या सख्यांनो या अंक ३९

Page 1


lqLokxre~ l[;kauks-----! प्रिय सख्यांनो, नुकतीच एका नवीन पर्वाची सुरुवात आपल्या भारतभूमीत झालीय. आपल्याच सं स्कृ ती आणि विचारधारेचा सुयोग्य समन्वय साधत राष्ट्र्कार्याची राष्ट्रप्रेमाने मुहूर्तमेढ रोवली गेलीय. “I Dream for India.... नारी तू नारायणी” “I dream for India.... यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता:।” असा शं खनाद करणारे पं तप्रधान आज आपल्याला भेटलेत. “या सख्यांनो या” परिवाराला याचा अभिमान आहे. “स्त्री -शक्ति, मातृ - शक्ति” चोहोबाजूं नी फु लत असतांना समाजातील, परिवारातील अनं त दिशा पुलकित करीत असतात. मग http://yasakhyannoya.blogspot.in/


आपल्या अंकाकरता यावेळेस ही कल्पना वसुधा कु लकर्णीने समोर ठे वली. आणि बघता बघता कितीतरी सख्या लिहित्या झाल्यात. आज श्रेया महाजनने अंक समोर ठे वला आणि तो वाचता वाचता नकळत डोळे पाणावले..... “नारी तू नारायणी” म्हणतात ते यालाच याची खात्री पटली. पुलकिताने रेखाटलेले सुं दर मुखपृष्ठ तसेच श्रुती जोशी या नवीन सखीचा सं पादनात सहभाग .... दोघीचं ेही स्वागत....!

http://yasakhyannoya.blogspot.in/


ek>sgh er सख्यांनो, मातृदिनाच्या सर्वांना शुभेच्छा! आपल्यापैकी अनेक सख्या नोकरी करतात. काही उच्च पदावर कार्यरत आहेत कोणी डॉक्टर, कोणी प्रोफे सर, कोणी इंजिनियर, तर कोणी आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत. काही स्वतःचा व्यवसाय करतात तर बऱ्याचजणी नोकरी. काही सख्या घर चालवतात म्हणजेच गृहिणी आहेत. म्हणजे थोडक्यात काय तर आपण सगळ्याजणी professionals आहोत. काय दचकलात? मला माहित आहे कोणी म्हणेल, “नाही ग वसुधा मी तर घरीच असते. मी कु ठे काही करते?” तर दसु री एखादी म्हणेल “छे ग, मी साधी ग्रॅ ज्युएट झाले आहे एक साधीशी नोकरी करते” पण सख्यांनो जरा नीट विचार करा, घर सांभाळणं सोप काम आहे का? त्याला काहीच विशेष नैपुण्य लागत नाही? मग तुम्ही http://yasakhyannoya.blogspot.in/


ज्या सफाईने घर चालवता तसं तुमच्या पतिराजांना का जमत नाही? तर सख्यांनो आपल्याला हे ट्रेनिंग जन्मल्यापासून मिळत असतं . माहेरी आपली आई, आजी आणि घरातले इतर यांच्याकडू न कळत नकळत आपण सं साराचे धडे घेत असतो. फक्त त्या युनिवर्सिटीला नाव नसतं , तिथला अभ्यासक्रम कोणत्याही पुस्तकात मिळत नाही. परीक्षा तर रोज असते पण पास होण्याची खात्री नाही आणि झालोच तरी प्रशस्तीपत्रक मिळे लच याची शाश्वती नाही! पण म्हणून गृहिणी म्हणजेच होममेकर हिचा दर्जा इतर कोणत्याही व्यवसायापेक्षा कमी नाही. तसं च “ कोणतीही नोकरी ही अशी तशी कधीच नसते. काहीही न करण्यासाठी कोणीच कोणाला पगार देत नाही. तेंव्हा त्या कामासाठी तुम्ही योग्य आहात म्हणून तुम्ही तिथे आहात. तेंव्हा साधी असली तरी नोकरी कमी दर्जाची नाही. आपले कष्ट कमी दर्जाचे असूच http://yasakhyannoya.blogspot.in/


शकत नाहीत. पटलं न माझं म्हणणं ? तर आपण सर्व सख्या professionals आहोतच.... एखाद्या डॉक्टर सखीच्या हाती स्टेथोस्कोप असेल तर आयटी सखीच्या हाती लॅ पटॉप. एक वेळ रविवारी तो हातून सुटेल पण दसु ऱ्या हातातलं लाटणं मात्र हातून सुटत नाही. गृहिणीनं ा तर कामाच्या वेळेची मर्यादाच नाही. त्यांच्या एका हाती लाटणं तर दसु ऱ्या हातात नातेवाईकांची सरबराई, बँ के ची कामे, बिल भरणे, मुलांना शाळे त सोडणे, मुलांचा होमवर्क घेणे इत्यादी इत्यादी कामांची हातभार यादी असते. त्या तर चोवीस तास ड्टयु ीवर. स्त्री म्हणजे ‘अष्टभुजा’ आहे. आपल्या या शक्तीचा पिढ्यानपिढ्या गैरफायदा घेतला गेला आहे परंतु आता परिस्थिती बदलते आहे. नवीन पिढीतल्या मुली कधी उर्मट वाटतात. पण त्या http://yasakhyannoya.blogspot.in/


आपल्यातल्या या शक्तीला ओळखून आहेत आणि स्वतःचा कोणी गैर फायदा घेणार नाहीत यासाठी सतर्क आहेत आणि म्हणूनच कदाचित तरुण मं डळी त्याचा आदर करून नोकरी/ व्यवसाय करणाऱ्या पत्नीला घरात मदत करताना दिसतात. आपल्या सख्या वेगवेगळ्या वयोगटातल्या म्हणजेच वेगवेगळ्या पिढ्यांच्या प्रतिनिधी आहेत आणि म्हणूनच प्रत्येकीचे अनुभव सुद्धा वेगवेगळे आहेत. त्यामुळे हा अंक तुम्हा सगळ्यांना एकाच विषयाचे अनेक पदर उलगडू न दाखवेल यात शं का नाही. ....................वसुधा कु लकर्णी.

http://yasakhyannoya.blogspot.in/


varjax

१ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १५.

गाणारं घर वास्तु म्हणते तथास्तु या टोपीखाली दडलं य काय? ये घर बहोत हसीन है। जिथे राबती हात तेथे हरी कहाणी एका चपलेची असाध्य ते साध्य करिता सायास आतला आवाज दिल है छोटासा असाही एक किस्सा गोड्या पाण्याचे झरे मागे वळू न पहाताना माय माझी मला माझी आई उमगली लेक लाडकी

सं गीता शेंबेकर नं दा जोशी सिम्प्सन श्रेया महाजन अमृता देशपांडे अनिता वाघ अंबिका टाकळकर मं गला भोईर तृप्ती माळिचकर योगिनी चौबळ रजनी अरणकल्ले रजनी अरणकल्ले स्वाती भट अदिती कापडी श्रुती जोशी आशा नवले.

http://yasakhyannoya.blogspot.in/

१ ७ २४ २८ ३३ ३९ ४६ ५४ ६१ ६६ ६७ ६८ ६९ ७० ७६


xk.kkja ?kj एका सुप्रसिद्ध गायकाची कन्या, स्वत: गायन क्षेत्रात व्यावसायिक म्हणून कार्यरत असलेली आपली प्रिय सखी सं गीता शेंबेकर सांगते आहे तिच्यातील आई आणि गायिका या दोन्ही भूमिकांबद्दल तिच्या शब्दांत...! सृजनाचे स्वागत असो … प्रत्येकाचा होई आदर | हसत मुखाने स्वागत करतं इथे एक गाणारं घर || या दोन ओळी माझ्या घराच्या दर्शनी हॉलच्या एका भिंतीवर लिहिल्या आहेत. ओळखीच्यांना मजकू र आवडतो. अनोळखी लोकांना नव्याने माहीत होतं की हे गातात. खऱ्या अर्थाने गेली अठ्ठावीस वर्षं इमानेइतबारे सं गीत क्षेत्रात आम्ही नवरा बायको आणि आता दोन्ही http://yasakhyannoya.blogspot.in/

1


मुलं आहेत. हे सांगताना मनाच्या तळाशी खूप शांत वाटतं ; त्याबरोबरच मधली अडचणीचं ी वळणं पण झटकन डोळ्यासमोरून जातात आणि थरथर होते दोन क्षण .. माझा जन्म गायकाच्या घरी! गवयाचं पोर सुरात रडलं का माहीत नाही. पण कळता क्षणी “गाणे” ऐकायला आले. सकाळी उठलं की बाबांचा रियाज आणि आई च्या स्वैपाकाचा दरवळ ही माझी ठळक आठवण आहे. लहानपण झोकात होतं . प्रसिद्धीचा झोत नकळत पडत होता. मी “स्पेशल “ असल्याची जाणीव व्हायची पण त्याचा पेहेराव आई -बाबांनी कधीच चढू दिला नाही. स्वतः खूप साधेपणाने सं गीत साधना करा इतकं नक्की शिकवलं ..! अवघ्या विसाव्या वर्षी गाण्यातून ओळख झालेल्या कीरणशी लग्न गाठ बांधली. प्रेम विवाह आहे आमचा! 2

http://yasakhyannoya.blogspot.in/


आणि तिथेच रुजलं की आपण दोघांनी “गाणं करायचं .”.मला थोडी शं का होती; दोघं ही घराबाहेर राहिलो तर “घर “ कसं बनणार ? पण समं जस आणि शांत स्वभाव, उत्तम निर्णय क्षमता असल्याने आम्ही दोघांनी एक लक्ष्य ठरवलं आणि प्रवास सुरु के ला. सुरवातीला मुलं नसताना छान वाटायचं . सहवास, प्रवास ,काम सगळं कसं सुरेख जुळून आलं होतं . कालांतराने मुलगा झाला आणि त्यातला ताल थोडा बदलला. सगळा फोकस मुलावर ..! मी कामांना नाही म्हणायला लागले. मग थोडा विसं वाद आला. नवरा मात्र काम करत होता.त्याला पूर्ण जाणीव होती; घरासाठी आणि मुलासाठी मी वेळ देणं आवश्यक आहे. तरी “व्हॅ क्मयु ” निर्माण होतोच. सुदैवाने मुलगा के वळ तिसऱ्या वर्षी स्वत: गायला लागला आणि बघता बघता आनं दाचे नवनवीन क्षण आम्हा आई http://yasakhyannoya.blogspot.in/

3


वडिलांसाठी निर्माण करत गेला आणि प्रवास पुन्हा सुखकर झाला. मोठ्या सं धी त्याला मिळत गेल्या आणि मग आमची सुरळीत गायन साधना सुरु झाली. त्याच्यासाठी गायन शिक्षक येत गेले आणि आमची पण दृष्टी रुं दावत गेली. आता दौरे आमचे तिघांचे सुरु झाले.ध्वनिमुद्रण ,जाहीर कार्यक्रम यात पटकन वर्षे निघून जात होती. दसु ऱ्या बाळाचे आगमन दधु ात साखर देऊन गेले. आता आम्ही घडी बसवण्यात तरबेज झालो आणि घर आणि भविष्याची तरतूद म्हणून अजून एक ठिकाण निर्माण करायच्या कामात गुंतलो . आम्ही कलावं त .“भविष्य” याचा जर फार विचार न करता राहिलो तर पुढे जड जातं हे निरीक्षणाने शिकलो . पैसे आणि रोजचं जीवन याचा समतोल स्वतः के ला आणि मुलांना पण तेव्हाच दाखवत त्यांना सोबत घेऊन पुढे 4

http://yasakhyannoya.blogspot.in/


निघालो आहोत. खूप मानसिक बळ आणि सं यम लागतो सेल्फ -एम्प्लॉइड बनायला .आता आम्हाला लोक म्हणतात “छान आहे. तुमची हॉबी आणि काम एकं च आहे”. आम्हाला आमच्या आवडीच्या कामात पैसे मिळतात पण त्या साठी बरेच वर्ष घडी बसवावी लागते. गरजा कमी आणि मर्यादित ठे वाव्या लागतात. बेगडी स्पर्धेपासून लांब राहावं लागतं . हे आम्हाला जमलं म्हणून आम्ही इथपर्यंत आलो. आता पुढे आनं द -प्रवास आहे.मोठा मुलगा गायक सं गीतकार म्हणून नाव कमावतो आहे ..अनेक नवीन तं त्र शिकतो आहे. छोटा मुलगा वाद्य वाजवून गातो. पण शिक्षणात मात्र कु ठलीच कसूर आम्ही करू देत नाही आणि ते करत नाहीत. मोठा मुलगा सिम्बॉइसिस मधून मॅ नेजमेंट पूर्ण करून सं गीत क्षेत्रात आला आहे .दसु रा पण शिकत http://yasakhyannoya.blogspot.in/

