकर्णी.
laikfndsP;k ys[k.khrwu सख्यांनो, सं पादिका म्हणून माझा फ़ोटो पाहून चक्रावून गेला असाल. या अंकापुरते विशाखाच्या ऐवजी हे काम मी करते आहे. मार्च महिन्याच्या अंकात आपण ‘सुं दर मी’ ही फ़ोटोस्पर्धा आयोजित के ली होती. त्या स्पर्धेची विजेती सखी अनिता वाघ हिचे अभिनं दन आणि सहभागी सख्यांचे आभार. सख्यांनो, सध्या निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे. वृत्तपत्र, सोशल साईटस, दूरदर्शन कु ठे ही पहाल तिथे राजकीय पक्ष आपली कारकीर्द कशी सोज्वळ आहे, आणि आपल्या पक्षाची सोबत के लीत तर भविष्य कसं उज्ज्वल होईल हे पटवून सांगण्यात गढू न गेली आहेत. अशा वेळी अशा एखाद्या गीताच्या ओळी कानावरुन गेल्या तरी आल्हाददायक वाटतात. ऋतुराज आज वनि आला, ऋतुराज आज वनि आला ! नव सुमनांचा, नव कलिकांचा बहर घेऊनी आला ! विद्याधर गोखल्यांचे शब्द देखील असे आहेत की चिरकाल मनात रुं जी घालत रहातील. याचा उत्तरार्ध तर खासच... कुं ज कुं ज अलि-पुंज गुंजने बघ झं कारित झाला ! सुरस रागिणी नव प्रणयाची कोकिळ छे डत आला ! नवथर सुं दर शीतल निर्झर त्यात रंगुनी गेला ! सं पादकीय
असं शुद्ध निसर्गवर्णन दिवसेंदिवस खूप कमी ऐकायला,वाचायला मिळतं . पुन्हा पुन्हा प्रश्न पडत रहातो एवढं वसं त ऋतूचं महत्त्व का की त्याला ‘ऋतुराज’ म्हणावं . मला असं वाटतं हा मीलनाचा, फ़ु लण्याचा ऋतू आहे, चैतन्याचा काळ आहे. आपल्या सार्या चित्तवृत्ती प्रफ़ु ल्लित व्हाव्या असा काळ आहे. निसर्ग देखील या काळात दोन्ही हातांनी अपरंपार देत असतो. चैत्रमास हा तर ‘मधुमास’ या नावाने ओळखला जातो. गुढीपाडवा, रामनवमी, हनुमानजयं ती सगळे उत्सव याच वेळी असतात. तसेच आंब्या फ़णसांचे दिवस देखील सुरु होतात. थं डीतली पानगळ सं पून फ़ु टलेली पालवी, बहर एवढंच महत्त्व आहे का या महिन्याचं ? अनेक पक्षी या सुमारास स्थलांतर करतात. भरपूर पाणी आणि अन्न या सुमारास उपलब्ध असते. पक्ष्यांसाठी प्रियाराधन करण्याचा, नवनिर्मिती करण्याचा हा कालखं ड आहे. या सगळ्यासोबत येत असतं ते परिवर्तन....होणारा बदल जो सहज स्वीकारतो आणि त्याच्याशी समायोजन साधतो ं या सोबतीने त्याचं जगणं सोपं होतं . सख्यांनो एकमेकीच् आपण स्वत:मधील आणि समाजातील बदलांना सामोरे जाऊया. तुमची सखी, श्रेया महाजन. वसं त ऋतू विशेषांक
varjax १. उन्हाळा एक आनं दोत्सव- श्रुती जोशी. २. झाली फ़ु ले कळ्यांची-श्रेया महाजन. ३.मृगजळ- श्रुती जोशी. ४. निसर्गातलं काव्य असं सरता सरता बहरते-तनुजा इनामदार. ५. ठं डा ठं डा कू ल कू ल- मनीषा कु लकर्णी ६. उन्हाळा सुट्ट्या आणि मुले- रजनी अरणकल्ले. ७. लिलीच लिली-श्रेया महाजन. ८. पाककृ ती- रजनी अरणकल्ले. ९. सुं दर मी फ़ोटो स्पर्धा निकाल. १०. कलाकृ ती- नेहा कु रमभट्टी.