5


आहे . आई-वडील, शिक्षक,रसिक-प्रेक्षक यांचे आशीर्वाद गाठीशी बांधत आमचा “डोळस “ प्रवास सुरु आहे. आपला छं द,आपली कला हेच आपलं “प्रोफे शन” बनू शकतं . थोडासा विचार, सं यम याची जोड दिली आणि स्वातं त्र्य मिळालं तर हे शक्य आहे .याबद्दल आमचं सगळ्यांचं एकमत आहे...धन्यवाद...! सं गीता शेंबेकर

6

http://yasakhyannoya.blogspot.in/


okLrq Eg.krs rFkkLrq’ पार्ल्यात आणि दादरमध्ये शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण घेतलेल्या नं दा जोशी आज न्यू जर्सीमध्ये एक बांधकाम उद्योगाच्या क्षेत्रात यशस्वीपणे पाय रोवून उभ्या आहेत. त्यांच्या यशाची ही कहाणी आपल्या सगळ्या सख्यांना अतिशय प्रेरक ठरेल. “अगं , तू पार्ल्याची नं दा नं ? चार्टर्ड अकांउंटिंग करत होतीस ना? तुझा भाऊ माझ्या वर्गात होता व्ही. जे. टी. आय. मध्ये....!” “हाय, नं दा तू ओळखलं स का मला? सीप्झ नं तर आत्ता दिसत्येस.” “अगं वॉलस्ट्रीटवरची नोकरी सोडलीस तेव्हापासून आपल्या ट्रेनमधल्या गप्पा सं पल्या.” मला एकदम एकाच दिवशी कितीतरी जुनी मित्र-मं डळी, http://yasakhyannoya.blogspot.in/

7


ओळखीचे लोक भेटले होते. प्रसं ग होता “न्यू जर्सी”च्या “मराठी विश्व”चा गणेशोत्सव. २० वर्षे न्यू जर्सीत राहून सुद्धा मराठी ग्रुपमध्ये पहिल्यांदाच गेले होते, शाळा कॉलेजमध्ये के वळ मराठी मं डळीत मिसळणारी पार्ला आणि दादरची मी...! परंतु नवर्‍याला मराठी समजत नसल्यामुळे माझा वावर आता ‘मेन्सा’, ‘मेक अ विश फ़ाऊं डेशन’ अशा संस्थांत नाहीतर सायलस्वारांच्या या गटात असे. त्या दिवशी आम्ही आमच्या कं पनीचा बूथ ठे वला होता. SIMPSON!! WAASTU!! BUILDERS LLC

‘आम्ही’ म्हणजे मी आणि रिचर्ड सिम्पसन. नुकतेच आमचे लग्न झाले होते आणि मी त्याच्या व्यवसायात तन-मन-धन अर्पून पडले होते. रिचचे सिम्प्सन कु टुंब गेली २०० वर्षे बांधकाम व्यवसाय करतेय. स्कॉटलं डमधून येथे स्थायिक होऊन ‘न्यूयॉर्क ’ व ’न्यू 8

http://yasakhyannoya.blogspot.in/


जर्सी’ यांना जोडणार्‍या सगळ्या बोगद्यांची वगैरे (मरिन कन्स्ट्रक्शनशी सं बंधित) कामे त्यांनी के ली आहेत. रिचने स्वत: अगदी सुरुवातीलाच घरे आणि वसाहतीच्या कामाची सुरुवात के ली. माझा स्वत:चा व्यवसाय करण्याचा अनुभव शून्य होता. प्रतिष्ठित कं पन्यांमध्ये नोकर्‍ या करायचीच सवय. बांधकाम या प्रकाराबद्दल आदरयुक्त भीती होती. रिअल इस्टेटचा अनुभव म्हणजे मुं बईमध्ये आई-वडिलांनी घेतलेले फ़्लॅ ट्स आणि त्याचबरोबर भेटलेले तीन अत्यं त त्रासदायक बिल्डर्स आणि न्यू जर्सीत घेतलेले एक देखणे घर. (तो मात्र अनुभव चांगला होता.) या पार्श्वभूमीवर मी एका बिल्डरशी लग्न करणे याला एकमेव कारण म्हणजे रिचर्ड हा एक साक्षात् गुणी आणि गोड मनुष्य आहे. आमचे लग्न झाले तेव्हा मला बांधकामातील http://yasakhyannoya.blogspot.in/

9


काहीच कळत नव्हते. हळू हळू लक्ष घालायला लागले. त्यानेही अगदी साध्या-साध्या प्रश्नांची उत्तरे माझी चेष्टा न करता दिल्याने मीही आणखीन इंटरेस्ट दाखवायला सुरुवात के ली. आम्हा दोघांचेही हे दसु रे लग्नं . दोघेही दोन घरात व्यवस्थित रहात होतो. त्याने त्याच्या माणसांना बोलावून माझे घर काही बदल करुन परिपूर्ण आणि नव्यासारखे के ले. एका महिन्यात घराचा इंच नि इंच बदलून सुं दर करुन टाकला. तीच खरी माझ्या शिक्षणाची सुरुवात म्हणायला हवी. माझे सुरेख घर पाहून, माझ्या काही मैत्रिणी म्हणाल्या की आमच्यासाठी पण हे नूतनीकरणाचे काम कर नं ! मी एका वर्षात २० घरांवर काम के ले. खूप वेळ खर्च करुन, स्वत: शिकत, इतरांनाही शिकवत, मी खूप वेगवेगळ्या प्रकारची कामे करवून घेतली. कपाटे कशी निवडायची, स्वयं पाकघराची रचना कशी हवी, एक्झॉस्ट फ़ॅ न कु ठे हवा, घरगुती वापराची उपकरणे कशी 10

http://yasakhyannoya.blogspot.in/


निवडायची, ग्रॅ नाइट स्लॅ ब्स कशा घ्यायच्या, फ़रशा, दर्शनी दरवाजा, भिंती, रंग, छप्पर, एक ना दोन या सगळ्यांची माहिती व्हायला लागली. या पुढची पायरी म्हणजे सं पूर्ण नवे घर बांधणे! रिचने यापूर्वी उत्तर एडिसन या भागात घरे बांधली नव्हती. परंतु या भागात नवीन घरांना खूपच मागणी आहे. मी रिचला सुचविले की आपण इथे एक घर बांधून पाहू. एखाद्या नवीन भागात घरे बांधायला सुरुवात करायची म्हणजे पूर्ण भागाचा अभ्यास करावा लागतो. रिच तर त्यात पटाईत! मीही माझ्या डाटा वेअरहाउसिंगच्या नैपुण्याचा उपयोग के ला. आम्ही दोघेही या निष्कर्षाप्रत आलो की इथे घर बांधून पहायला हरकत नाही. ते सहज विकले जाईल. त्याचबरोबर आणखीही एक गोष्ट सहज सुचली. इथे भारतीय जास्त प्रमाणात आहेत तर आपण http://yasakhyannoya.blogspot.in/

11


वास्तुशास्त्रातील तत्त्वांना अनुसरुन एखादे घर बांधावे का? माझ्या या विचारास अनुमोदन द्यायचे तर रिचला वास्तुशास्त्र हा विषयच पूर्णत: नवीन होता. मात्र या सं कल्पना त्याने माझ्या सहाय्याने समजून घेतल्या. एका वास्तुशिल्पी (आर्किटेक्ट) सोबत बरोबर बसून प्लॅ न तयार के ला आणि एक छानसा प्लॉट शोधून काढला. माझे मामा स्वत: ज्योतिषी आहेत. त्यांच्याशी सल्लामसलत करुन भूमी पूजेसाठी मुहूर्त देखील शोधला. ८ डिसेंबरच्या भयानक थं डीत सूर्योदयाच्या वेळी रिचने भूमिपूजन के ले आणि पहिली कु दळ मारली. माझी थट्टा करीत; के वळ माझ्या आग्रहाखातर, माझे मन राखण्यासाठी त्याने हे सारे के ले. आम्ही ‘सिम्प्सन वास्तु बिल्डर्स एल. एल. सी’ ही कं पनी स्थापन के ली आणि पूर्वीच्याच व्यवसायाचे उपांग (एक्सटेंशन) म्हणून ही कं पनी चालवायला लागलो. 12

http://yasakhyannoya.blogspot.in/


बांधकामाच्या ठिकाणी आमच्या कं पनीचे बोर्ड पाहून लोक आम्हाला दूरध्वनीवरुन सं पर्क करायला लागले. या व्यवसायाला पूरक आणि आवश्यक म्हणून मी रिअल इस्टेटचे प्रमाणपत्र (लायसन्स) देखील घेतले. माझा हा व्यवसाय चांगला चालायला लागला. माझे रिअल इस्टेटचे बोर्ड पाहून लोक फ़ोनवर चौकशी करु लागले, “सिम्प्सन वास्तु बिल्डर्स” ची नं दा ती तूच का? तेव्हा मला अतिशय आनं द झाला. लोक आता मला ओळखू लागले होते. हळू हळू उत्साह देखील वाढायला लागला. मग मी “किती घरे विकायची” याचे उद्दिष्ट ठरवले, फ़क्त माझ्यापुरते! माझा मूळ व्यवसाय ‘नियोजन मार्गदर्शक’ म्हणजे “मॅ नेजमेंट कन्सल्टंटचा” तो मी अजून थांबवला नव्हता. पर्यायाने मला भरपूर प्रवास करावा लागे. माझा बराचसा वेळ माझ्या कन्सल्टंसीच्या कामातच जाई. शनिवार-रविवार, http://yasakhyannoya.blogspot.in/

13


आणि दररोजच्या संध्याकाळच्या वेळा या मला रिच आणि माझ्या सं युक्त व्यवसायासाठी राखून ठे वाव्या लागत. पूर्वी रिचला हिशेबनीस (अकाउं टंट), सचिव (सेक्रे टरी) अशी कामे करण्यासाठी मदत उपलब्ध होती. पण हे सर्व शिकू न घेणे, समजावून घेणे आणि प्रगतीचा, नफ़्याचा अंदाज घेणे हे माझे उद्दिष्ट. त्यामुळे मी सगळ्या कामात उडी घेतली आणि रिचनेही माझ्यावर विश्वास ठे वला. मला सर्व कामे माझ्या पद्धतीने करायला वावही दिला. मग मी त्याच्या कंत्राटदारांशी बोलायला सुरुवात के ली. हे त्याच्याबरोबर वर्षानुवर्षे काम के लेले त्याचे मित्र! एका नवख्या भारतीय मुलीचे फ़ोन येतात हे पाहून ते जरा बुचकळ्यात पडले. काहीनं ी रिचला जाबही विचारले! पण रिचने त्यांना उत्तर दिले की, “हं गावात एक नवी साहेबीण आली आहे असं समजा!” या लोकांना माझ्याशी बोलणी करायला सुरुवातीला 14

http://yasakhyannoya.blogspot.in/


फ़ार प्रयास पडले. पण आता तेही माझ्याशी बोलणीच काय पण गप्पा मारायला देखील सरावले आहेत. रिच पूर्वी कधीच जाहिरात आणि विक्रीच्या क्षेत्रात पडत नसे. तो आपला घरे बांधायचा आणि मग रिअल इस्टेट एजं ट बाकीची जबाबदारी घेऊन घरे विकत असे. आता आम्ही ती प्रथा बदलण्याच्या मागे लागलो, कारण आम्ही मागणीनुसार (कस्टमाइज्ड) घरबांधणीच्या क्षेत्रात उतरलो होतो. या प्रकारच्या व्यवसायात घर बांधण्याचा विचार चालू असतानाच ग्राहकाबरोबर बोलणी करावी लागतात, चर्चा करावी लागते. मग मी जाहिरात, वितरण, ग्राहक सेवा आणि जनसं पर्क (पब्लिक रिलेशन्स) ही सगळी जबाबदारी स्वीकारली. सध्याच्या आर्थिक परिस्थितीत आमचे ग्राहक आहेत भारतीय आणि आशियाई ...! काम करणारी भारतीय स्त्री एका गोर्‍या अमेरिकन माणसाबरोबर काम करते हे त्यांना http://yasakhyannoya.blogspot.in/