अंतरंग
उन्हाळा: एक आनं दोत्सव चैत्र आला, गुढीपाडव्याने नव्या वर्षाचे आगमन झाले . थं डी सं पून उन्हाळ्याची म्हणजेच ग्रीष्म ऋतूची सुरवात होणार. मला आजही आठवते , शाळे त »माझा आवडता ऋतू» या विषयावर निबं ध लिहायला सांगायचे आणि मी नेहमी माझा आवडता ऋतू - उन्हाळा , यावर निबं ध लिहायचे . माझ्या मैत्रिणी मला चिडवायच्या, एवढा कोरडा शुष्क, घामाने भिजवणारा, अंगाची लाही लाही करणारा उन्हाळा कसा बरं आवडतो तुला? मी म्हणायचे तुम्ही त्याची नकारात्मक बाजूच बघता, त्याची दसु री बाजू पण बघा ना . उन्हाळ्यात वार्षिक परीक्षा सं पून शाळे ला सुट्ट्या लागलेल्या असतात . आपण कु ठे तरी गावी जाणार किंवा आपल्याकडे आपली भावं ड राहायला येणार, मजा मस्ती करायला मिळणार हा आनं द काही वेगळाच असतो. उन्हाळ्याच्या दिवसात सगळ्यांनी मिळू न गच्चीत झोपण्याची मजा, कधीच पावसाळ्यात किवा हिवाळ्यात येत नाही. अश्या या सुट्ट्यांमध्ये आपल्या आवडीचा एखादा छं द असेल तर तो पूर्ण करता येतो. गाणे, वाचन, चित्रकला, हस्तकला इ वसं त ऋतू विशेषांक
5
गोष्टींचे छं दवर्ग लावता येतात.आणि तेथनू च मुलांचे सुप्त गुण बाहेर येतात. मला आठवते मी उन्हाळ्यात दपु ारच्या वेळेत भरपूर वाचन करत बसायचे. एकदा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आई बाबांनी मला अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मं डळात १ महिन्यासाठी पाठवले होते. तिथे मी उत्तम पोहायला तर शिकलेच, सोबत शिस्तबद्धता, वक्तशीरपणा, आणि इतरांशी मिळू न मिसळू न कसे राहायचे हे पण शिकले. नवीन मैत्रिणीचं ी ओळख झाली. माझ्यासाठी तर तो अविस्मरणीय अनुभव होता.. उन्हाळ्याच्या या दिवसातच कै ऱ्या , आंबे याने बाजार भरतो , कोणी कोकणातून येणार असेल तर हापूस आंब्याच्या पेटीची ऑर्डर दिली जाते . मग लोणचे, आंब्याचा रस, पन्हे इ . गोष्टी घरी बनवण्याची रीघ लागते . रात्री सगळ्यांनी मिळू न आइसक्रीम खाण्याची मजाच काही निराळी .चाट मसाला टाकू न खाल्लेल्या गार गार टरबूजाच्या फोडीनं ी तर िं , कु ल्फी, सगळी तहान पळू न जाते. कै रीचे पन्हे, कोल्ड ड्रक्स आइसक्रीम या सगळ्या गोष्टींची चं गळ असते. आंब्याचा रस काढल्यानं तर उरलेल्या कोयी आणि साली पाण्यातून काढल्यावर बनलेली घरगुती फ्रू टी देखील सगळे मिटक्या मारत खातात. तसेच चैत्र गौरीच्या हळदी कुं कवासाठी के लेली कै रीची डाळ सगळ्यांना आवडते .इथे हैदराबादला 6
उन्हाळा: एक आनं दोत्सव
आल्यावर पानकम नावाचे सरबत मी शिकले. जे खास रामनवमीला इथले लोक करतात आणि रामाला ते आवडायचे असे हे लोक मानतात. त्याची कृ ती पण सोपी आहे. ती मला शेजारी राहण्याऱ्या माझ्या मैत्रिणीनी शिकवली. साहित्य : २ कप पाणी , १/२ कप किसलेला गुळ ,१/४ चमचा मिरपूड, १/२ चमचा किसलेल आलं आणि १/४ चमचा वेलची पुड . कृ ती: पाण्यात गुळ विरघळवा आणि उर्वरित साहित्त्य घाला . असे हे तहान शमवणारे आणि उन लागल्यास चटकन उपाय करणारे पानकम तयार. मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचा जन्म सुद्धा चैत्र शुद्ध नवमीचा, म्हणूनच गदिमांनी या ऋतूचे सुं दर वर्णन के ले आहे. ते म्हणतात , “चैत्र मास त्यात शुद्ध नवमी हि तिथी गं धयुक्त तरीही वात उष्ण हे किती दोन प्रहरी का ग शिरी सुर्य थांबला राम जन्मला ग सखे राम जन्मला ” असा हा सुं दर उन्हाळा थं डा थं डा कू ल कू ल आनं दोत्सव समजून साजरा करायचा, पण, तब्बेतीला जरा जपूनच बरं वसं त ऋतू विशेषांक
7
का. भरपूर पाणी पिणे, बाहेर जातांना डोक्याला स्कार्फ बांधनू जाणे, जेवणात कांद्याच्या फोडी घेणे ह्या सोप्या गोष्टी तर आपण करूच शकतो. कारण उन्हाळा जरी तापदायक वाटत असला तरी त्यानं तर आल्हाददायक पावसाच्या सरीचं े आगमन होतेच.
सौ. श्रुती के दार जोशी हैदराबाद
8
उन्हाळा: एक आनं दोत्सव
झाली फ़ु ले कळ्यांची परवा एका मैत्रिणीने लिहिलं होतं दसरा आणि गुढीपाडव्याला पुर्या तळायला लागलं की मला कसं सच व्हायला लागतं . म्हणजे यानं तर आपल्याला परीक्षेची तयारी करायचीय असं काहीसं वाटायला लागतं . किती अचूक पकडलं य ना....! आपल्याकडे दोन्ही सणांच्या आसपास परीक्षा असतातच. आणि युनिवर्सिटीच्या परीक्षा तर अगदी ऐन उन्हाळ्यात. मी पण अशाच मनोवृत्तीचं प्रॉडक्ट आहे. त्यामुळे एप्रिल- मे हा एक तर अभ्यासाचा, नाही तर फ़ावल्या वेळात काही तरी शिकण्याचा, थोडा पॉके टमनी कमावण्यासाठी ‘व्हेकेशन बॅ च’ घेण्याचा काळ असं माझं मत होतं . लहानपणी आई वडिलांबरोबर कधी बाहेरगावी गेली असेन एक दोन वेळा तेवढेच. पण कु ठे ही गेलं तरी लाईट- पाण्याचा त्रास पाहून आम्ही मुलांनी घरात डिक्लेअर के लं होतं ...सुटी इथेच काढायचीये आम्हाला. जास्तीत जास्तं पुणा नाहीतर नगर. यापलीकडे जायचं नाही. कालांतराने लग्न झालं नि वर्षा दोन वर्षात अहो युरोपात गेले दौर्यावर. दनु ियाभरचे नखरे करत मी त्याला जॉइन झाले चारेक महिन्यानी. या वर्षीची सुटी कल्पनेने पण छान वाटत होती. कॉलेजला सुटी लागायच्या आतच पळाले तिकडे. पहिला परदेशप्रवास, तोपण सार्स आणि कसले वसं त ऋतू विशेषांक
9
कसले तमाम साथीचे आजार असताना. फ़्लाइट मध्ये ‘हिट’ मारावं तसले औषधी फ़वारे मारले गेले. खरं तर प्रवास खूप सोपा होता, कु ठे फ़्लाईट बदलायचं नाही की काही नाही. एकदा घरच्यांनी इथे विमानात बसवलं की तिकडे नवरा घ्यायला येणार. पण माझा स्वभाव पडला वेंधळा. त्यात मला कु ठे ही बसल्या बसल्या झोप लागू शकते. मध्यरात्री फ़्लाइट. गेले कित्येक दिवस तयारीसाठी धावपळ चाललेली. खूप प्रयत्नांनी जागी राहिले. तिकडे गेल्यावर वाचायला दोन तीन मराठी पुस्तकं घेतली होती, त्यातलं एक विमानाची वाट पहाता पहाता सं पलं पण. आणि...पोहोचले बुवा एकदाची हिथ्रो विमानतळावर.
त्याकाळी हाताशी इतके सहज मोबाइल नसायचे. नवर्याचा पत्ता, फ़ोन नं घेतला होता. पण तो दिसल्यावर जाम बरं वाटलं . रस्त्यात मात्र काट्या कु ट्यांनी, काटक्यांनी 10
झाली फ़ु ले कळ्यांची
बनलेली, थिजलेली झाडं पाहिली आणि वाईट वाटलं . दिवसा पण प्रचं ड थं डी वाजत होती एप्रिल महिन्यात. हळू हळू कळलं ही बरी परिस्थिती आहे. स्नो ओसरलाय.
तिथल्या घरी तर पोहोचलो. ब्रह्मचार्याची मठी असते, तसे काहीसे घर होते. हरकत नाही. नवर्याच्या ताब्यात बेसन लाडू , बाकरवड्या आणि शेंगदाणा भजी ठे वल्यावर त्याचा चेहरा अगदी टवटवीत दिसायला लागला. ‘चहा करु’ असा विचार के ला तर कसचं काय? घरात दूध नाही. सं स्कृ तातल्या रागाची (अनुराग) जागा मराठीतल्या रागाने घेतली. बाहेर पडू न आणावं तर पुणेकरांच्या वरताण मं डळी. तिथे दक ु ानं दपु ारी चार वाजता बं द होत शनिवारी, रविवारी . इतर दिवशी पाच आणि फ़क्त गुरुवारी सं ध्याकाळी ७ वाजता. माझा विश्वास बसेना. सुदैवाने तो दिवस कसाबसा काढला आणि दसु र्या दिवशी टेस्को, एसडा असली दक ु ानं पालथी घातली. सगळी खरेदी चालत जाऊन करायची. प्रचं ड वजन वसं त ऋतू विशेषांक
11