15


बोलणी करण्यासाठी एकदम सोपे आणि सोयीचे वाटू लागले. त्यांचे फ़ें ग शुई, वास्तुशास्त्र यासं दर्भातले सगळे विचार माझ्याशी बोलताना त्यांना बिलकू ल सं कोच वाटत नाही. “आपण काय बोलतोय ते हिला समजतं य.” हा दिलासा त्यांना देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करते. ग्राहकांशी माझा सं वाद प्रथम फ़ोनने सुरु होतो. त्यांनी एकतर आमची जाहिरात पाहिलेली असते किं वा त्यांच्या कोणा मित्रासाठी आम्ही बांधलेले एखादे “खास घर” त्यांच्या पहाण्यात आलेले असते. मग तसा सं दर्भ देतच सं भाषण सुरु होते. मग मी त्या जोडप्याला प्रत्यक्ष भेटते आणि त्यांच्या घराबद्दलच्या सं कल्पना, घरबांधणीसाठी त्यांची असलेली आर्थिक तयारी याचा प्रथम अंदाज घेते. घर बांधण्यातला हा महत्त्वाचा टप्पा. हे जर दोन्ही बाजूं नी स्पष्ट झाले नाही तर मग नं तर खोट्या स्वप्नांच्या मागे धावाधाव करण्यात आमचा आणि ग्राहकांचा 16

http://yasakhyannoya.blogspot.in/


वेळ, पैसा वाया जातो असा आमचा अनुभव आहे. अर्थात हे म्हणणे जितके सोपे आहे तितके करणे सोपे नाही. कारण त्या जोडप्याला ‘आपल्याला नक्की काय हवे आहे’ तेच माहिती नसते. मग त्यांना वेगवेगळ्या नमुन्यांची घरे दाखवावी लागतात. त्या भागातल्या घरांची माहिती त्यासाठी असावी लागते. मग मी त्यांना गाडीत घालून सर्व भाग फ़िरवते. घरं, रस्ते आणि मुख्य म्हणजे ज्याला ‘लोके शन, लोके शन, लोके शन’ असं आमच्या व्यवसायात म्हणतात ते...घर कोणत्या स्थानावर बांधायचं , तो प्लॉट कु ठे , कसा हवा ते आम्ही एकत्रितपणे ठरवितो. कारण घराबाबतची कोणतीही गोष्ट ‘मागणी’नुसार देता येते. पण घराचे स्थान मात्र ‘स्वयं भू’ असते. त्यात कोणताही बदल नं तर करता येत नाही! मग घराचा आराखडा बनवण्याची पायरी! त्यात नुसता घराचा नकाशा नसतो तर बाहेरची अंगणे, दारे, खिडक्या, अशा पुष्कळ गोष्टींचे नियोजन आधी करावे http://yasakhyannoya.blogspot.in/

17


लागते. उदा. एखाद्या खोलीला उजेड किती, जिने कु ठे इ. अनेक गोष्टींवर खिडकी की दरवाजा...खिडकी के वढी मोठी, खिडकीमुळे आतबाहेर जाण्यार्‍ या थं डीचा विचार करुन खिडकीसाठी लागणारी काच ठरते. तेव्हा ही आराखडा बनवण्याची पायरी म्हणजे एक वर्तुळाकार जिनाच म्हणावा लागेल. पुन: पुन्हा योजना पारखून पहाव्या लागतात, बदलाव्या लागतात. एखादी गोष्ट निवडण्याचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम ग्राहकाला नीट समजावून सांगावे लागतात. म्हणजे मागच्या खिडकीचे उदाहरण द्यायचे तर अमुक प्रकारच्या डिझाईनची खिडकी लावून खर्चात फ़रक पडत नसला तरी उन्हाच्या दिशेमळ ु े खिडकी खराब होऊन नं तर खर्च येईल किं वा विजेचे, हीटिंगचे बिल वाढेल इ. गोष्टी ग्राहकाच्या नजरेला आणून द्याव्या लागतात. यावेळी तज्ञ म्हणून रिचर्डही ग्राहकांशी बोलतो. बांधणीचे त्या शहराचे नियम किं वा काऊं टीचे 18

http://yasakhyannoya.blogspot.in/


नियम, घर तपासणीत काय पाहिले जाते, कोणकोणत्या मं जुरीची प्रमाणपत्रे घ्यावी लागतात, अशा अनेक किचकट बाबी तो नीट समजावून सांगतो. बिल्डर या नात्याने तो घर बांधण्याच्या सर्व पायर्‍या, कशाला किती वेळ लागेल, ह्प्ते कसे भरायचे, कर्जासाठी बॅंके कडे के व्हा जावे लागते हे सर्व समजावून सांगतो. हे सर्व झाले की मग कागदपत्रे वकिलाकडे जातात आणि बांधकामाच्या या प्रकल्पाला खरी सुरुवात होते. शहराकडू न परवानगी घेणे, टेंडरे किं वा कोटेशन घेणे यासाठी मी रिचर्डला मदत करते. एका घरासाठी शं भरच्या वर कोटेशन्स येतात. आम्हाला पुरवठा करणारे नेहमीचे असले तरीही मी टेंडरे मागवते आणि त्यातील सर्वात चांगली किं मत देणार्‍याला कंत्राट दिले जाते. नं तर या प्रकल्पाचे आमचे नियोजन सुरु होते. ही पायरी सर्वात महत्त्वाची कारण घर बांधताना कित्येक गोष्टी एकमेकावर अवलं बून असतात. जसजसे http://yasakhyannoya.blogspot.in/

19


बांधकाम पुढे जाते, तसतसे हे परस्परावलं बन जास्त गुंतागुंतीचे आणि किचकट होते. अर्थातच रिचर्डचा अनुभव यावेळी फ़ार उपयुक्त ठरतो. घर बांधून पूर्ण होत जाते तसा तो अनुभव फ़ार सुखद असतो. आनं दाचा असतो, घर पूर्ण होतानाची प्रत्येक पायरी पहाताना मला लहान मुलासारखा आनं द होतो. मग मी त्या घराचे रोज फ़ोटो घेते आणि त्याचा संग्रह आमच्यासाठीच नव्हे तर या वास्तूच्या मालकांसाठीही एक आनं दाचा आणि आठवणीचा ठे वा होतो. घराची ही प्रगती पहाताना, त्यावर विचार करताना माझ्या मनात एक शब्द पुन: पुन: रुं जी घालतो. तो म्हणजे ‘विश्वास’...! आमच्या व्यवसायाची भरभराट होते आहे ती आमच्यातील आणि आमच्या ग्राहकांतील परस्पर विश्वासामुळे! आमच्या ग्राहकांचा सं तोष हाच आमचा आनं द ...! हे सांगताना मला अभिमान वाटतो. आमचा व्यवसाय वाढविण्याच्या 20

http://yasakhyannoya.blogspot.in/


दृष्टीने आमच्या अनेक योजना आहेत. जास्त मागणी असलेल्या क्षेत्रात आम्हाला जायचे आहे. एका रिअल इस्टेट कं पनीला त्यांचा बांधकाम विभाग सुरु करायचा आहे. त्यांनी आम्हाला विचारणा के ली. याचा मला नुसता आनं द झाला नाही तर मला आपण के लेल्या कष्टांचे चीज झाले असे वाटले आणि गर्वाने ऊर भरुन आला. अशा या घटनांमुळे या व्यवसायात आणखी उत्साहाने झेप घ्यावी अशी प्रेरणा वाटते. लोक मला विचारतात, “नं दा तू मूळची चार्टर्ड अकाउं टंट. भारतातून अमेरिके त आलीस आणि अर्थकारण करणार्‍या क्षेत्रात सॉफ़्टवेअरवर काम करु लागलीस. मग तू वॉल स्ट्रीटवर काम करु लागलीस आणि आता बांधकाम व्यवसायात पडलीस. या सगळ्यांचा एकमेकांशी काय सं बं ध?” याचा मी विचार करते तेव्हा मला वाटतं की शिक्षण आणि पदवीचाच वापर आपल्या आयुष्यात http://yasakhyannoya.blogspot.in/

21


करायला पाहिजे असे नाही. शिक्षण हे जगण्यासाठी के लेले साधन आहे. ते मनुष्याला यशस्वी जगायला तयार करते. शिक्षणातल्या अवघड विषयांचा अभ्यास करताना माणसाला कष्ट करण्याची, समर्पित बुद्धीने काम करण्याची, तपशीलांचा बारकाईने विचार करण्याची सवय लागते. शिक्षणामुळे जगण्यातली आव्हाने पेलायला ताकद मिळते. एका क्षेत्रातील कौशल्ये दसु र्‍ या क्षेत्रात सहजतेने वापरण्यासाठी लागणारी अनुभवाची शिदोरी शिक्षणामुळे सहज मिळते. दसु रा आणि थोड्या वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करायचा तर माझा पत्रिके वर आणि ग्रहांच्या परिणामावर विश्वास आहे. एका ज्योतिषाने मला सांगितले होते की मी बांधकामाच्या क्षेत्रात चमकणार आहे. त्यामुळे त्याला वाटले होते की मी बहुधा सिव्हिल इंजिनिअरिंगच्या किं वा आर्किटेक्चरच्या क्षेत्रातली 22

http://yasakhyannoya.blogspot.in/


पदवी घेईन. मी चार्टर्ड अकाउं टंटच्या कोर्सला गेले तेव्हा त्याला आश्चर्य वाटले. आता विचार करताना वाटते की रिअल इस्टेट आणि बांधकाम ही माझी ललाटरेषा असावी. नं तर रिचर्डशी भेट आणि त्याच्याशी विवाह यामुळे ती स्पष्ट झाली असावी. थोडक्यात माझं रिअल इस्टेट आणि बांधकाम क्षेत्र म्हणजे माझ्या दसु र्‍या लग्नाची कहाणी!...नं दा जोशी सिम्पसन, न्यू जर्सी.

http://www.waastu.com/

पूर्वप्रसिद्धी- इ-ग्रं थाली.अमेरिका दिवाळी विशेषांक २०१२ http://yasakhyannoya.blogspot.in/