झालं तर कॅ ब म्हणजे टॅ क्सी. दधु ाचे तांबे उचलून आणायचे आणि सगळ्यात कहर दररोज ताजं दूध आणायचं नाही. हे भयं कर वाईट्ट. शिळ्या दधु ाचा चहा प्यायला तरी पुन्हा ताज्या दधु ाचा चहा करुन पिणार्या अट्टल चहाबाजाला अशीच शिक्षा हवी...हाहाहा....! सुदैवाने त्या दिवशी एका मॅ नेजरच्या घरी जेवायला आमं त्रण होतं त्यामुळे स्वयं पाक टळला. मग लक्षात आलं हे प्रकार आपल्याला पण करायला हवे. हे कठीण आहे. म्हणजे जेवायला काय घालू? पण तिकडे एक छान गोष्टं कळली. पुढच्या महिन्यात ते कु टुंब एमस्टरडॅ मला चालले होते. फ़क्त ट्लयु िप्सच्या बागा बघायला. तमाम मं डळीनं ी मला सिलसिला चित्रपटात तिथलं शूटिगं घेतलं य असं सांगितलं . एक दोन आठवडे गेले एप्रिलचे. चालत फ़िरत हिडं ता येईल एवढं पिटरबरो ओळखीचं झालं होतं आणि लायब्ररी कार्ड ताब्यात आलं होतं . तिथल्या लायब्ररीत कॅ लिग्राफ़ीवरची जेवढी पुस्तकं पाहिली, वाचली तेवढी कधीच नाही मिळाली. मला आईने अशाच एका सुटीत जबरदस्ती शिवण शिकायला पाठवलं होतं . त्यातली क्रियेटिविटी कळल्यावर मला खूप आवडायला लागलं . इथल्या लायब्ररीत ड्रेस डिझाइनिगं आणि स्मॉकिंगवरची पुस्तकं मिळाली. आता मन खरोखर रमायला लागलं होतं . शिवाय फ़ावल्या वेळात फ़्री इंटरनेट 12
झाली फ़ु ले कळ्यांची
मिळायचं वापरायला. मग थोडं नेट सर्फ़िंग आणि घरी मेल टाकायचं काम सहज व्हायचं . आणखीन एक मजेदार गोष्ट सापडली त्या घरात. दर बुधवारी; गुरुवारच्या ऑफ़र्स सांगणारी पत्रकं (फ़्लायर्स) घरी येऊन पडायचे. त्यात खर् या खोट्या दागिन्यांचे कॅ टलॉग्ज असायचे. ज्वेलरी डिझाइनिगं आणि त्याचे इतके उत्तमोत्तम नमुने मी आयुष्यात पहिल्यांदा पहात होते. दागिने विकत घ्यावे असा मोह नव्हता, पण त्या नक्षीची नजाकत खूप वेगळी होती. पारंपारिक भारतीय दागिन्यांपेक्षा फ़ारच वेगळी. विकान्ताला मात्र भटकायचं तर असायचं पण आम्ही निघेपर्यंत दक ु ानं बं द व्हायला यायची शनिवारची. जेऊन खाऊन आरामात बाहेर पडू असलं नाही. बहुधा कोणाकडे तरी गेट टुगेदर असायचं . अगदी रविवारी सकाळी पण फ़ोन यायचा, दहा जणांपुरतं काही तरी करुन घेउन ये. द.....हा...! दोघांचं करताना मारामारी. मे महिन्यात थं डी कमी, दिवस मोठा व्हायला लागला. चालत फ़िरल्याने अगदी गल्ली बोळं पण माहित होतात. हाच अनुभव पुढे कॅ लिफ़ोर्नियात देखील कामी आला. मग आमचा किंग्ज क्रॉसला दौरा ठरला. थोडंफ़ार व्हीटी स्टेशनसारखं च वाटत होतं ते स्टेशन. इथे घराघरांवर गुलाबच गुलाब फ़ु ललेले दिसायला लागले होते. सेंट जेम्स वसं त ऋतू विशेषांक
13
पार्क ,बकिंगहॅ म पॅ लेस इथे तर काय विचारुच नका सगळा रंगगं धाचा उत्सव होता .नजर पोहोचेल तिथपर्यंत रंगीबेरंगी ट्लयु िप्स फ़ु ललेले होते. वसं त ऋतूचं कौतुक पहावं तर इथे. कु ठे त्या महिनाभरापूर्वीच्या काटक्या आणि कु ठे हा बहर....! आयुष्यात पहिल्यांदा वाटलं “मला एक डिजिटल कॅ मेरा नितांत गरजेचा आहे.” सोबत फ़िल्म कॅ मेरा होता, पण त्याने म्हणजे अचूक काढायला हवा फ़ोटो. त्यामानाने नायगारा फ़ॉल्सला गेलो साधारण पाचेक वर्षांनी तेव्हा डिजिटल कॅ मेरे अगदी सर्रास लोकांकडे दिसायला लागले होते. कॅ मेर्याचा क्लिकक्लिकाट असा नवीन शब्द रुजू करावा इतके जास्त.
14
झाली फ़ु ले कळ्यांची
दसु र्या ट्रिपला ‘टॉवर ऑफ़ लं डन’ला गेलो.अंतू बर्वा आठवला. तो कोहिनूर पहायचाच होता आम्हाला या जन्मी तो पाहिला एकत्र. तो पाहून वॅ क्स म्युझियम, लं डन ब्रिज सगळे फ़िरलो. एक हॉरर शो पाहिला . ती मेकअप करुन भयं कर दिसणारी माणसं ...! जाम घाबरले होते. इतकं सगळं होतं य तोपर्यंत सं पली ना सुट्टी...! भारतात परतल्यावर घरी पोचेस्तोवर घामाच्या धारा लागल्या. मायदेशी परतलोय याची पूर्ण खात्री पटली. श्रेया महाजन. ठाणे.
वसं त ऋतू विशेषांक
15
मृगजळ
उगवली वसं ताची शीतल पहाट, झाली सुरु पृथ्वीची जगरहाट. . आगमनाने त्याच्या कोकिळ झाली आनं दित, करि गोड गाण्याने आपले जीवन प्रफु ल्लित.. गुलमोहर, मोगरा, चाफ्याने वाढे वसं ताची शोभा, आंब्याच्या मधुर गं धाने नटू न जाई आभा… ररणरणते उन घेऊन दपु ार येई , धरणीमातेला पिवळे करून जाई… असा हा सुं दर ऋतूराज आला , सृष्टीत रंग मिसळू न गेला … वसं ताच्या पाठोपाठ येतो ऋतू ग्रीष्म, वातावरण होते अजूनच उष्ण… तहानलेली धरती देई आभाळाला हाक , तापलेला सूर्य दाखवे अजूनच तिला धाक … कु ठू नतरी एक ढग देउन जाई तिला बळ थोड्याच वेळात कळे तिला हे तर होते फसवे मृगजळ…. सौ. श्रुती के दार जोशी. हैदराबाद. 16
मृगजळ
निसर्गातलं काव्य असं सरता सरता बहरते गुलमोहोर निष्पर्ण होऊन फु लांनी लगडतो आणि देण्यासारखं सगळं दान देऊन झाड तृप्त होते कोकिळे च्या सुराला हि नवी जवार चढते सुरांच्या हिदं ोळ्यावर मग मन हि झल ु ू पहाते के शराची उधळण करत सं ध्याकाळ येते साऱ्या सृष्टीलाच एक नवी झळाळी देते अशा वेळी मग आकाशीचा चं द्र मनातल्या चं द्राला भेटतो आणि मग मनातला अबोल चाफा खुलून मोहरतो वसं ताची चाहूल प्रत्येकाला बहरवते आणि निसर्गातलं काव्य असं सरता सरता बहरते तनुजा इनामदार पाचगणी
वसं त ऋतू विशेषांक
17
ठं ड ा ठं ड ा कू ल कू ल रविवार होता, झरझर कामं करत होते. साध्या गोष्टीवरुन चिडले. नवरा म्हणाला, “अगं रविवारी तरी चिडू नकोस.” मी गप्प बसले, स्वत:ला सावरले. पुढची कामे करु लागले. तत्पूर्वी शांतपणे त्याला बजावलेचिडण्याला काय वार असतो का? फ़ु टकळ विनोद नको करु. मी अकारण चिडत नाही. ‘ठं डा ठं डा कू ल कू ल’ हा माझ्या आयुष्याचा मं त्र आहे, फ़क्त उन्हाळ्यापुरता मर्यादित नाही. आपल्याला जगताना बरेचदा तडजोड करावी लागते. स्त्री ही तर घराची कें द्रबिदं ू ...! घर, नोकरी, परिवार आणि आयुष्य एकत्र बांधण्यासाठी बरेचदा तिला स्वत:ला विसरावे लागते. ‘निरपेक्ष नाते’ हा शब्द वाचायला उत्तम, लिहायला सोपा पण आचरणात अत्यं त अवघड...! प्रेमाची उत्पत्तीच मुळात अपेक्षेतून, भावनेतून होत असते. मग निरपेक्षता जपणे अवघड. वाढणार्या अपेक्षांमधून स्वत:च्या ‘ झोप’ आणि ‘भुकेच्या वेळा’ हे सांभाळले तर आयुष्य होईलच “कू ल”. आपल्याला येणार्या रागाचे आपणच परीक्षण करावे. राग शांत झाल्यावर त्याचे कारण शोधावे.’आपल्या 18
ठं डा ठं डा कू ल कू ल
तब्बेतीमुळे तर नाही ना?’ याची जरा खात्री करावी. ‘आपल्याला आपले आयुष्य पेलतेय ना?’ हे तपासावे. अवास्तव मोह, दसु र्यासोबत स्पर्धा व अवाजवी अपेक्षा या दष्टु चक्रात आपण सापडलो आहोत का? याचा देखील थोडा विचार करावा. एखाद्या जिवलग मैत्रिणीचा, नाहीतर मायेच्या माणसाचा आधार घ्यावा. तसे कोणी नसेल तर समुदेशन कें द्रावर (काउन्सेलिगं सेंटर) जावे. (मी माझ्या मनाच्या डॉक्टरला ‘पेड फ़्रें ड’ म्हणते) एकदा समस्या सुटली की आयुष्य कसं ...”ठं डा ठं डा, कू ल कू ल...!” घरातील वयस्कर व्यक्ती व आपण यात जनरेशन गॅ प असते. आपली मुले व आपण यांमध्ये देखील हीच गॅ प. मुलांच्या सं गोपनाची, आयुष्याची, शैक्षणिक, सांस्कृतिक विकासाची साशं कता, परिवाराची अनाठायी चितं ा आपले स्वास्थ्य बिघडवते. बरं या जनरेशन गॅ प मध्ये आपणच पडतो. मग कशाला खरचटवून घ्यायचे? हातामध्ये काठी घ्यायची आणि पाय घट्ट रोवायचे. ‘कू ल कू ल’ म्हणत रहायचे. सं ताप हा आपले व आजूबाजूच्या सर्वच जीवलगांचे स्वास्थ्य हरण करतो. परिस्थितीत कधी बदल घडवता येतो, कधी नियती आहे तशीच स्वीकारावी लागते. हा स्वीकार करणे व तरीही हसत जगणे हे अत्यं त वसं त ऋतू विशेषांक
19