23


;k Vksih[kkyh nMya; dk;\ एका महाविद्यालयात अध्यापन करीत असताना एक शिक्षिका आणि एक आई यातला तोल साधणं कसं वाटलं याबद्दल सांगते आहे आपली सखी श्रेया महाजन. ‘सामना’ चित्रपटात होतं हे गीत.... ‘कु णीतरी अशी पटापट गं मत आम्हा सांगील काय, या टोपीखाली दडलं य काय?’ सोपी कोडी घालत मुलांचं मनोरंजन व्हावं असं हे गीत...प्रत्यक्ष आयुष्य पण असं च नाहीये का? कु णाचाही सं सार वरवरुन पहाताना असं वाटतं .... याच्या वा हिच्यासारखं आयुष्य असतं माझं , तर काय? जगणं किती सोप्पं होतं . परंतु प्रत्येकाच्या आयुष्यातली आह्वानं ही ज्याची त्यानं च पेलावी. सुं दर आणि सोप्या दिसणार्‍या या मुलाम्याच्या खाली किती कष्ट दडलेत ते ज्याचं त्यालाच ठाऊक. 24

http://yasakhyannoya.blogspot.in/


घर सांभाळणार्‍या स्त्रियांना नेहमीच वाटतं पर्स फ़लकारत बाहेर पडणारी बाई अधिक स्वतं त्र आहे, उत्तम आयुष्य जगते. तर नोकरी करणार्‍या अनेक स्त्रियांना वाटतं घरातली मं डळी बाहेर पडल्यावर निवांत चार क्षण घरी घालवणं हे किती सोयीचं असेल. सुदैवाने एकाच जन्मी मी ह्या दोन्ही अवस्था अनुभवल्या. आनं द देखील घेतला. मनापासून कबूल करते घर आणि नोकरी हे सांभाळणं तसं अवघड नाही. पण घर+मुलं+नोकरी हे अवघड आहे. विशेषत: दोन्हीकडे दर्जाबाबत तडजोड करायला तुम्ही तयार नसलात तर ‘सुपरमॉम’ होण्याच्या नादात आपण आजारी पडू शकतो हे कधीच विसरता कामा नये. आता आठवलं तरी गम्मत वाटते, पण मी आई व्हायला हवी असा निर्णय आम्ही तेव्हाच घेतला जेव्हा आम्ही दोघे आमच्या नोकर्‍यांमध्ये चांगले स्थिरस्थावर http://yasakhyannoya.blogspot.in/

25


झालो होतो. शिकवणं माझ्या चांगलं अंगवळणी पडलं होतं . तिथल्या वातावरणाची सवय झाली होती. एका अर्थी घर आणि नोकरी दोन्ही बाबतीत स्थैर्य आलं होतं . त्यामुळे युद्धपातळीवर काम करणं आता गरजेचं नव्हतं . मी थोडी उसं त घेऊ शकत होते. सुदैवाने बाळाला सांभाळणारं एक खूप सुसंस्कृ त कु टुंब होतं . ज्यांच्या जीवावर त्याला सोडू न मी जाऊ शकत होते. धावपळ झाली तरी कौतुकाचं कमळू छान मोठं होत होतं . फ़क्त बोर्डाच्या परीक्षा आणि पेपर करेक्शन आलं की माझ्या छातीत धस्स होत असे. सकाळी १० वाजता रिपोर्टिंग ....पार कासारवडवली ते ग्रॅं ट रोड हा प्रवास म्हणजे ८.३० ला बाहेर पडायचं . ते सगळं काम अतिशय तणावाखाली करायचं . दपु ारी चाराला परत यायचं आणि प्रचं ड उन्हाळा. मग येऊ घातलेलं पेपर करेक्शन आणि दहा एक दिवस अविश्रांत काम. दरऑक्टोबर26

http://yasakhyannoya.blogspot.in/


मार्चमध्ये एक तरी वारी बोर्ड ऑफ़िसला व्हायचीच. कं टाळले होते मी त्याला…! त्यावेळी मात्र वाटायचं कोणीतरी मदत करा रे...मला वेड लागेल लवकरच. शिकवणं आवडतं पण ही मात्र शिक्षा आहे. असं स्मशानवैराग्य येऊ लागलं की समजावं आता सुटीवर जायची वेळ आलीये. आता मात्र ही धावपळ नाहीये. पण प्रत्येक मार्च महिन्यात कु ठे ही असले तरी हे दिवस काही विसरता येत नाहीत.....श्रेया श्रीधर महाजन, ठाणे.

http://yasakhyannoya.blogspot.in/

27


;s ?kj cgksr glhu gSA आपली कलाकार सखी अमृता देशपांडे सध्या गृहिणीपद अनुभवते आहे. अनेकदा आई आणि बाबा असे दोन्ही काम तिला करावे लागतेय. वेळोवेळी कणखर आणि मृदु अशा दोन्ही मनोवस्था तिला अनुभवाव्या लागतात. त्याबद्दलचे तिचे मनोगत...! माझे नाव अमृता देशपांडे.फार मोठ्या पोस्टवर काम करते मी. आणि मी ज्या पोस्टवर आहे त्याचा मला सार्थ अभिमान आहे. I am manager of my own house. सोप्या भाषेत सांगायचे तर गृहिणी. आता तसे इतरांच्या दृष्टीकोनातून पाहायला गेले तर तसा दर्ल ु क्षित जॉब आहे.पण मी मात्र स्वेच्छेने स्वीकारलेला.माझा नवरा माझी मुले आणि मी असे आमचे चौकोनी कु टुंब.इच्छा असूनही सासू सासरे यांचा सहवास, त्यांचे मार्गदर्शन मला लाभले नाही 28

http://yasakhyannoya.blogspot.in/


आणि या बाबतीत मी स्वतःला कमनशिबी समजते. त्यांना आमच्या लग्नाआधीच देवाज्ञा झाली. माझा आणि माझ्या नवर्याचा प्रेमविवाह. त्याचा जॉब पण तसे पहिले तर आम्हाला प्रतिकू ल. तो मर्चंट नेव्हीत आहे. म्हणजे ४ महिने बाहेर. प्रतिकू ल अशासाठी की तो गेल्यावर माझी मुले आणि मी एवढेच घरी. पण मला मात्र त्याच्या जॉबबद्दल काहीच objection नाही. अर्थात मला तारेवरची कसरत करावी लागते. तो नसताना सगळे एकटीने manage करावे लागते हे तर आहेच.पण मी हे एन्जॉय करते. माझे शालेय शिक्षण हुजुरपागेत झाले. मी लहानपणी बालनाट्यात कामे के ली आहेत.नववीत असताना सई परांजपे यांच्या दिशा या हिंदी चित्रपटात ओम पुरी शबाना आझमी नाना पाटेकर यांच्यासह काम करण्याची मला सं धी मिळाली. कॉलेज मध्ये असताना सई परांजपे http://yasakhyannoya.blogspot.in/

29


यांच्याच ‘बहना’ या सिरिअल मध्ये काम के ले. मद्रासचे कॅ मेरामन श्री. मधु आंबट आणि नाना पाटेकर यांनी माझ्याबरोबर काम करण्याची इच्छा व्यक्त के ली होती पण मी खूप लहान होते. शाळे त असताना मी खो खो पटू होते.स्टेट लेवलवर मी खूप सामने खेळले आहे. कॅप्टन पदही भूषवले आहे.लोकनृत्यात देखील सहभागी असायचे. शाळे त असताना वक्तृत्व स्पर्धांमध्ये पहिला नं बर कधीच सोडला नाही.....मला गाण्याची पण अतिशय आवड आहे....गाणी ऐकण्यापेक्षा म्हणायला जास्त आवडतात...आवाज पण तसा बरा आहे.... आमच्या फे सबुक वरच्या ग्रुपमधील काही हौशी कलाकारांनी सं गीत रजनी हा कार्यक्रम के ला होता.... त्यात मी ३-४ गाणी गायले होते आणि सूत्र सं चालन पण के ले होते आत्ता माझी मोठी मुलगी १० वर्षांची आणि मुलगा 30

http://yasakhyannoya.blogspot.in/


६ वर्षांचा आहे. त्यांचा अभ्यास त्यांच्या इतर activities याकडे मी जातीने लक्ष देते. दोघेही; खास करून माझी मुलगी अतिशय हुशार आहे.ज्यात भाग घेईल त्यात तिला बक्षीस असतेच आणि सगळे करायचे असते तिला. मुलगा अजून लहान आहे पण फार चं ट. मस्त धावपळ होते. पण यातूनही स्वतःसाठी वेळ काढतेच मी. मुले शाळे त गेली की मी जिमला जाते.रोज किमान १ तासभर तरी व्यायाम करावा अगदी कितीही धावपळ असली तरी. माझे friend circle पण खूप मोठे आहे.फे सबुकवर आमचा सं वाद नावाचा एक ग्रुप आहे.आणि वर्षातून एकदा आम्ही सगळे काही पैसे जमवून गरजू संस्थाना वस्तुरूपाने मदत करतो. एकटी राहत असल्यामुळे काही बरे वाईट अनुभव नक्कीच आले आहेत पण मी अज्जिबात रडू बाई नाही ं http://yasakhyannoya.blogspot.in/

31


आणि पाहिजे तिथे फटकळ पण आहे. त्यामुळे या सगळ्याला तोडं देणे मला चांगले जमते. नवरा अतिशय चांगला आहे माझा.आम्ही दोघे बालमित्र. प्रेमविवाह असला तरी घरच्यांच्या सं मतीनेच लग्न झाले. परस्परांवर आमचा विश्वास आहे. माझा धाकटा मुलगा झाला तेव्हा अतिशय वीक होता.घरी करणारे कु णी नाही.ं पण माझ्या पतीच्या खं बीरपणामुळे या परिस्थितून तरून गेलो. मला सांगायला आवडेल की कु ठल्याही परिस्थितीत डगमगून जाऊ नका. आणि समाधानी राहा. द:ु खात आणि सुखातही देवाचे स्मरण ठे वा. तो कायम आपल्या पाठीशी असतो.---अमृता देशपांडे.

32

http://yasakhyannoya.blogspot.in/


ftFks jkcrh gkr rsFks gjh लवचिकता हा स्त्रीचा एक मोठा गुणधर्म आहे. आपल्या सं साराला सांभाळताना जसे जमेल तसे नोकरी, व्यवसाय करणारी आपली उच्चशिक्षित सखी अनिता वाघ आत्मविश्वासाने सांगतेय तिची कहाणी..! आपण लहान असतो तेव्हा प्रत्येकजण विचारत असतो तुला मोठे पणी कोण व्हायचं य. दर वेळेस आपली उत्तरं बदलत असतात. लहानपणी मी गावी गेले की माझे मामा, आजी मला गूळ शेंगदाण्यांचं अमिष देऊन पाढे आणि कविता म्हणायला लावत. मी ते खूप छान म्हणुन दाखवत असे. त्यांना खात्रीच होती की मी मोठे पणी शिक्षिकाच होणार आहे. लहाणपणी चित्रपट बघतांना आता पुढे काय होणार ते मी अगदी अचूक सांगत असे. माझा मामा आईला नेहमी सांगायचा बघ तुझी लेक मोठे पणी लेखिका http://yasakhyannoya.blogspot.in/

33


होईल. पण मी सर्वांना खोटं ठरवत एक सं गणक इंजिनिअर झाले. नोकरीला लागले. लग्नाच्या आधी मज्जाच मज्जा होती. सकाळी आरामात उठायचं , स्वत:चं आवरायचं की झालं . तोवर आई डबा हातात द्यायची; इतकं च नाही तर मला भरवायची देखील. घरासमोरच बसस्टॉप होता. बस पकडायची नी ऑफिस समोर उतरायचं . सोपं आणि सरळ. नोकरीला सहा महिने झाले आणि लग्न ठरलं . मग तारेवरची कसरत सुरु झाली. माझं सासर नाल्यासोपार्‍ याला, ऑफिस कु र्ल्याला. त्यामुळे ट्रेननी प्रवास करावा लागणार होता, आयुष्यात पहिल्यांदाच ...! ७. ३८ ची लेडिज स्पेशल पकडावी लागणार होती. त्यामुळे ७.१५ ला घरातून निघावं लागणार होतं . घरात सहा माणसं ...! सासू- सासरे, नंणद, दीर आणि आम्ही दोघं . आम्ही दोघं डबा घेऊन जायचो. त्यामुळे सकाळी ५ वाजता 34

http://yasakhyannoya.blogspot.in/


उठू न स्वत:चं आवरुन स्वं यपाकघरात शिरायचे. सगळ्यांचं चहा पाणी,स्वयं पाक करून मी निघत असे. मला स्वत:ला ना चहा प्यायला वेळ ना कधी न्याहारीला...! ऑफिसमध्ये गेल्यावरच माझा चहापानाचा कार्यक्रम असायचा. माझा प्रोग्रॅ मरचा जॉब असल्यामुळे घरी येण्याची वेळ ठरलेली नसे. परिणामी संध्याकाळच्या स्वयं पाकात माझी अगदीच मदत नसे होत..! रात्री सगळ्यांची जेवणे होऊन मागचे आवरेपर्यंत काट्यावर काटा येई. इतकी धडपड करूनही कु णालाच्याच जीवाला शांतता नव्हती. मग एके दिवशी तडकाफडकी मी राजीनामा देऊन मोकळी झाले. महिन्याभरात नवर्‍ यासोबत सल्लामसलत करून चार बायकांना सोबत घेऊन मी हार्नेसिंगचा व्यवसाय सुरु के ला. तेव्हा सकाळचं सगळं आवरुन मी माझा व्यवसाय फु लवु लागले. पण व्यवसाय सुरु करून http://yasakhyannoya.blogspot.in/