धैर्याचे, ताकदीचे, अभिमानाचे काम असते. याचे फ़ळ आपल्या पदरात ‘सुख, शांती, समाधान’ या बिल्वदल ं ार साधना, छं द प्राप्तीने पडते. नियमित व्यायाम, ओक जोपासना, ध्यान, योगासने, सं गीत अशा कितीतरी मार्गाने आपण आपले आयुष्य ‘ठं डा ठं डा कू ल कू ल’ करु शकतो. पैसा ही गरज आहे, सर्वस्व नाही. आपण बहुतांशी खात्यापित्या घरातीलच असतो. स्वत:च्या इच्छा, स्वकें द्रित आयुष्य हे कायम अपूर्णच वाटते . म्हणून दसु र्याचा विचार के ला, मदतीचा हात दिला तर आपला आनं द ‘आतला आनं द’ द्विगुणित होतो. इथे मात्र निरपेक्षवृत्ती हवीच. आपण, आपल्या स्वत:ला थोडासा वेळ देऊ या- एक आनं द फ़ु लाचे रोपटे लावूया. मनातील विचारांचे, इच्छांचे खत घालूया. प्रयत्नांचे पाणी घालूया. निर्मळ हास्याची शेवरीची म्हातारी वार्यावर सोडू या. आनं द फ़ु लाचे रोपटे हळू च वाढेल! छानसे हसेल! त्यावर सुरेख फ़ू ल फ़ु लेल! कितीही उन्हाळा असला तरी तुम्ही ह्रदयापासून म्हणाल--ठण्डा ठण्डा कू ल कू ल. ..! आपोआप त्याच्या गं धाने आयुष्य दरवळे ल. आधी तुमचे ....मग इतरांचे! ---------मनीषा कु ळकर्णी. 20
ठं डा ठं डा कू ल कू ल
“उन्हाळा..सुट्ट्या आणि मुले..!” उन्हाळा आणि शाळे ला सुट्ट्या..! मुलांनी घरी बसून काय करावे हा एक मोठा प्रश्नच असतो. आजुबाजुच्या समवयस्क मुलामुलीनं ी एकत्र जमून, रोज एक तास एके काच्या घरी बैठे खेळ खेळावे. जसे की पत्ते, कॅ रमबोर्ड, लूडो, सापशिडी, सागरगोटे, असे अनेक खेळ खेळावे. सं ध्याकाळी, घराबाहेर मोकळ्या जागेत दोरीवरच्या उड्या, लं गडी, लपाछपी असे खेळ खेळावे. एखादा क्लास लावावा, जसे की चित्रकला, हस्तकला, गाणे, वाद्यवादन, कराटे ई. मुलाची आवड काय आहे ते पाहून असे हॉबी क्लासेस लावावेत. मुलांना वाचनाची आवड लावावी, त्यासाठी शक्य असेल तर मुलांसाठी लायब्ररी लावावी. त्यांच्यासाठी नवीन पुस्तकं आणावी, किंवा मुलांनी आपली पुस्तके मित्रां बरोबर शेयर करावीत. मुलांची सर्व कामे मुलांनीच करावीत असा नियम करावा. जसे की आपापले अंथरुण पांघरुण नीट करणे, आपापले धुतलेले व बदललेले कपडे घड्या घालून जागेवर ठे वणे. फ्रीज मधे वेळोवेळी पाण्याच्या बाटल्या भरून ठे वेणे ई. तसेच मुलामुलीनं ा त्यांच्या वसं त ऋतू विशेषांक
21
वयानुसार स्वयं पाक-घरातली कामे द्यावीत. जरा मोठी मुले असतील त्यांनी दर आठवड्यात एक पदार्थ शिकू न करून दाखवावा. हे त्यांच्या पुढील आयुष्यात उपयोगी ठरेल! भाज्या विकत घेताना मुलांना सोबत घ्यावे. जेणे करून त्यांना झटपट हिशोब कसे करतात ते कळे ल, तसेच भाज्यांचे विविध प्रकारही कळतील. आई वडील कामावरून परतले की त्यांना पाणी देणे, घरात कोणी पाहुणे आले की त्यांना पाणी देणे, अश्याप्रकारची कामे त्यांनी अगदी सहज करावीत! छोट्या-मोठ्या सहली कराव्यात. एक अऊटिगं फक्त आई बाबा यांच्याबरोबर असावी. त्यावेळेस खरेदी असे काही नसावे. एकमेकांबरोबर जास्तीत जास्त वेळ घालवावा. मुलांबरोबर सं वाद साधायला वेळ मिळतो. मुले खुलतात, मनमोकळी होतात, त्यांच्यात एक वेगळाच आत्मविश्वास वाढतो. तसेच पालकांनाही आपल्या मुलांचे विचार कोण्त्या दिशेला जात आहेत ते लक्षात येते. घरात आज्जी आजोबा असतील व त्यांच्याशी आपले पटत नसले तरी मुलांनी त्यांचा आदर करावाच असे मुलांना समजून सं गावे, तरच मोठे पणी मुलं आपला आदर करतील..! घर, घरपण काय असते ते मुलांना समजले पाहिजे. घरातील वातावरण प्रसन्न असावे. घरातील सर्व 22
उन्हाळा, सुट्ट्या आणि मुले
सदस्यांनी एकमेकांशी सं वाद साधण्यास ही उन्हाळ्याची सुट्टी महत्वाची ठरते. कारण काही खास सणवार नसतात, उन्हामुळे दपु ारचे बाहेर जाणे टाळले जाते. आई वडील दोघेही कामावर असतात. त्यामुळे जरी बाहेर गावी जाण्याचा बेत ठरला तरी ते काही दिवसांपुरतेच असते. बाकी वेळ घरीच घालवावा लागतो. हो..आणि मुलांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे खूप खाऊ व सारबते करून ठे वावीत..! -रजनी अरणकल्ले..
वसं त ऋतू विशेषांक
23
ऑरेंज लिली ब्लॅ क ब्युटी लिली
ट्रम्पेट लिली
यलो वाईल्ड लिली ओरिएन्टल लिली
एशियाटिक लिली 24
लिलीच लिली
लिलीच लिली साधारणत: वसं त ऋतू सुरु झाला ना की अमेरिके तल्या बर् याचशा पब्लिक लायब्रर् यांमध्ये बागकामाविषयीची पुस्तकं अगदी दर्शनी भागी काढू न ठे वलेली असतात. अशीच गुलाबी रंगाची आकर्षक फ़ु लं असलेलं कव्हर पाहून एक पुस्तक मी उचललं आणि स्वत:च्या नावावर घेतलं . घरी जाऊन वाचते तर काय ते एका फ़ु लांवर सं शोधन करणार्या व्यक्तीचं चरित्र होतं . विषय अगदी नवा, पूर्णत: अपरिचित. मला खूप आश्चर्य वाटलं ...असाही विचार आला आपल्याकडे मिळे ल का हो असं गव्हाच्या सं करित जाती तयार करणार्या व्यक्तीचं चरित्र? जास्तीत जास्त ‘आमची माती आमची माणसं ’ मध्ये त्यांची मुलाखत झाली असती.
25
लेस्ली वुड्रीफ़
झाली फ़ु ले कळ्यांची
मी आधी उत्सुकतेने फ़ोटो पाहिले. चार वेळा उलटपालट के ल्यावर लक्षात आलं पूर्वी यातल्या पिवळ्या, पांढर्या, लाल लिलीचं े फ़ोटो आपण काढलेत. पण हा जो गडद गुलाबी रंगाचा आणि पांढरी किनार असलेला फ़ोटो तो मात्र नवा आहे. या लिलीचं नाव स्टारगेझर लिली. ही सं करित जात निर्माण करणारा शास्त्रज्ञ त्याचं नाव लेस्लि वुड्रिफ़. ‘स्टारगेझर लिली हे अतिशय सुवासिक आणि देखणं फ़ू ल. खरेतर बुके वा गुच्छांमध्ये विकली जाणार्या फ़ु लांत गुलाबाच्या पाठोपाठचा क्रमांक या फ़ु लाचा लागतो. पूर्ण सूर्यप्रकाशात वा अर्धवट सावलीत देखील ती वाढतात . ६ ते ८ इंच इतका मोठा व्यास या फ़ु लांचा आढळतो. ं या काही जाती ह्या या फ़ु लांचं इतकं कौतुक का? तर लिलीच् टपोर्या उमलणार्या, तर काही जाती फ़ु लताना जमिनीच्या दिशेने वळणार्या पण अतिशय सुगंधित असतात, देखण्या असतात. हे तीनही गुणधर्म या एका सं करित जातीत आले आहेत. हे साधलं कसं त्याचे प्रयोगदेखील वर्णिले आहेत. एका परीक्षानळीच्या आत काळा रंग लावून हे वुड्रिफ़ महाशय एक फ़ू ल त्यावर आपटत. मग परीक्षानळीत गोळा झालेले परागकण दसु र्या फ़ु लांच्या अंतर्भागात एका उं टाच्या के सांच्या ब्रशने लावत. या सं करणामागे के वळ एक सुं दर फ़ू ल निर्माण करणे हे एकमेव ध्येय होते. त्यांनी लिलीच्या अनेक सं करित जाती निर्माण के ल्या. परंतु ओरिएं टल लिली आणि 26
लिलीच लिली
एशियाटिक लिली यांच्या सं करणाने निर्माण के लेले हे फ़ू ल मात्र जन्मत: आकाशाकडे तोडं के लेले दिसले म्हणून याला ‘स्टारगेझर लिली’ असे नाव त्याने दिले. ं आपल्या रंग, गं ध आणि सौदर्याने जगाला भारुन टाकलेले फ़ू ल ज्याने निर्माण के ले त्याला सलाम.