35


सहा महिने झाले आणि मी आई होणार असल्याची बातमी कळली. तरीही एक महिना तो व्यवसाय मी सांभाळतच होते. पण मला त्रास सुरु झाला आणि डॉक्टरांनी मला पूर्णपणे विश्रांतीचा सल्ला दिला आणि मध्येच मला माझा व्यवसाय बं द करावा लागला. त्या व्यवसायात मला कु ठलं ही नुकसान झालं नाही. माझ्या मुलाचा जन्म झाला आणि मी एक वर्षाचा ब्रेक घेतला. मुलगा ८ महिन्याचा झाल्यानं तर मी पुन्हा घरबसल्या व्यवसायाबाबत विचार करू लागले आणि मला आयतीच सं धी चालून आली. इन्शुरन्स कं पन्यांसाठी मराठी ते इंग्लिश भांषातं राचं काम सुरु के लं . मुलाकडे लक्ष ठे वून ते काम मी आरामात करू शकत होते. ते काम मी सात वर्ष के लं . पुन्हा मुलीच्या वेळी मला बेडरेस्ट आल्यामुळे ते काम बं द कराव लागलं . मुलगी अ‍डीच वर्षांची झाली 36

http://yasakhyannoya.blogspot.in/


आणि ती शाळे त जाऊ लागली तशी अजून एक सं धी माझ्यापुढे चालून आली. आमचे एक फॅ मिली फ्रें ड ज्यांना माहिती होत की मी पूर्वी मराठी ते इंग्रजी भांषातराचं काम करत होते त्यांनी मला विचारलं की एका टिव्ही चॅ नलसाठी इंग्रजी ते मराठी भाषांतराचं काम करशील काय ? मी सुरुवातीला नकार दिला पण त्यांनी आणि नवर्‍याने प्रोत्साहन दिलं आणि मी ते काम करायला सुरुवात के ली. मी लिहिलेली स्क्रिप्ट डायरेक्ट चॅ नेलकडे न जाता प्रथम दर्जा तपासणी (QC)होणार होती. त्यावेळी सुप्रसिध्द निवेदक प्रदीप भिडे हे reviewer होते. त्यांनी माझ्या स्क्रिप्ट वर ‘गुड ट्रान्सलेशन’ असा शेरा दिला आणि माझा आत्मविश्वास वाढला. हे काम डेडलाईनचं असल्यामुळे मला रात्रभर जागून पुर्ण करून द्यावं लागे. सकाळी मुलांचे डबे तयार करण्यासाठी लवकर उठायला लागायचं . पण मी हे सगळं खूप एन्जॉय करत http://yasakhyannoya.blogspot.in/

37


असे. हे काम मी साधारणपणे तीन साडेतीन वर्ष के लं . मुलगी दसु रीत गेल्यावर मला मात्र तिच्याकडे लक्ष देण्याची जास्त गरज वाटू लागली आणि मी ते काम बं द के लं . आता एका गृहिणीचं काम करतेय. त्यातही मला खूप मजा येतेय. ...अनिता वाघ.

38

http://yasakhyannoya.blogspot.in/


dgk.kh ,dk piysph मुलांना बूट, चप्पल वापरायला, शूलेस बांधायला शिकवणं हे प्रत्येक आईबापांना करावं लागतं , त्यांना एखादी गोष्ट येईपर्यंत परत परत करवून घ्यावं लागतं परंतु हेच जर आव्हानात्मक असेल तर...?आपल्या मुलाचं मोठं होणं सांगते आहे आपली सखी अंबिका टाकळकर एका छोट्याशा गोष्टीतून...! श्रीहरी टाकळकर ….! वय साधारण एक वर्षं, स्थळ दादर एका डॉक्टरचा दवाखाना ( नाव मुदाम नाही लिहित आहे ) डॉक्टरांनी तपासलं आणि सांगितलं की हा काही आयुष्यात चालू शकणार नाही . जीवनभर तुम्हाला असेच त्याला उचलून सगळ करावे लागेल . पेशंट सी.पी. (सेन्सरी प्रॉब्लेम) आहे . आयुष्यभर बसून राहील. जास्तीत जास्त तुम्ही त्याला मोठं झाल्यावर व्हीलचेअर वापरू शकता . http://yasakhyannoya.blogspot.in/

39


प्रयत्न चालूच होते आधी पासूनपण मग सुरु झाली पराकाष्ठा .... आणि ..वय जवळपास दोन वर्ष ,एक एक पाउल टाकणारा श्रीहरी , प्रत्येक आई बाबांसारखं आनं दाने पिचिक पिचिक वाजणारे बूट दिमाखात आणले आणि घातले आणि पाऊल टाकायला लागला तर पिचिक पिचिक आवाज ऐकू न आणि वर लागणारा लाईट बघून सेन्सरी प्रॉब्लेम मूळ चीर चीर चिरकत काढू न टाकायला लावणारा श्री….! हळू हळू त्याची ती भीती घालवत , कधी साधी सॅन्डल्स तर कधी वाजणारी सॅ न्डल्स असे सुरु झाले आणि हळू हळू का होईना त्याची भीती कमी झाली. पण ह्या सर्वाना जवळपास सहा एक महिने गेले असतील . मग सवयीने सॅ न्डल्स ठे वायला लागणारा श्री.......! 40

http://yasakhyannoya.blogspot.in/


शाळे तल्या स्नेहसं मेलनामध्ये महाराष्ट्रीयन ड्रेस (धोतर , कु डता ,जाके ट, डोक्यावर टोपी आणि पायात कोल्हापुरी चप्पल ) अशी वेशभूषा सांगितलेली ... बाकीचं सर्व तर घालून तर घेतलं पण कोल्हापुरी चप्पल अंगठा आणि बोटामध्ये पकडता कु ठे येते त्यामुळे भांबावणारा अवघा तीन वर्षाचा श्रीहरी ......!! मग टीचरच्या सल्ल्याने आणि मदतीने त्या कोल्हापुरी चप्पलला मागून इलॅ स्टिक लावले आणि आठवडाभर आधी पासून रोज थोडा थोडा वेळ वाढवत जाऊन त्याला के लेला सरावामुळे कसा तरी पायात कोल्हापुरी घालून पहिल्यांदा टीचरचा हात हातात घेवून स्टेज वर जाणारा श्रीहरी .... शाळे त शूज आणि सॉक्स जबरदस्तीने घालून http://yasakhyannoya.blogspot.in/

41


जाणारा श्रीहरी, आणि घरी येताच क्षणी काढू न फे कू न देणारा श्रीहरी .... मग ADL ( ॲक्टिव्हिटी ऑफ डेली लिव्हिंग ) मध्ये काही वर्षांनी का होईना स्वतं त्रपणे वेलक्रोची सॅ न्डल्स घालायला शिकला आणि आता प्रत्येक ठिकाणी गेल्यानं तर किं वा निघताना आमचे वाकणे बं द झाले ..... वय वर्ष दहा ,पटकन कु ठे जाताना सॅ न्डल्स पेक्षा चप्पल बरी पडते . पण अजूनही अंगठा आणि बाकीच्या बोटामध्ये चपलेचा अंगठा कसा पकडायाचा शिवाय झालीय न एका गोष्टीची सवय मग कशाला पाहिजे अजून सतराशे साठ भानगडी असा विरोधी विचार करणारा श्रीहरी ....! एक सारख्या लागून तीन दिवस सुट्ट्या येणार होत्या ... चपलेच्या दक ु ानात गेले , दक ु ानदारास म्हंटलं साधी पन्नास साठ रुपया पर्यंतची चप्पल द्या ..दक ु ानदाराची 42

http://yasakhyannoya.blogspot.in/


नजरेत सं मिश्र भाव , बाई तर सधन घराण्यातली दिसते आहे , तरी पण मुलगा (त्याच्या स्वतःच्या मतीनुसार ) मतिमं द म्हणून पन्नास , साठ रुपयावर भागवते आहे ... शेवटी त्याला जाता जाता सांगितले की चार दिवसांनी येते तीनशे-चारशेची चप्पल घ्यायला , तो अवाक , हिला कसं मनातलं समजलं .... तीन दिवस फक्त मिशन चप्पल, आधी घरात मग खाली सोसायटी मध्ये आणि नं तर स्कू टीवर, चौथ्या दिवशी त्याच दक ु ानात हजर, दक ु ानदार पुन्हा अवाक ..... औरंगाबादला स्थलांतरित झाल्यानं तर येथल्या शाळे त शूजची सक्ती नसल्यामुळे आणि आम्ही पण कं टाळा के ल्यामुळे कायमची शूजची सवय बं द झाली . नं तर ‘आरंभ’ मध्ये पण मी शूज ची सक्ती ठे वली नाही कारण सुरवातीस जागा http://yasakhyannoya.blogspot.in/

43


लहान आणि मुलं पण खूप लहान म्हणजे काही जणांना शू –शीचं पण भान नसे म्हणून ... वय वर्षं १४ , नाल्स ट्रेकीग कं पनी वर्षातून एकदा सगळ्या प्रकरच्या विशेष मुलांसाठी भारतात दोन ठिकाणी ट्रेक आयोजित करते . एक मनाली आणि दसु र कोइमूतुर . सर्व बाबीचं ा विचार करून मनाली येथे ५ दिवसाचा ट्रेकला जायच नियोजित के लं . आणि सुरु झाली नवीन लढाई पुन्हा शूज आणि सॉक्सची , ते पण खरेदीपासून मग तो काय आणि आम्ही काय हार थोडाच मानणार .... रोज थोडा वेळ घरात घालून काही सेकंदात काढू न फे कू न देत असे पण आम्ही पण त्याचे आई बाप ... ! असे करत करत काल ट्रेकचे शूज घालून ग्राउं ड वर दहा राउं ड मारून या.. हु म्हणून विजयी गडगडाटी हास्य करणारा श्रीहरी .....! वरच्या प्रत्येक वेळी, प्रत्येक प्रसं गानं तर, 44

http://yasakhyannoya.blogspot.in/


प्रत्येक प्रयत्नानं तर , प्रत्येक यशस्वी आणि अयशस्वी प्रसं गानं तर आमच्या दोघांच्याही डोळ्यात फक्त अश्रू आणि अश्रू .... पण वेगवेगळ्या कारणासाठी .... आणि मनात एकाच भावना ........ प्रयत्न नक्कीच यश देतात कधी लवकर तर कधी उशिरा ..... तुम्हा सर्वाच्या आयुष्यात मुलांना वाढवताना ह्या सर्व स्टेज कधी आल्या आणि कधी गेल्या त्या कळल्या पण नसतील ..पण आमच्या सारख्या विशेष मुलांच्या पालकांना मात्र प्रत्येक टप्यावर तावून सलाखून बाहेर पडावेच लागते ....गोष्ट किती साधी सोपी पायात घालणाऱ्या सध्याचप्पल , सॅ न्डल्स आणि शूजची पण प्रत्येकासाठी किती वेगळी .... शेवटी इतकं च म्हणेन ये जिंदगी कितना भी सताले, मुश्कीलें दे दे ,,.. लेकीन जिंदगी , जिंदगी जिने का होसला तू ही तो देती है.................... http://yasakhyannoya.blogspot.in/