स्टारगेझर लिली
आभार: यातले काही फ़ोटो मी स्वत: काढलेले आहेत. तर काही माहिती आणि फ़ोटो आंतरजालावरुन साभार. काही त्रुटी आढळल्यास क्षमस्व, श्रेया महाजन, ठाणे.
वसं त ऋतू विशेषांक
27
पाककृ ती ठं डा ठं डा, कू ल कू ल “गम्माडी गम्मत..!” २ लालभडक टोमॅ टो मोठे तुकडे करून, १/२ लिबं ाचा रस, १ वाटी पुदीना पाने स्वच्छ धुवून, १ वाटी कोथिबं ीर देठासकट, काळे मीठ व साधे मीठ चवीपुरते, १/२” आले तुकडा किसून, २ वाटी काळी द्राक्षे / काळ्या द्राक्षाचा रस १ वाटी. (साखर १ मोठा चमचा, ऐच्छिक). टोमटो पुदीना कोथिबं ीर आले मीठ द्राक्षे (साखर) सगळे एकत्र करून मिक्सर मधून बारीक करून घ्यावे. त्यात दिड ग्लास पाणी व काही बर्फाचे तुकडे / अगदी थं ड गार पाणी २ ग्लास घालून चांगले मिक्स करून घ्यावे. लिबं ुरस घालून न गाळता सर्व्ह करावे. साधारण 3 सर्व्हिंग्जस होतील. 28
ठं डा ठं डा कू ल कू ल
“कै री+टोमॅ टो डिलाईट..” १ वाटी अर्धवट कच्ची कै रीचे तुकडे, २ मोठे लालभडक टोमॅ टोचे तुकडे, साखर १ ते २ मोठे चमचे, मीठ चवीसाठी, भाजलेले जीरे पुड १/४ लहान चमचा, काळी मिरी पुड चिमुटभ ् र (आवडत असल्यास), गार पाणी २ ग्लास. वरुन घालण्यासाठी १० ते १२ पुदीना पाने हाताने कु स्करून घालण्यासाठी. सर्व साहित्य चांगले बारीक होऊन मिळू न येईपर्यंत मिक्सर मधुन काढा. ग्लासमधे वरुन पुदीना पाने घालून सर्व्ह करा. टिप - आधी सगळे साहित्य मिक्सर मधुन बारीक करून घ्यावे. नं तर पाणी घालुन मिक्सर मधुन फिरवुन घ्यावे. -रजनी अरणकल्ले वसं त ऋतू विशेषांक
29
lqanj eh QksVks Li/kkZ ekpZ २०१४
vfHkuanu l[ks-----! अनिता वाघ या आपल्या सखीचे करावे तितके कौतुक थोडेच आहे. ती सगळ्या अर्थाने सुं दर आहे. स्वत:ला जन्मत: मिळालेल्या व्यं गावर मात करुन इंजिनिअरिंगची डिग्री तिने मिळवली. स्वत:च्या हिकमतीवर ‘आकांक्षांपुढती जिथे गगन ठें गणे’ हे वाक्य तिने सत्य करुन दाखविले आहे. तिचे अभिनं दन... 30
सुं दर मी फ़ोटो स्पर्धा निकाल
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने मार्च २०१४ च्या “या सख्यांनो या” च्या अंकात एक फ़ोटो स्पर्धा घेण्यात आली होती. यासाठी जवळ जवळ १७ सख्यांनी आपापले फ़ोटो पाठविले होते. विषय होता ‘सुं दर मी’. प्रत्येक सखीने आपापले फ़ोटो स्पर्धेसाठी पाठवले होते. त्यातील विजेती सखी “अनिता वाघ” हिचे या सख्यांनो या परिवारातर्फ़े हार्दिक अभिनं दन....! सहभागी होणार्या सख्यांचे खूप खूप आभार. वसं त ऋतू विशेषांक
31
कलाकृ ती
सख्यांनो, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांसोबत काय करावं इत्यादी विषयी आपण लिहित बोलत असताना खर्या अर्थाने त्या सगळ्या गोष्टी करणारी आपली एक सखी ....नेहा कु रमभट्टी. गेली अनेक वर्षे फ़े विक्रिल चे हॉबी क्लासेस ती मुं बई-ठाण्यात करते आहे. तिने वेगवेगळ्या उन्हाळी शिबिरांत मुलांबरोबर तयार के लेल्या कलाकृ तीचं ी छायाचित्रे तिने आपल्यासाठी पाठवली आहेत. 32
कलाकृ ती
ग्लास पेंटिगं वर्क शॉप
वसं त ऋतू विशेषांक
33
ज्वेलरी बॉक्स
टाइल्स
कीचेन होल्डर 34
कलाकृ ती
फ़्लॉवर मेकिंग वर्क शॉप
एम्ब्रॉयडरी वसं त ऋतू विशेषांक
35
ं पेंटिग्ज
हस्तकला 36
कलाकृ ती
फ़ोटोग्राफ़्स आणि कलाकृ ती- नेहा कु रमभट्टी. वसं त ऋतू विशेषांक
37