45


vlk/; rs lk/;] dfjrk lk;kl दधु ाची लाईन टाकण्यापासून समाजसेवेपर्यंत वेगवेगळी कामे आपल्या तीन लेकरांना सांभाळू न करणार्‍या मं गला भोईर यांच्या सं घर्षाची कहाणी त्यांच्या शब्दात...! सामाजिक हेतूने समाजात विषमता कमी व्हावी म्हणून माझा आंतरजातीय विवाह ठरवून झाला . लग्न झाले तेंव्हा मी कॉलेजच्या प्रथम वर्षात होते .पत्नी, एका मुलाची आई ,मोठी सून भूमिका बजावत मी बी.एस.सी झाले. घरात तीन सासवा ,सासरे ,तीन दीर,तीन नणं दा असे १२ जणांचे कु टुंब ,जमीन सारवणे, चुलीवर जेवण बनवणे ,धुणी ,भांडी ,के र काढणे सर्व कामे अंगावर आली अन सोबत सासरवास व नणं दवास! भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी असले टोमणे चालत . मी एकटीने मांसाहार घ्यायचा नाही. मी दूध /दही/फळे चांगले खाण्यास पाबं दी असे 46

http://yasakhyannoya.blogspot.in/


अनेक प्रकार होते . चोविशीत ३ मुलांची आईही झाले . शारीरिक व मानसिक तणावाने २६ व्या वर्षी संधिवात अंबिका टाकळकर. झाला . ज्या वस्तीत राहत होते तेथे स्त्री-पुरुष दारू पिण्याचे प्रमाण व अनेक रोगांचे प्रमाण खूपच होते . तेथे काहीतरी कार्य करायला हवे असे वाटू लागले . एका प्रसं गातून मला वस्तीत सामाजिक कार्य करण्याची उर्मी आली . पतिने साथ दिली परंतु घरच्यांचा विरोध पत्करून काम करीत राहिले . स्वतःचे दख ु विसरून इतरांच्या दख ु ावर फ़ुं कर घालण्यात आनं द मिळू लागला . काम सुरु करताना अनं त अडचणी व लोकांची टीका सहन करावी लागली . सं स्कार वर्ग, आरोग्य तपासणी , प्रौढ शिक्षा वर्ग ,महिला बचत गट असे काम वाढवीत सर्वांगीण विकासाची योजना आखली . अस्पृश्यतेविरुद्धही लढा द्यावा लागला . बं डखोर होत गेले. विश्व हिंदू परिषदेचे कामही मी करीत http://yasakhyannoya.blogspot.in/

47


होते ,तेथील कार्यकर्त्या वस्तीतील कामात मदत करू लागल्या . पैसा न कमावता लष्कराच्या भाकऱ्या भाजते म्हणून कोणीही माझ्या मुलांना सांभाळत नसत, मी तिघांना बरोबर घेवून काम करी . पती खूपच कमी पैसे घेवून दवाखाना चालवीत,त्यात घरातील खर्च भागणे कठीण झाले. घरात खाणारी तोडं े वाढली होती . तेंव्हा मी नोकरी न करता घर सांभाळू न व्यवसाय करण्याचे ठरवले . सुरुवातीस पोह्याचे पापड व मिरगुंड के ली ,त्यातून वस्तीतील महिलांस रोजगार मिळाला . व्यवसायाची परवानगी , अन्न व औषध खात्याची परवानगी ,सासऱ्यांकडू न जागा मिळवून त्या साठी एन. ओ. सी. ,मिठवणी करण्यापासून पापडाचे पीठ मोजून देणे ,के लेला माल तपासणे , बनलेला माल विकण्यासाठी ऑर्डर आणणे सारेच करावे लागले . इतके सगळे करून वस्तीतील काम करणाऱ्या 48

http://yasakhyannoya.blogspot.in/


काही बायका पीठाचे गोळे चोरत ,मुलांना बरोबर आणून लाट्या खात . सांगूनही सुधारणा झाली नाही तेंव्हा हा व्यवसाय बं द के ला . कपड्यांचे दक ु ान सुरु के ले परंतु ते आणण्यासाठीचा खर्च व त्यावरील कर फायदा देईना. शेवटी माझ्या भावाचा दूध व्यवसाय होता त्याची लाईन कोकणात सुरु के ली व दूध व्यवसाय यशस्वीपणे के ला . त्यात वस्तीतील मुलांना काम दिले . दधु ाचा व्यवसाय म्हणजे खूप कठीण पण अनुभवातून तयार झाले . या व्यवसायासोबत अजून एक वर्क शॉप सुरु के ले. शेड बांधण्याची परवानगी सासर्‍यांनी दिली . हिर्‍यांना पैलू पाडताना ज्या पिन्स मध्ये अडकवले जाते त्यांना कोलेट म्हणतात . त्या कोलेटस ् बनविण्याची ३ स्लिटिंग मशिन भावाच्या ओळखीतून मिळाल्या . त्या मशिनवर काम कसे करायचे व ते मशीन कसे दरु​ु स्त करायचे हे मी http://yasakhyannoya.blogspot.in/

49


शिकले व वस्तीतील ६ मुला मुलीना हे काम शिकवून दोन पाळ्या लावून रोजगार दिला . हा माल मुं बईस नेवून मी द्यायचे व कच्चा माल घेवून यायचे . गावात लाईट सारखी जायची . खूप तारांबळ उडायची. पण हा कारखाना १० वर्ष यशस्वीपणे चालला. घर,व्यवसाय व सामाजिक कार्य एकाच वेळी तिन्ही आघाड्या सांभाळताना खूप ओढाताण व्हायची. आदिवासी पाड्यात फिरताना सुरवातीस सायकल,नं तर ल्युना व नं तर कायनेटिक दूचाकीने माझे भ्रमण असे. अधून मधून सांधेदख ु ी डोके वर काढायची . हातात पैसे येऊ लागल्यावर घरात कामाला बायका ठे वल्या . मी जेवण बनवणे ,मुलांचा अभ्यास, शाळा , घरातील रिती भाती सांभाळत सण उत्सव ,व्यवसाय ,सामाजिक कार्य यात वेळ देवू लागले . घरातून प्रचं ड विरोध होता परंतु त्यांच्याशी कधी 50

http://yasakhyannoya.blogspot.in/


समजावून, कधी रागावून, धीट होत काम करीत राहिले . या बाबत पतीची साथ म्हणजे तू तुझे काय ते बघ असे होते . वस्तीत सतत भांडणे व पोलीस स्टेशन गाठत . त्यांच्या समस्या मी सोडवू लागले . सामाजिक प्रबोधन सुरु ठे वले . लोक जागृत झाले तर आपले कसे होईल याची सावकाराला भीती वाटू लागली ते कु टुंब सदैव अडथळे आणू लागले . मी ब्राह्मण म्हणून लोकांच्या मनात द्वेषाचे विष पेरू लागले पण उपयोग झाला नाही . वस्तीत रजिस्टर मं डळ स्थापन के ले व त्यातून सर्वांगीण विकासाच्या योजना राबवल्या . या सर्व कामात मला मुलांची साथ मिळाली . २ मुले वस्तीत शाखा घेत व मुलगी समितीची शाखा घेई . ४५ व्या वर्षी माझे संधिवाताचे दख ु णे खूपच वाढले त्यातच २ ऑपरेशन झाली . त्या नं तर मी सामाजिक कार्य व व्यवसाय थांबवून गावातून पुण्यात येवून http://yasakhyannoya.blogspot.in/

51


स्थाईक झाले . सामाजिक कार्य करण्यास पुढची फळी तयार होती त्यामुळे ते सुरु राहिले . पुण्यात येवून प्रकृ ती सुधारल्यावर मुलांच्या जोडीने पुन्हा अभ्यास सुरु के ला law चे प्रथम वर्ष पास झाले ,नर्सरी गार्डनिंगचा कोर्स के ला, AMFI व IRDA परीक्षा पास झाले. अनं त अडचणी आल्या. पतीचे डोळ्यांचे ऑपरेशन,सासूबाईंचे आजारपण इत्यादी , गाव ते पुणे ते गाव फे ऱ्या सुरु असत . सासरच्या सर्व जबाबदार्‍या पार पडल्या व नं तर मुलांच्याही . मुलांचे शिक्षण पूर्ण झाले. मोठा CA ,धाकटा मर्चंट नेव्ही ऑफिसर व मुलगी BA / Tourism . त्यानं तर त्यांचे विवाह होवून दोन्ही मुले परदेशात व मुलगी पुण्यात असते . तीन नातवं डांची आज्जी झाले . ५ वर्षांपूर्वी घरातच मी पडले व spinal कॉर्डला धक्का बसून स्ट्रक्चर चेंज झाले . पाचव्या मजल्यावरील लिफ्ट नसलेले घर त्यामुळे २ वर्ष जगाशी 52

http://yasakhyannoya.blogspot.in/


सं पर्क तुटला . या काळात घरी बसून कॉम्प्युटर शिकले. बागेतील फु लांच्या रचना व त्यांचे फोटो काढू लागले, फे सबूक वर पोस्ट करू लागले . एकांताचा फायदा झाला चिंतन-मनन झाले . कधीही चार ओळी न लिहिलेली लिहू लागले . छं दात इतकी रमले मी बरी कधी झाले हे माझे मलाच कळले नाही . घर ,व्यवसाय व सामाजिक कार्य करतानाही देश -परदेश पहिले. झोपडपट्टीपासून परदेशात लेकाकडे राहण्याचा अनुभव मिळाला . एकाच जन्मात सात जन्म मिळाले असे वाटले . सुख-दःु खाचे पारडे सम-समान झाले . घर ,व्यवसाय व सामाजिक कार्य अशी तिहेरी तारेवरील कसरत ,गेली मजला समृद्ध व समाधानी करत ! मं गला भोईर. http://yasakhyannoya.blogspot.in/

53


vkryk vkokt एका आर्ट स्टुटिओमध्ये क्रिएटिव्ह सपोर्ट देण्याचे काम करणारी आपली सखी तृप्ती माळिचकर. गृहिणीपासून वर्किंग मॉम पर्यंतचा तिचा मनोज्ञ प्रवास निवेदित करीत आहे. “Working Women” कानाला गोड वाटणारे शब्द...! Almost ह्या वाक्यासाठी आससून गेले होते मी,‘I am a working woman’. जेव्हा प्रत्यक्षात working woman झाले तेव्हा मात्र ‘तारेवरची कसरत’ हा शब्दप्रयोग अनुभवू लागले.तोपर्यंत आयुष्य अगदी सुखासीन गेले होते.पिल्लू लहान,त्यात तिला सतत असणारा सर्दी खोकल्याचा त्रास ह्याने दसु रे काही आपल्याला करता येऊ शकतं हा विश्वासच मुळात गेला होता.तिच्या दख ु ण्याकडे,जेवणाकडे,शाळे कडे, अभ्यासाकडे वेळ देऊनही नं तर भरपूर वेळ रिकामा राहू लागला.आई एकाच गावात असल्याने तो वेळ तिला 54

http://yasakhyannoya.blogspot.in/


देऊ लागले. एकत्र हिंडणे,शॉपिंग,नाटक,सिनेमा, साहित्य विषयक कार्यक्रम, काही नाही तर सखी मं च, भिशी, महिला मं डळ असे सगळे उद्योग सुरु होते. तरी ही वेळ उरत होताच. ह्या Time ची मोठी गं मत आहे,जेव्हा आवडीचं काम असेल तर भराभर उडू न जातो नाहीतर अगदी मुं गीच्या पावलांनी रेंगाळत जातो. तरी ह्या Time killing मध्ये मी T.V. वरचे cookery shows follow करणे,almost २ तरी पुस्तके वाचणे. समग्र लेखक म्हणजे एखादा लेखक आवडला की त्याची सर्वच्या सर्व पब्लिश पुस्तके वाचून काढणे हे उद्योग सुरु के ले होते. कालांतराने हे सतत करणे कं टाळवाणे होऊ लागले.सोबतचे सगळे मित्र मैत्रिणी काहीतरी उद्योग वा जॉब करत आहेत आणि मी मात्र Mom@Home बनून नुसती घरी आहे हे डाचू लागल. अतिशय अस्वस्थ काळ. बरं काय करूया नक्की, हे हि decide होईना ,त्यात नुकतेच facehttp://yasakhyannoya.blogspot.in/

55


book सुरु झालेले,त्यात वेळ जायचा.कु णाच्या सुं दर पोस्ट,सुं दर लिखाण,कविता,फोटोग्राफी,वेगवेगळ् या passion पाहून मला वाटायचे,यार आपल्याला कोणतीच passion कशी नाही,कारण आवड असेल तर माणूस सवड काढतोच. स्वतःचा शोध घेणे सुरु झाले त्यात जास्तच depression यायला लागले. म्हणे माणसाचा जन्म हा एखाद्या कारणासाठी होतो आणि त्याच्याकडू न ते काम पूर्ण होण्यासाठी त्याला पूरक अशा प्रेरणाही होतात.पण राव,आपल्याला तर अशा कु ठल्याच प्रेरणा मिळत नव्हत्या. अशातच facebook friend असलेल्या जुजबी ओळखीतून एक ऑफर आली,Voice Overची. राहत्या शहरातच काम असल्याने आणि प्रत्यक्षात fb friendला ओळखत असल्याने,. गेले खरी आर्ट studioत,माईक टेस्टिंग झाले आणि माझा आवाज कॅ डबरी कं पनीच्या ‘ठाणे प्लांट च्या सुवर्ण जयं ती 56

http://yasakhyannoya.blogspot.in/


महोत्सव’ च्या “शॉर्ट फिल्म” मध्ये वापरला गेला. तोपर्यंत असे काही काम असते आणि ते चक्क आपल्याला जमू शकते ह्याचा सुखद धक्का बसला. voice over एवढचं काम न राहता त्या आर्ट स्टुडीओने ‘creative support’ म्हणून जॉईन होण्याची ऑफर दिली. हे म्हणजे दधु ात साखरच! पण आपण घरी नुक्लिअर फ्यामिलीवाले ,त्यामुळे फक्त पार्टटाइम काम करू शकतो हे जाणवलं ,नशिबाने ते accpet झाले. हुश्श, काम पार्टटाइम असले तरी १०:३० चे ऑफिस, २ पर्यंत काम असे स्वरूप,. मला तर ‘लई भारी’ वाटले. (जेंव्हा प्रत्यक्षात काम सुरु झाले तेंव्हा लईच भारी म्हणायची वेळ आली ती गोष्ट अलहिदा ) तेंव्हा वाटलं हे तर बेस हाय बुवा!,१० ते २ काम करायचं ,घरातली सगळी काम आटपून १० ला http://yasakhyannoya.blogspot.in/

57


निघायचे,१२ ला मस्त उन्हाच्या चांदण्यात परत पिल्लूला आणायला शाळे त यायचे,तिचे जेवण करून परत ऑफिस मग परत २/२:३० ला उन्हात घरी परत,नं तर जेवण,असा दिनक्रम सुरु झाला. थोडक्यात हेलपाटे सुरु झाले.४ व्हीलर चालवत होते पण २ व्हीलर येत नव्हती,बसायला जाम घाबरत होते पण ती जमली,Degradation झाले अर्थात! ४ व्हीलर वरून २ व्हीलर पण राव मज्जा यायला लागली,१० ते २ अशी शिफ्ट असली तरी जेव्हा फिल्मस् निमित्त शूटिंग असायचे तेव्हा पूर्ण दिवस द्यावा लागायचा. सकाळी ७ ला ऑफिसात टच व्हायला लागायचं ,मग पहाटे ५ ला उठू न सगळा स्वयं पाक,घर आवरणे,दोघांचा डबा ,लेकीची शाळे ची तयारी,बाकी स्वतःच आवरणे वगैरे धांदल होऊ लागली. सर्वात मोठा change म्हणजे आता पर्यंत,घरीच तर आहेस ना, तुला काय काम हा 58

http://yasakhyannoya.blogspot.in/


atitude नवऱ्याचा आणि लेकीचा पार बदलून गेला. शूटिंगहून किं वा एखादा event पूर्ण करून घरी आल्यावर जेवणाची पूर्ण तयारी टेबलावर पाहून धक्के बसले. लेक न सांगता स्वयं पूर्ण झाली. जेवण झाल्यावर नवरा खरकटी भांडी,ताटं आवरू लागला,धक्यावर धक्के ! लेकीचा अभ्यास चक्क माझ्या मदतीशिवाय पूर्ण होऊ लागला. मी नसले तरी बाबाला चहा करून द्यायला लागली. सर्वात जास्त त्रास झाला माझ्या आईला,कधीही फोन करावा आणि आदेश द्यावा की मी हजर होते अशी सवय असलेल्या तिला “आता ‘मी’ busy आहे” हे पचवणे जड गेले. ;) सखी मं च, महिला मं डळ बं द झाले,आपोआपच कु चाळक्या,गॉसिप बं द झाले. ‘काम’ आनं द देऊ लागले.त्यात नवीन नवीन गोष्टी,events चे,show चं music करणे, audio-visual बनवणे ,show flow कसा असेल, http://yasakhyannoya.blogspot.in/

59


एखादी short फिल्मची स्टार्ट,शेवट ,एक ना दोन अशा अनेक interesting गोष्टी शिकण्यात मजा येऊ लागली. ‘working woman’ म्हणवून घेतांना तिच्या काटेरी मुकुटाची जाणीव मात्र नक्कीच झाली. तृप्ती माळिचकर.

60

http://yasakhyannoya.blogspot.in/


fny gS NksVklk----! आपल्या ग्रुपवर नेहेमी भेटणारी आपली मैत्रीण योगिनी चौबळ सांगते आहे तिच्या त्या दिवसांबद्दल जेव्हा ती नोकरी आणि घर दोन्ही सांभाळत तारेवरची कसरत करीत होती. फे ब्रुवारी २००५ मी जेव्हा ICICI Prudential च्या कॉर्पोर�ेट एचआर ला जॉइन झाले तेव्हा मला आकाश ठें गणे वाटू लागले होते. दादरला प्रभादेवीला हेड ऑफिस होते. रोज सकाळी ठाण्यावरून CST फास्ट ट्रेन पकडायची दादरला उतरून बस किं वा कॅ ब पकडू न प्रभादेवी ला उतरायचे. बस एवढाच काय तो त्रास. कारण घरी आई असल्यामुळे सकाळच्या चहापासून ते डब्यापर्यंत सर्व काही हातात आयते मिळायचे. पुन्हा रात्री घरी आल्यावर दमून आल्यामुळे हातात चहा. नं तर रात्रीच्या जेवणाचे ताट वाढू न हातात http://yasakhyannoya.blogspot.in/

61


यायचे. तेव्हा ठाणे - दादर - प्रभादेवी आणि प्रभादेवी - दादर - ठाणे हा प्रवास करायचे म्हणजे मला वाटायचे मी खूपच मोठे दिव्य करत आहे. आणि कॉर्पोर�ेट मध्ये सतत काम असल्यामुळे मी फ़ारच बिझी झाले आहे असेच मला वाटायचे. परंतु नोव्हेंबर २००५ मध्ये माझ्या आईचे आकस्मिक निधन झाले आणि नोकरी सोबत घराची जबाबदारी सुद्धा माझ्यावर येवून पडली. माझे वृद्ध बाबा आणि भाऊ सोबत माझी स्वतःची जवाबदारी. सकाळी बाबा चहा करून ठे वायचे पण नं तर मी उठल्यावर स्वतःचे आवरणे , मग देवपूजा मग भाजी चपाती करून ते सर्व डब्यात भरून (आयत्या डब्याची सवय असल्यामुळे खूपच जड जात होते ) वेळेवर घरातून निघून नेहमीची ट्रेन पकडणे. संध्याकाळी घरी आल्यावर आईची जागा बाबांनी घेतली. ते चहा हातात 62

http://yasakhyannoya.blogspot.in/


द्यायचे. पण मग रात्रीच्या जेवणाची तयारी. अर्थात माझे बाबा मला मदत करायचे पण जिला आयते ताट वाढू न समोर यायचे तिच्यासाठी हे खूपच जड होते. वर आईच्या जाण्याची वेदनाही होतीच. त्यावेळी आमच्या घरी कामवाली बाईही नव्हती मग रात्रीची भांडी घासणे फारच कठीण वाटायचे. बहुतेक देवाला माझी अजून कठीण परीक्षा पहायची होती की काय आम्ही ठाण्यावरून विरारला शिफ्ट झालो आणि माझे ऑफिस प्रभादेवी वरून लोअर परेलला शिफ्ट झाले. विरार वरून फास्ट चर्चगेट पकडू न दादर ला उतरून मग ब्रिज चढू न दसु रर्‍या प्लॅ टफ़ॉर्मवर येणे आणि मग तिथून स्लो चर्चगेट पकडू न लोअर परेल ला उतरून परत १५ मिनिटे चालणे. आमचे ऑफिस ‘कमला मिल कम्पाऊंड’ला होते आणि स्टेशन पासून अंतर कमी असल्यामुळे टॅक्सीवाले येत नसत तेव्हा चालणे हाच पर्याय असायचा. http://yasakhyannoya.blogspot.in/

63


मी एवढी लाडात वाढली असल्याने आणि आईने मला खूपच आयतोबा के ला असल्यामुळे ती गेल्यावर मला घर आणि ऑफिस सांभाळणे खूपच कठीण गेले. माझे बाबा आणि भाऊ ह्यांनी मला खूपच मदत के ली त्यामुळे मी ३ वर्षे जॉब करू शकले. पुढे बाबांची होणारी ससेहोलपट पाहू शकत नसल्याने मी जॉब सोडला. जॉब सोडल्याबद्दल मला जर सुद्धा खं त नाही कारण मी माझ्या बाबांची सेवा करू शकले. रोज सकाळी गरम गरम न्याहरी आणि दोन्ही वेळेला त्यांना ताजे ताजे जेवण वाढू शकले. ह्यातच मला खूप आनं द वाटला. ....योगिनी चौबळ.

64

http://yasakhyannoya.blogspot.in/


ekr`fnukfufeRr fo'ks"k lkfgR; http://yasakhyannoya.blogspot.in/

65


vlkgh ,d fdLlk आज मदर्स डे..!माझ्या मुलीने आज तो साजरा करायचे ठरवले. तिची लहान दोन मुलं व आम्ही सगळे , असा, बाहेर जेवायचा बेत ठरला. माझा पाच वर्षाँचा नातू पटपट वेळेवर तयार होईना! उगाच गमजा करत वेळ घालवत होता. त्याची आई वैतागली. म्हणाली, `अरे आज तरी तू मला त्रास देऊ नकोस, आज तरी आईला आवडेल असे काहीतरी कर. आज मदर्स डे आहे न..!’ तर तो म्हणतोय, ‘मदर्स डे आहे ओके , मग ‘सन्स डे’ कधी येणार?’ मला तिचे लहानपण आठवले. तेव्हां तिच्या निरागस मनाला असेच काही-बाही प्रश्‍न पडत असत. त्याची योग्य ती उत्तरे, तिला समजेल अश्या पद्धतीने देणे, एक आव्हान असे. माझ्या मनात आज एक विचार आलाच, ‘बापसे बेटा..ना ना..माँ से बेटा सवाई..!’ -रजनी अरणकल्ले. 66

http://yasakhyannoya.blogspot.in/


xksM~;k ik.;kps >js तेव्ह.ां . आमचे चिमुकले समुद्र पाहु म्हणाले समुद्रावर नेले लाटांशी खेळले मोठी लाट आली पाणी नाकातोडं ात गेले आणी.. सर्वांना सांगु लागले “आम्ही अश्रुंच्या पाण्यात खेळलो” आता.. त्यांच्या हाती बरेचसे अवार्ड आहेत अन माझ्या डोळ्यात आनं दाश्रु जमलेत ते दोघे जवळ येतात म्हणतात.. “आई, हे तर गोड्या पाण्याचे झरे आहेत” ......रजनी अरणकल्ले

http://yasakhyannoya.blogspot.in/

67


ekxs oGwu igkrkuk आयुष्याच्या ह्या वळणावर मागे वळू न पाहताना ओसरलेल्या वयाच्या पाऊलखुणा अंधक ु होतात. आठवांच्या धुक्यात अन आसवांच्या प्रवाहात वाटेवरची सुखद:ु खे ही धूसर होत जातात. प्रत्येक पायरीवर मिळालेली अनुभवांची शिदोरी जखमांना कु रवाळत काळजात साठत जाते. आनं दाची कारंजी मनावर मोरपीस फु लवीत थिरकणाऱ्या तन-मनात झिरपत जाते. परी आयुष्यात सदा पुढे ही वळू न पाहायचे असते आशावादी मनाने पाऊलखुणा उजळत चालायचे असते. मनी दृढ धारणा करत समाधानी जीवन फु लवायचे असते. नवा दिवस.. नवा हुरूप... नवा श्वास भरभरून जगायचे असते. म्हणूनच ठरवलेय मी की गत काळाच्या खपल्या काढण्यापेक्षा उद्याच्या सुखाची कास धरून आपला आज सुदृढ घडवणे हे के व्हाही अधिक महत्वाचे. ……… आत्म्याशी तादात्म्य साधून घेवून विराट परमात्मात विलीन होणे ह्यातच आपले सर्वांचे कल्याण आहे नाही का सख्यानो? स्वाती भट… 68

http://yasakhyannoya.blogspot.in/


ek; ek>h सुरांचा तराणा असे माय माझी, सुखांचा खजीना असे माय माझी ! . जिच्या एक हास्यामुळे शीण जातो, अशी प्रेमगं गा असे माय माझी ! . कशाला हवे हे मदर्स डे वगैरे, तशी पूजते रोज मी माय माझी ! . लपव तू कसेही, कितीही, कधीही, मनाच्यातले वाचते माय माझी ! . भलेही करु दे तिला पार साठी, ‘तरूणी’च वाटे सदा माय माझी! . ...........अदिती कापडी. http://yasakhyannoya.blogspot.in/

69


eyk ek>h vkbZ mexyh आज ३० तारिख, आज माझी पिल्लू अनघा ६ महिन्याची झाली , मला आई होऊन ६ महिने पूर्ण झालेत . आणि काय योगायोग आज माझ्या आईचा पण वाढदिवस. मला तिचे, माझ्या लग्नाअगोदरचे वाढदिवस आठवलेत. मी आणि माझी बहिण मिळू न छान साजरा करायचो . आता माझ्या लग्नानं तर ते शक्य नाही म्हणून फोनवरतीच काय ते विश करायचे. मग विचार के ला online gift पाठवायचे का ? पण काय ? तिला वाचन आवडते म्हणून चांगले पुस्तक घेऊन पाठवू कि तिला गाण्याची आवड आहे म्हणून चांगली CD पाठवू? काही के ल्या समजत नव्हते. आज इतक्या वर्षानं तर लक्षात येत होतं कि,आईला मी ओळखलं य का ? तिला कश्याची आवड आहे ते कधी तरी तिला विचारले का? किं वा कधी निरीक्षण तरी के ले 70

http://yasakhyannoya.blogspot.in/


का? असे का होते असा विचार के ल्यावर मला समजले, आज सं साराच्या वाढत्या व्यापामुळे तिच्या आवडीनिवडी, तिचे छं द कधी कोणाला कळलेच नाही . आमचे लहानपण, आजारपण, अभ्यास, पाहुणे सं साराचा वाढता व्याप हे सगळं करण्यातच तिचा वेळ गेला . नोकरी वगैरे करायला तर कधी वेळच मिळाला नाही. पण आमच्या आवडीनिवडी मात्र तिने ओळखल्या , मला गाण्याची आवड म्हणून तिने मला गाण्याच्या क्लासला घातलेत, माझ्या बहिणीला नृत्याची आवड म्हणून तिला भरतनाट्यम शिकायला घातले . आम्हाला अभ्यासाव्यतिरिक्त इतर विषयाची आवड निर्माण के ली. एवढेच नाही तर आज मला लग्न झाल्यानं तर तिने शिकवलेल्या प्रत्येक गोष्टीचा खूप उपयोग होतोय. म्हणून आई ही तिच्या बाळाची पहिली गुरु असते जी http://yasakhyannoya.blogspot.in/

71


जवळ राहूनच नाही तर त्याला दूर राहून पण आयुष्यभर मदत करते, हे आई पासून दूर राहिल्यावरतीच कळते . लहानपणी आमचा चेहेरा बघून आमच्या मनात काय सुरु आहे हे जाणणारी आई आता फोन वरती आमचा आवाज ऐकू न पण आमच्या मनात काय सुरु आहे ते लगेच ओळखते .मला जेव्हा मातृत्वाची चाहूल लागली तेव्हा आनं द तर झालाच होता पण, मी ती जवाबदारी पेलू शके ल कि नाही याचे दडपण पण आले होते. पण तिथेही आईने मला धीर देत म्हटले, “अगं का घाबरतेस आम्ही आहोत ना.. तू फक्त तुझं नवीन नवीन आईपण एन्जॉय कर.” तिने नोकरी जरी नाही के ली तरी आजी-आजोबांचे आजारपण, घर आणि आमचा योग्य सांभाळ हे सगळं करणे म्हणजे तिच्यासाठी तारेवरची कसरत होती. नोकरीतून तरी retired होता येतं पण यात तर तेही 72

http://yasakhyannoya.blogspot.in/


नसतं . No retirement, no promotion, no increments… Only strong dedication असा हा गृहिणी पदाचा job, तिने आजपर्यंत के ला आहे. पण ह्यात बाबांची पण तिला मिळालेली साथ तितकीच महत्वाची आहे बरं का. त्यांच्या सहकार्यानीच तिचा सं साररूपी रथ चालू शकला. या सगळ्यांसाठी hats off to you! we love u so much! आणि आई you are supermom for us … असच आमच्यावर खूप प्रेम कर आणि मार्गदर्शन कर… आम्हाला खूप गरज आहे गं त्याची… आज मी आई झाल्यावर मला कळतं य कि, बाळासाठी जागरण, आजारपण त्याचे शी -शु , खाण्या पिण्याच्या वेळा आणि घर, स्वैपाक हे सगळ सांभाळतांना प्रत्त्येक परिस्थिती किती patiently http://yasakhyannoya.blogspot.in/

73


handle करावी लागते ते . चिडचिड, आदळआपट करून आपल्यालाच त्रास होतो. वर घरचे वातावरण बिघडते ते वेगळे च, पण हो, एकदा सगळं छान जमलं कि साखरेहून पण गोड होऊन जातं सगळं . काहीही न बोलता आपली अडचण समजून घेणारा, मदत करणारा नवरा असेल तर मग विचारायलाच नको…. दोघात हा हवासा गोड तीसरा व्यक्ती अल्यावरती नवरा बायकोचे प्रेम पण अधिक वाढतं . बाळाला भूक लागते म्हणून रात्री अपरात्री उठाव लागतं म्हणून राग येतो, पण बाळाचं पोट भरल्यावर तिच्या चेहेऱ्यावर आलेल्या तृप्तीच्या हस्यानी सगळा थकवा, क्षीण, चिडचिड कु ठल्या कु ठे पळू न जाते. तिचे injections , तिचे कान टोचणे , यात तिला होणाऱ्या त्रासाने डोळ्यात टचकन पाणी येतं… तिचे पहिल्यांदा पालथे पडणं , रांगणं , खदखदून हसणं , ओरडणं मनाला सु ख ावू न जातं . हे सगळे http://yasakhyannoya.blogspot.in/ 74


अनुभव खूप छान आणि हवेहवेसे असतात जे आई झाल्यानं तरच अनुभवायला मिळतात. हो… आता मी स्वतः आई झाल्यावर, मला “माझी आई” उमगली…. आई … जिला कु ठल्याही भेटवस्तूची अपेक्षा नसते, आपल्या बाळाचा हसरा चेहेराच तिला शक्ती देते.… बाळाच्या डोळ्यात पाणी आल्यास ती कोसळू न जाते,आणि परत त्याला सावरायला सर्व ताकदिनी उभी रहते… हे सगळं करतांना माझ्या सारख्या नवीन आई झालेलीला थोडं tension मात्र येतं , पण लगेच दसु रं मन म्हणतं ,“अभी तो शुरवात है, आगे आगे देखो होता है क्या?” पण जर आपली आई सोबत असेल तर मग घाबरायचे तरी का?… :)“माझ्या आईला आणि माझ्या सर्व सख्यांना मातृदिनाच्या खूप खूप शुभेच्छा…।”सौ. श्रुती के दार जोशी http://yasakhyannoya.blogspot.in/

75


ysd ykMdh-----! आई मग ती गृहिणी असू दे की नोकरदार तिचा पुढे अनेक समस्या असतात .पण जेव्हा घरातील लोकांची तिला साथ असते तेव्हा त्या समस्या बद्दल तिला जास्त काही वाटत नाही आणि सं सारामध्ये मुख्य साथ असते पतीची ! पण जर कधी ती मिळाली नाही तर एक आई आपल्या मुलांसाठी काही करायला तय्यार असते नाही ?. मी आज असेच माझा बद्दल काही सांगणार आहे . मुं बई मध्ये मुलांना हवे त्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळणे खूप मुश्कील काम आहे .घरातील काही समस्यांमळ ु े मुलीला १२ वीला कमी मार्क्स पडले. जे भेटले त्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला पण ते कॉलेज तिला नाही आवडले .“मला हे कॉलेज नको, मी खूप अभ्यास करीन ,मला दसु रे कॉलेज हावे “म्हणून पूर्ण वर्ष तिची भुणभुण चालूच राहिली . 76

http://yasakhyannoya.blogspot.in/


निकाल लागला चांगले मार्क्स पडले .झाले परत सुरु आता कॉलेज चेंज करायचे. नवीन कॉलेजचे फॉर्म पण आणले .मला मिळत आहे या कॉलेज मध्ये प्रवेश. नवीन कॉलेज मोठे नाव असलेले आणि शिक्षणा साठी पण उत्तम . समोर मोठा प्रॉब्लेम! जुन्या कॉलेज मधून एन ओ सी कशी आणायची .नेहमी सारखे पतीने मला वेळ नाही कारण दिले .आणि हे कॉलेज काही वाईट आहे बाकी मुलं शिकत आहे ना ठीक आहे तिथेच रहा. पूर्ण वर्ष कसेतरी काढले आता काय मुलीचा उदास चेहरा बघवला नाही पण करायचे काय समजत नव्हते. एक दिवस काही ठरवले आणि गेले कॉलेज मध्ये एच. ओ .डी {विभाग प्रमुख} ना भेटले .“अडचण काय आहे? आम्ही नाही देऊ शकत तुम्हाला एन ओ. सी दोन वर्षाची फी द्यावी लागेल .” असे एच .ओ .डी चे म्हणणे होते. http://yasakhyannoya.blogspot.in/

77


आणि आयुष्यात मी खूप मोठे खोटे बोलले मुली साठी काय करणार .मी सांगितले मी आणि माझे पती अलग होत आहे आणि मी गावी जात आहे माझा मुलीला घेऊन .आणि फी भरायला माझाकडे पैसे नाही आहे .तिचे वडील फी भरायला तय्यार नाही . “जा तुम्ही , मुलीला का घेऊन जाता.आणि आम्ही भरू तिची फी, तिच्या वस्तीगृहमध्ये राहण्याचीे व्यवस्था करू “.इति एच .ओ .डी. बाप रे आता काय? मनात गोधं ळ चेहर्‍या वर न दाखवता बोलले आमचा घरातील प्रोब्लम आम्हाला माहित .मला नाही ठे वायचे इकडे मुलीला .शेवटी ती पण एक बाई होती ना तिला काय वाटले तिलाच माहित आणि तिनी एन.ओ .सी दिली .आज एक वर्ष झाले मुलीला हवे ते कॉलेज भेटले खुश आहे .काय काय करयला लागते आईला नाही ? ....आशा नवले. http://yasakhyannoya.blogspot.in/ 78


Turn static files into dynamic content formats.

Create a flipbook
Issuu converts static files into: digital portfolios, online yearbooks, online catalogs, digital photo albums and more. Sign up and create your flipbook.